Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दुबईत मनोहर जोशींच्या हस्ते 'महाबिझ'चे उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
Saturday, April 10, 2010 AT 01:07 PM (IST)
Tags: gmbf,   mahabiz,   uae,   dubai,   marathi,   business,   international,  
पुणे - दुबईत होत असलेल्या पहिल्या आखाती मराठी उद्योजक परिषदेचे उद्‌घाटन शिवसेनेचे नेते आणि खासदार मनोहर जोशी यांच्या हस्ते होणार आहे. खासदार आणि उद्योगपती शिवाजीराव आढळराव-पाटील हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. परिषदेचे निमंत्रक आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे (जीएमबीएफ) संस्थापक संदीप कडवे यांनी "इ-सकाळ'ला ही माहिती दिली. परिषदेचे "महाबिझ २०१०' असे नामकरण करण्यात आले आहे.

येत्या २३ आणि २४ एप्रिलला होणाऱ्या या परिषदेला संयुक्त अरब अमिरातमधील भारताचे राजदूत एम. के. लोकेश आणि भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दोन्ही देशांमधील सरकारी अधिकारी, उद्योगपती यांच्यासह सुमारे २५० मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. परिषदेची कार्यक्रमपत्रिका तयार करण्यात येत असून, त्यासाठी विविध मान्यवर वक्‍त्यांशी चर्चा करून त्यांची वेळ निश्‍चित करण्यात येत असल्याचे कडवे यांनी सांगितले.

संयुक्त अरब अमिरातचे स्थानिक नेते, तेथील संघटनांचे प्रतिनिधी आणि अनिवासी भारतीय उद्योगपती यांनाही परिषदेत सहभागी करून घेण्याची नियोजन आहे. परिषदेच्या ठिकाणीच आयोजिण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये २५ स्टॉल उभारण्यात येतील. यामध्ये प्रामुख्याने कृषी व अन्न उत्पादनांचे स्टॉल असणार आहेत. याशिवाय शिक्षण, पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार इत्यादी क्षेत्रांशी संबंधित स्टॉलही असतील.

आखातातील महाराष्ट्रीय उद्योजकांना एकत्र करणे, आखाती देश आणि महाराष्ट्र यांच्यातील उद्योग-व्यापाराच्या संधी वाढविणे हा या परिषदेचा हेतू असून, त्यादृष्टिने संयुक्त अरब अमिरातमध्ये महाराष्ट्र उद्योग भवन उभारण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू असल्याचे कडवे यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर, महाराष्ट्र इकोनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, इंडो-अरब चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री, इंडियन मर्चंट्‌स चेंबर आणि जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री या संघटनांनी "महाबिझ २०१०'ला पाठिंबा दिला आहे.
 
महाबिझ्‌ २०१० दुबई
परिषदेची तारीख - २३, २४ एप्रिल.
परिषदेचे स्थळ - दुबई कल्चरल ऍन्ड सायन्टिफिक सेंटर, मामझार, दुबई
अधिक संपर्क - gmbf@mahabizme.com
वेबसाईट - http://www.mahabizme.com
प्रतिक्रिया
On 4/10/2010 10:47 PM vgbfb said:
आपण का काळजई करआ
On 10/04/2010 15:59 Vijay-Mumbai Indian said:
चला मनोहर जोशी स्वतः मोठे उद्योगी आहेत. पण कोणाला फुकट सल्ला देण्या शिवाय ह्यांनी मराठी मानसं साठी काही केले नाही. ह्यांचा गावातले लोक सुद्धा ह्यांना शिव्या घालतात.
On 4/10/2010 3:32 PM SURESH SHEKATKAR said:
shri sandeep kadve sahebanche manpurvek abhinandhan. Apan 1 changala upakram karnyacha praytne karat ahat, mazysarkhya Dubai madhil marathi bandwanchya anek shubhecha.
On 4/10/2010 2:47 PM Naren From Akurdi said:
मनसेच्या कार्यकर्त्यांना का भेटली नाही यापुढे असा प्रसंग आल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांना अवश्य भेटावे हि नम्र विनंती ..म्हणजे फोडले जाईल त्याला.. यांना फोडण्याशिवाय पर्याय नाही कारण आपली सिस्टीम खराब आहे.कोर्ट 10 वर्षाने याला शिक्षा देईल ..आणि तीही २ वर्षे ..:-)
On 4/10/2010 1:42 PM MR.AVINASH THORAT said:
manohar joshi sir marathi mansana atishay changla salla nehemi detat ki marathi mansane nokri n karta dhnda udyog karava nusta sallaney koni udyogat padnar nahi marathi manus udyogat yenaisathi tyla avashak ti madat,sahay v margdarshan tyani kele tar te khoop uchit hoil asha karuya ki maha biz 2010 dubai parishdet marathi udojakana vyaparachya sandhi wadhvinais madat kartil.
On 4/10/2010 1:22 PM thanthanpal said:
कोकणचा कालीफोर्निया तर झालाच नाही उलट निसर्गदत्त कोकणाचे उद्योगाच्या नवा खाली उजाड करणे चालू असताना आता यांची नजर दुबई वर पडली अल्ला जाने क्या होगा दुबई का मौला जाने क्या होगा.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: