अकरा नवऱ्यांना फसविणाऱ्या तरुणीला अटक!

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

नोएडा : अकरा व्यक्तींशी विवाह करून त्यांना एकाच प्रकारे लाखो रुपयांना फसविणाऱ्या तरुणीला पकडण्यात केरळ पोलिसांना यश आले आहे. नोएडा पोलिसांच्या मदतीने केरळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत संबंधित तरुणीला तिच्या बहिण आणि बहिणीच्या पतीसह ताब्यात घेतले आहे.

मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथील मेघा मार्गव नावाची ही 28 वर्षांची तरुणी आहे. लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिस तिचा शोध घेत होते. कोची येथे राहणाऱ्या लॉरेन जस्टिस नावाच्या व्यक्तीने ऑक्‍टोबरमध्ये मेघासोबत विवाह केला होता. मात्र विवाहानंतर काही दिवसांतच ती 15 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेल्याची तक्रार जस्टिसने पोलिसांकडे केली होती. त्यानंतर केरळ पोलिस मेघाचा शोध घेत नोएडापर्यंत पोचले.

नोएडा पोलिसांच्या मदतीने त्यांनी मेघाला ताब्यात घेतली. ताब्यात घेतल्यानंतर मेघाने तीन विवाह केल्याचे सांगितले. मात्र तिन्ही वेळा पतीशी न पटल्याने त्यांच्याशी घटस्फोट घेतल्याचेही तिने सांगितले. तिने पुन्हा चौथ्यांना विवाह केला आणि घटस्फोट न घेताच ती पळून गेली. चौकशी नंतर पोलिसांना असे समजले की मेघाने फसवणुकीच्या उद्देशाने एकूण 11 विवाह केले होते. जस्टिससोबतचा मेघाचा चौथा विवाह होता. केरळ पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मेघासह तिघांना केरळमध्ये आणले आहे.