आदित्यनाथांची रामजन्मभूमीला भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मी राज्याच्या प्रत्येक भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून, अयोध्या हा राज्याचाच एक भाग आहे. माझ्याही वैयक्तिक भावना आणि श्रद्धा आहेत, त्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. यामध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये

अयोध्या - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वादग्रस्त रामजन्मभूमीला भेट दिली. "माझ्या वैयक्तिक भावना आणि श्रद्धेवर कोणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही,' असे आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले.

"मी राज्याच्या प्रत्येक भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून, अयोध्या हा राज्याचाच एक भाग आहे. माझ्याही वैयक्तिक भावना आणि श्रद्धा आहेत, त्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. यामध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. रामजन्मभूमीमध्ये पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची आणि इतर पायाभूत सुविधा चांगल्या असाव्यात, यासाठी मी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत,' असे आदित्यनाथ म्हणाले.

आदित्यनाथ यांनी रामजन्मभूमीबरोबरच येथील हनुमानगढीला आणि इतर काही मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. अयोध्येचे नाव लवकरच जागतिक नकाशावर असेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.