'मोदी स्वामींकडे अर्थमंत्रालय सोपविणार का?'

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे अर्थमंत्रालय देतील का?‘, असा प्रश्‍न विचारून कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हकालपट्टीच्या मागणीची पूर्तता जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता सुब्रमण्यम स्वामी यांनी आपला मोर्चा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांच्याकडे वळविला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी सरकारच्या बौद्धिक संपदा धोरणासह सर्वच धोरणांना वेळोवेळी विरोध केला आहे, त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी स्वामींनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी सरकारवर टीका केली आहे. ट्‌विटरद्वारे त्यांनी म्हटले, "मोदी आता सुब्रमण्यम स्वामींकडे अर्थ मंत्रालया सोपविणार का? त्यांनी असा दावा केला आहे की जर नेहरू-गांधी कुटुंबियांना लक्ष्य केले तर पंतप्रधान त्याची नुकसानभरपाई देणार आहेत‘ तसेच सुब्रमण्यम स्वामी यांच्या निशाण्यावर अरविंद सुब्रमण्यम नसून अर्थमंत्री अरुण जेटली असल्याचा आरोपही दिग्विजयसिंह यांनी केला आहे.