वाढदिवसाच्या दिवशीही आदित्यनाथ कामात व्यस्त

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

आदित्यनाथ यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्‌विटरच्या संदेशात त्यांनी म्हटले आहे, की उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज 45 वा वाढदिवस असूनही ते आपल्या नेहमीच्या कामातच व्यस्त होते. यानिमित्त कोणत्याही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

आदित्यनाथ यांचा वाढदिवस असूनही ते आज सकाळी राजधानी लखनौमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर ते अलिगडला विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी निघून गेले.

आदित्यनाथ यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्‌विटरच्या संदेशात त्यांनी म्हटले आहे, की उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो. पंतप्रधान मोदी यांच्याव्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, व्यंकय्या नायडू, स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.