कुलभूषण खटल्यासाठी साळवेंची रोजची फी 30 लाख

टीम ई सकाळ
सोमवार, 15 मे 2017

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली होती. आता या प्रकरणी आज (सोमवार) आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु असून, हरिश साळवे भारताची बाजू मांडत आहेत.

हेग - पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) खटला लढण्यासाठी भारताने दररोज तब्बल 30 लाख फी घेणारे वकील हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे. हरिश साळवे यांनी 2015 मध्ये सलमान खानचा हिट अँड रन प्रकरणी खटला लढला होता. या खटल्यातून सलमान निर्दोष सुटला होता.

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली होती. आता या प्रकरणी आज (सोमवार) आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु असून, हरिश साळवे भारताची बाजू मांडत आहेत. साळवे यांनी युक्तिवादा दरम्यान पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावून मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. पाकने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. साळवे यांच्यावर भारतीयांच्या आशा टिकून आहेत.

कोण आहेत हरिश साळवे?

 • जन्म नागपूरचा. आजोबा पी. के. साळवे प्रसिद्ध वकील
 • अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 1999 ते 2002 भारताचे सॉलिसिटर जनरल होते
 • सरकारने त्यांचा कार्यकाळ वाढविल्यानंतर तो घेण्यास त्यांनी नकार दिला होता
 • साळवे यांची रोजची फी  30 लाख रुपये
 • फी च्या आकड्यामुळे साळवे सर्वप्रथम आले चर्चेत 
 • मुलायमसिंह, प्रकाशसिंह बादल, मुकेश अंबानी यांसह अनेक प्रसिद्ध नेते, उद्योगपतींचे खटले त्यांनी लढले आहेत
 • मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील खटल्यात त्यांनी विजय मिळविला होता
 • मुकेश अंबानी यांच्याबाजूने खटला लढून त्यांनी 15 कोटी रुपये फी घेतली होती.
 • 2015 मध्ये सलमान खानचा हिट अँड रन प्रकरणी खटला लढला आणि तो निर्दोष मुक्त झाला
 • व्होडाफोनपासून रतन टाटा यांच्यापर्यंत सर्वांचे खटले साळवे यांनी लढले आहेत
 • साळवे यांच्याकडे लक्झरी बेंटले कार असून, गोव्यात हॉलिडे होम आहे
 • साळवे कपडे खरेदी करण्यासाठी लंडनला जातात, असेही बोलले जाते