वजन घटविणे बेतले जीवावर 

Death
Death

चेन्नई(यूएनआय) : लठ्ठपणा दूर करण्यासाठी बरेच जण वेगवेगळे उपाय करत असतात; मात्र हे उपाय कधीकधी जीवघेणेही ठरतात. अशीच एक घटना चेन्नई येथे घडली असून, 150 किलो वजन असणाऱ्या 47 वर्षीय महिलेने वजन घटविण्यासाठी विक्रमी 9 बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केल्या. अखेर गुंतागुंतीच्या नवव्या शस्त्रक्रियेदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. 

मृत वालारमाथी नामक महिला तिरुअण्णामलाई जिल्ह्यातील रहिवाशी असून, तिचे वजन 150 किलो होते. वाढत्या वजनामुळे वालरमाथी त्रस्त होती. म्हणून वजन कमी करण्यासाठी तिने शरीरातील फॅट शस्त्रक्रियेद्वारे काढले होते. गेल्या महिनाभरापासून ती एका खासगी रुग्णालयात वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करत होती. शुक्रवारी रात्री शस्त्रक्रियेदरम्यान वालारमथीला त्रास जाणवू लागला व त्यातच तिची मृत्यू झाला. 

दरम्यान, वालारमथी हिच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे वालारमथी हिला जीव गमवावा लागला. त्यामुळे चुकीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही नातेवाइकांनी केली आहे. या प्रकरणी भारतीय गुन्हेगारी कलम 174 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. 
तमिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

मृत महिलेच्या तीन मुलांवरही शस्त्रक्रिया 
मृत वालारमथी हिच्याप्रमाणेच त्यांची तीन मुले सतीशकुमार, सरन्या आणि संगीता लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करत होती. तिन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणताही धोका नसल्याचे रुग्णालयाकडून कळविण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com