व्हॉट्सअॅपचा डीपी बदलला म्हणून तरुणाची हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

सोनीपत : हरियाणातील सोनीपत भागात एक धक्कादाय प्रकार घडला. व्हॉट्सअॅप ग्रुपचा डीपी बदलल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. लव जौहर असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून त्याचा भाऊ अजय याने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जौहर यांने ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलला होता. त्या ग्रुपमधील काही सदस्यांना तो फोटो आवडला नाही म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. जौहर ऐकत नसल्यामुळे ग्रुपमधील सदस्यांनी त्याला बोलवूण बेदाम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात एकाच कुटुंबातील आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जौहार कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर रविवारी रात्रीच्या वेळी काही तरुणांमध्ये वाद सुरु होता. त्याच वेळी लव यांने प्रोफाईल फोटो बदलला. त्यावर दुसऱ्या सदस्यांनी आक्षेप घेतला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या प्रकरणातील  मुख्य आरोपी दिनेश उर्फ बंटीने लव जौहरला ग्रुपमधून बाहेर काढले होते. त्याला पुन्हा ग्रुपमध्ये घेतेल आणि त्याला बाहेर बोलवून घेतले. त्यानंतर झालेल्या भांडणात लव जौहर याचा मृत्यू झाला.

Web Title: Youth murdered in hariyana because he changed Whatsapp dp