बेपत्ता 'सुखोई'चे जंगलात अवशेष सापडले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मे 2017

तेजपूर (आसाम): दोन जवानांसह बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या सुखोई जेट विमानाचे अवशेष सोनितपूर जिल्ह्यापासून जवळच जंगलात आढळले आहेत. हा भाग चीन सीमेपासून जवळच आहे.

तब्बल तीन दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर हे अवशेष आढळले असून, जंगल दाट असल्याने आणि वातावरणही खराब असल्याने तपास पथक विमानापर्यंत अद्यापही पोचलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

23 मे रोजी तेजपूर हवाई तळावरून उड्डाण घेतल्यानंतर या विमानाचा तळाशी असलेला संपर्क तुटला होता. या वेळी विमानात दोन जवान होते. या जवानांबाबतही अद्याप माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी हवाई दलाने न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा: