'वंदे मातरम'ला विरोध चिंताजनक : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

"वंदे मातरम' म्हणण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी " "वंदे मातरम' म्हणण्यास विरोध करणे अतिशय चिंताजनक आहेत,' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लखनौ (उत्तर प्रदेश) - "वंदे मातरम' म्हणण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी ' 'वंदे मातरम' म्हणण्यास विरोध करणे अतिशय चिंताजनक आहेत,' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचे सल्लागार एस एस उपाध्याय यांनी लिहिलेल्या 'अ गव्हर्नर्स गाईड: रोल ऍण्ड ड्युटीज ऑफ द गव्हर्नर अंडर द कन्स्टिट्युशन ऑफ इंडिया' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आदित्यनाथ बोलत होते. यावेळी राज्यपाल राम नाईकही उपस्थित होते. आदित्यनाथ म्हणाले, "अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्या कार्यक्रमातही "वंदे मातरम' म्हणण्यात आले. मात्र, दुर्दैवाने देशात काही जण "वंदे मातरम'ला विरोध करतात. अनावश्‍यक विरोध होत असल्याने मला हा चिंतेचा विषय वाटतो.'

मेरठ येथील महानगरपालिका सभागृहात "वंदे मातरम' म्हणण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यनाथ बोलत होते.

Web Title: Yogi Adityanath: Why resist ‘Vande Mataram’?