भाजप खासदार 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

या महिलेने पटेल यांच्यावर आरोप करत म्हटले आहे, की त्यांनी 3 मार्चला मला जेवणासाठी घरी बोलवून बलात्कार केला. दिल्ली पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यानंतर मी न्यायालयात गेले. आता न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - गुजरातमधील भाजपचे खासदार के. सी. पटेल हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले असून, एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या गँगचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या गँगची प्रमुख महिला असून, ती श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून घेत होती. हाई प्रोफाईल या महिलेने आतापर्यंत अनेक जणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. 

खासदार पटेल यांनी आरोप केला आहे, की मला बेशुद्ध करून आपत्तीजनक फोटो काढण्यात आले. त्यानंतर माझ्याकडून पैसे मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात येत आहे. ही महिला माझ्याकडे मदतीसाठी आली होती. चहामधून तिने मला बेशुद्धीचे औषध देऊन हे कृत्य केले.