योगी आदित्यनाथ यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केंद्र सरकारने "झेड प्लस' व्हीव्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षा ताफ्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) स्पेशल कमांडोंचे पथक तसेच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक तैनात असणार आहे.

यापूर्वी आदित्यनाथ यांना गोरखपूरचे खासदार या नात्याने "वाय' दर्जाची व्हीव्हीआयपी सुरक्षा होती. मात्र, मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्यनाथ यांच्या घराभोवती तसेच ते जातील तेथे आता त्यांच्यासमवेत कमांडो असतील. त्यांच्या या सुरक्षा ताफ्यात 25 ते 28 अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तसेच जॅमर असलेली पायलट गाडी असेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.