लष्करात जाण्याचा आग्रह केला होता का?: पुरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

मुंबई - ‘सीमेवर लढताना हुतात्मा झालेल्या 24 वर्षांच्या तरुणाच्या मृत्युला कोण जबाबदार आहे?‘ या प्रश्‍नाला उत्तर देताना अभिनेते ओम पुरी यांचा "त्या जवानाला लष्करात जाण्यासाठी कोणी आग्रह केला होता का?‘ असे वक्तव्य केले आहे. लष्कराबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल पुरी यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवरील चर्चासत्रात अभिनेते ओम पुरी बोलत होते. या चर्चासत्रात कर्नल (निवृत्त) बीएन थापर, अबू आझमी यांच्यासह अन्य व्यक्ती सहभागी झाले होते. पाकिस्तानमधून भारतात आलेल्या कलाकारांकडे अधिकृत व्हिसा असून त्यांनी भारतात अवैध प्रवेश केलेला नसल्याचे म्हणत पुरी यांनी अभिनेता सलमान खानच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तसेच दहशतवादावर उपाययोजना विचारताना पुरी यांनी उपहासाने "शरीरावर बॉम्ब लावून पाकिस्तानमध्ये हल्ला करणारे लोक तयार करावेत‘, असा सल्लाही यावेळी दिला.

ओम पुरी ट्विटरवर ट्रेण्डमध्ये
पुरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर देशभरातून प्रचंड टीका करण्यात येत आहे. लष्कराचा अवमान करून सलमान खानच्या वक्तव्याला समर्थन केल्याबद्दल नेटिझन्स तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळेच आज (मंगळवार) सकाळपासूनच "Om Puri‘ हा ट्रेण्ड ट्विटरवर क्रमांक एक वर पोचला आहे.