The work of all people is to prevent a provocative message
The work of all people is to prevent a provocative message

चिथावणीखोर संदेश रोखणे हे सर्वांचे काम

नवी दिल्ली: सोशल मीडिया आणि व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या चिथावणीखोर संदेश आणि मजकुरावरून केंद्र सरकारने कानउघाडणी केल्यानंतर व्हॉट्‌सऍपचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. चुकीच्या बातम्या, माहिती आणि अफवांचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा, सिव्हिल सोसायटी आणि तंत्रज्ञानक्षेत्रातील कंपन्यांनी एकत्र काम करायला हवे, असे व्हॉट्‌सऍपने आज स्पष्ट केले. ताज्या हिंसाचारामुळे आम्हाला मोठा धक्काच बसला असून, या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही व्हॉट्‌सऍपकडून सरकारला सांगण्यात आले. 

तत्पूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मंगळवारी सर्वच कंपन्यांना नोटीस बजावत चिथावणीखोर मजकूर आणि संदेशांच्या प्रसाराची जबाबदारी तुम्हाला झटकता येणार नाही, असे म्हटले होते. यावर व्हॉट्‌सऍपने आज स्पष्टीकरण दिले. व्हॉट्‌सऍपला लोकांच्या सुरक्षेची चिंता आहे ही सुरक्षा लक्षात घेऊनच आम्ही हे ऍप डिझाइन केले आहे असेही कंपनीकडून सांगण्यात आले. यासाठी व्हॉट्‌सऍपने दोन टप्प्यांतील कार्यक्रम सूचविला आहे. यात संबंधित ऍपच्या सुरक्षेची जबाबदारी लोकांकडे सोपविणे, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक माहिती देणे आणि व्हॉट्‌सऍपचा दुरुपयोग रोखण्यासाठी काम करणे आदींचा यात समावेश आहे. यापूर्वी चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये म्हणून नेमक्‍या कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या याची माहितीही व्हॉट्‌सऍपने सादर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com