Women will get entry in Sabarimala temple
Women will get entry in Sabarimala temple

शबरीमाला मंदिरात आता महिलांनाही मिळणार प्रवेश

नवी दिल्ली : केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात पुरुषांप्रमाणे आता महिलांनाही प्रवेश करण्याचा अधिकार मिळणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले, की ''देशात खासगी मंदिराचा कोणताही सिद्धांत नसून, मंदिर काही खासगी संपत्ती नाही. मंदिर म्हणजे सार्वजनिक ठिकाण आहे. जर सार्वजनिक ठिकाणी पुरुषाला जाण्याचा अधिकार असेल तर तो महिलांना सुद्धा आहे''.

शबरीमाला मंदिर हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्यामुळे याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले, की मंदिर एक सार्वजनिक ठिकाण आहे. स्त्रीदेखील देवाचीच निर्मिती असून, देवाच्या प्रार्थना आणि भक्ती-भाव व्यक्त करण्यासाठी हा भेदभाव का केला जात आहे. देवापुढे प्रार्थना करण्याचा समान हक्क हा पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे कायदाही यामध्ये येऊ शकत नाही.

दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर त्यात कोणीही जाऊ शकते. कोणत्या आधारावर महिलांना प्रवेशबंदी केली जाऊ शकते. हे असंविधानिक आहे, असेही सरन्यायाधीश मिश्रा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com