'गोळी झेलली लष्कराने, मोदी का घेत आहेत श्रेय?'

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - "भारतीय लष्कराने गोळी झेलली, भारतीय जवान हुतात्मा झाले. उत्तरात जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. मग याचे श्रेय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का घेत आहेत?‘, असा प्रश्‍न पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल याने उपस्थित केला आहे.

ट्‌विटद्वारे मोदी आणि भाजपला लक्ष्य करताना हार्दिकने म्हटले आहे की, "भारतीय जनता पक्ष "सर्जिकल स्ट्राईक‘चे पोस्टर लावत प्रचार करत आहे. त्यापेक्षा हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देणारे पोस्टर्स लावून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा उत्साह वाढविता आला असता‘, असेही हार्दिकने पुढे म्हटले आहे. "सर्जिकल स्ट्राईक‘ बाबत शंका उपस्थित पाकिस्तानसह भारतातील काही राजकीय पक्षांचे नेते त्या संदर्भातील पुरावे मागत आहेत. दरम्यान या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ लष्कराने सरकारकडे सोपविला आहे. मात्र हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मात्र हे व्हिडिओ सार्वजनिक करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.