Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

हरिपूरा धरणाजवळ डंपर दरीत कोसळले दोन मजूर ठार
-
Saturday, January 28, 2012 AT 02:45 AM (IST)
यावल - तालुक्‍यातील हरीपुरा धरणावर काम करणारा डंपर मागे घेत असताना खोल दरीत कोसळून दोन मजूर ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली

पोलिसांनी सांगितले की, हरीपुरा धरणावर सांडव्यातून माती वाहून नेणारा डंपर (एमएच-19 झेड-3095) शेतात माती टाकण्यासाठी मागे घेताना दरीत कोसळला. त्यामुळे डंपरच्या केबिनमध्ये बसलेले मनोज मोरसिंग पवार (वय 27, रा. लालमाती ता. रावेर), राजू रमजान तडवी (वय 21, रा. आडगाव ता. यावल) हे जागीच ठार झाले. डंपर चालक मेहरबान ईलाही तडवी, सलमान आलम तडवी (दोघे रा. मोरव्हाळ ता. रावेर) हे जखमी आहेत. चालक मेहरबान यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सहचालक सलमानची प्रकृती स्थिर असून त्यास फैजपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी डॉ. फिरोज तडवी यांनी केली. मधुकर धनू महाजन यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक मेहरबान तडवी विरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला केला आहे. पोलिस निरीक्षक आर. एस. पाटील हे तपास करीत आहेत. मोहराळे येथील माजी सरपंच संजय पाटील, राजेंद्र महाजन, लहू पाटील यांचेसह ग्रामस्थांनी मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी मदतकार्य केले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: