Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

टेंपोचालकासह दोघे गंभीर
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 28, 2012 AT 11:43 PM (IST)
उंब्रज - सांगलीहून गुळाच्या ढेपा व मिरचीची पावडर असलेले साहित्य घेऊन पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या टेंपोच्या चालकाचा मसूर फाटा (ता. कऱ्हाड) गावाच्या हद्दीत ताबा सुटल्याने टेंपो महामार्गानजीकच्या रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या अपघातात टेंपोचालकासह दोन जण गंभीर जखमी झाले असून, अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रकाश जगन्नाथ यादव (वय 45, रा. कवठेपिरान, जि. सांगली) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या टेंपो चालकाचे नाव आहे, तर अन्य तीन जखमींची नावे समजू शकली नाहीत.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रकाश यादव हा टेंपोचालक आज सांगलीहून टेंपो (एमएच 45- 930) मधून गुळाच्या ढेपा व मिरची पूड घेऊन पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून सातारा बाजूकडे चालला होता. दरम्यान, हा टेंपो उंब्रजनजीक मसूर फाट्यावर आला असता; अचानक टेंपोचालकाचा ताबा सुटल्याने टेंपो महामार्गानजीकच्या झाडावर जाऊन आदळून पलटी झाला. या टेपोंची धडक इतकी जोराची होती, की चालक व अन्य एकजण असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अन्य दोन जण ही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका विवाहितेचाही समावेश आहे. अपघातानंतर जखमींना तत्काळ उंब्रज पोलिसांनी व रस्ते देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कऱ्हाडला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात टेंपोसह त्यातील मालाचे एकूण चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलिस ठाण्यात सुरू होते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: