सुरक्षित जगासाठी महिलांचे नेतृत्त्व हवे- दलाई लामा

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

अधिक सक्षम व्हा
महिलांनी आपल्यातील आत्मविश्‍वास जागा करत अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, महिला या कमकुवत असतात हा दृष्टिकोन बदलायला हवा, त्यासाठी त्यांनी अधिक सक्षमपणे आणि आत्मविश्‍वासाने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. मानवाचा मूळ स्वभाव दयाळू असतो, त्यामुळे आपण आशा ठेवायला काही हरकत नाही. शिक्षणाच्या माध्यमातून निसर्गाप्रतीचे प्रेम, दयाळूपणा, मानवी सहृदयता या गुणांचा प्रसार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती, (आंध्र प्रदेश) : राजकारणातील महिलांचा टक्का वाढायला हवा. कारण, त्यांचे नेतृत्त्व जगाला अधिक सुरक्षित करेल. महिलाच मानवी मूल्यांचा अधिक प्रभावीरीतीने प्रचार आणि प्रसार करू शकतात, असे प्रतिपादन तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी आज केले. ते राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्‌घाटनसत्रात बोलत होते.

शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार महिला याच इतरांच्या दुःखाप्रती अधिक संवेदनशील असतात, आज या पृथ्वीवर दोनशेपेक्षाही अधिक देश आहे. बहुसंख्य देशांचे नेतृत्त्व हे महिलांकडे आल्यास आपले जग अधिक सुरक्षित होऊ शकेल. विसाव्या शतकामध्ये आपले नेमके काय चुकले, याचे आपल्याला विश्‍लेषण करावे लागेल. आता या क्षणाला लोक एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. या संघर्षापासून आपण स्वत:ला वेगळे करू शकत नाही. कारण, आपण सगळे एक आहोत. एकविसाच्या शतकामध्ये अधिक शांतता कशी प्रस्थापित करता येईल, याचाही आपल्याला विचार करावा लागेल, असे लामा यांनी सांगितले. जैविकदृष्ट्या महिलांकडे मोठे सामर्थ्य असते त्यामुळे महिलांनी मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये मूल्यांचा प्रसार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

देश

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू)...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017