Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


देश
नवी दिल्ली, कोची - इटालियन बोटीवरील खलाशांनी दोघा भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी भारत व इटलीतील परराष्ट्रीय वाटाघाटी अजूनही सुरूच आहेत, तर आरोपी असलेल्या दोघा इटालियन नाविकांवर खटला चालविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे केरळ सरकारने सांगितले.

Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)

नवी दिल्ली - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे (मनरेगा) शेतीच्या कामांना मनुष्यबळाची चणचण भासत असल्याच्या निष्कर्षात तथ्य नसल्याने तीन महिन्यांसाठी ही योजना थांबविण्याची गरज नाही, असे केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. "मनरेगा'ची कामे वर्षभर चालणारी नाहीत. या योजनेतील 70 टक्के कामे शेतीची कामे नसलेल्या काळात झाली आहेत.

Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)

नवी दिल्ली - गुंड अबू सालेमने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नोटिशीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सालेमविरोधातील काही गंभीर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. जन्मठेप किंवा मृत्युदंडाच्या शिक्षेची शक्‍यता असलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. सालेमला मृत्युदंडाची शिक्षा होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोर्तुगीजमधील सर्वोच्च न्यायालयाने त्याचे भारताला करण्यात आलेले हस्तांतरण रद्द केले होते.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

तिरुअनंतपुरम - इटलीच्या जहाजावरील सुरक्षारक्षकांडून मच्छीमारांवर झालेल्या हल्ल्यानंतर केरळ सरकारने मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. केरळच्या किनाऱ्यावर मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना पूर्णपणे संरक्षण दिले जाईल, असे केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी म्हटले आहे. केरळमधील मच्छीमारांच्या संघटनांची एक बैठक चंडी यांच्या उपस्थितीत झाली.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

नवी दिल्ली - महाराष्ट्रात पत्रकारांवर राजकीय कार्यकर्ते व समाजकंटकांकडून होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. याबद्दल तुमचे (राज्य) सरकार बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे का करू नये, अशी विचारणा करणारे खरमरीत पत्र व कारणे दाखवा नोटीस प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज पाठविली.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज दीर्घ काळानंतर येथे आले. आपली तब्येत चांगली असून, लवकरच आंदोलनास पुन्हा सुरवात करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्यासह "टीम अण्णा' उद्या (ता. 23) दुपारी साडेबाराला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन "राइट टू रिकॉल'बाबत चर्चा करणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाकडे "टीम अण्णा'चे लक्ष लागून राहिले आहे.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात बुधवारी सकाळी 4.6 तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे प्रचंड गारठा असतानाही रहिवाशांना घरातून बाहेर पडावे लागले. रात्री दीडच्या सुमारास हा भूकंप जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू लेहपासून 285 किलोमीटरवर चीनच्या सीमेजवळ लडाखमध्ये होता. या भूकंपाच्या धक्‍क्‍याने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

हैदराबाद/पाटणा/भुवनेश्‍वर - आंध्र प्रदेश, बिहार व ओडिशा या तीन राज्यांच्या विधानसभांमध्ये आज वेगवेगळ्या कारणांवरून गोंधळ झाले. बिहार व ओडिशात कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. "टीआरएस'चे 11 आमदार निलंबित स्वतंत्र तेलंगणच्या मागणीसाठी विधानसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या (टीआरएस) 11 आमदारांना अध्यक्ष एन. मनोहर यांनी दोन दिवसांसाठी निलंबित केले.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

चेन्नई - श्रीलंकेच्या मच्छीमारांनी केलेल्या पेट्रोल बॉंब आणि शस्त्र हल्ल्यात तमिळनाडूतील आठ मच्छीमार जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. त्यातील दोन मच्छीमारांची प्रकृती गंभीर आहे. मध्य समुद्रात मच्छीमारी करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व मच्छीमार नागापट्टीनम जिल्ह्यातील कीचनकुप्पम गावातील आहेत.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

नवी दिल्ली - मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यात केंद्र व राज्य सरकारने विलंब केल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबतच्या सर्व नोंदी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सर्व राज्यांच्या गृहसचिवांनी दयेच्या अर्जाबाबत सविस्तर माहिती तीन दिवसांमध्ये केंद्र सरकारकडे पाठवावी, असे आदेश न्या. जी. एस. संघवी व एस. जे. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने आज दिले.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

मुंबई - अनिवासी भारतीय उद्योजकाला मारहाण केल्याबद्दल अभिनेता सैफ अली खान याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची जामिनावर लगेचच सुटकाही झाली. मंगळवारी रात्री ताज हॉटेलमधील "वसाबी' या जपानी रेस्टॉरंटमध्ये सैफ हा करीना कपूर, करिश्‍मा कपूर आणि अन्य मित्र-मैत्रिणींसमवेत गेला होता. तिथे त्याची इक्‍बाल शर्मा या उद्योजकाशी हाणामारी झाली. शर्मा हे मूळचे भारतीय असून, ते उद्योग-व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेत असतात.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

पाटणा - बिहारमध्ये आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी इंग्रजीची प्रश्‍नपत्रिका फुटली. मात्र, असे काही झाले नसल्याचा खुलासा राज्य सरकारने एकीकडे केला आणि दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी बारा जणांना ताब्यात घेतले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रवेशपत्र देण्यावरूनही अनेक शाळांमध्ये गोंधळ होऊन अनेक ठिकाणी मोडतोडीच्या घटनाही घडल्या.

Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)

नवी दिल्ली - राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या (एनसीटीसी) प्रस्तावाला विरोध केल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) सक्षमीकरणाच्या प्रस्तावासही विरोध दर्शविला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहिलेल्या पत्रात मोदी यांनी म्हटले आहे, की "आरपीएफ'ला राज्य पोलिस अधिकाऱ्यांचे अधिकार देण्याचे प्रस्तावित दुरुस्ती विधेयक घटनेला बाधा आणणारे आहे व भारताच्या संघराज्य रचनेलाही त्याने धक्का पोहोचेल.

Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)

बंगळुरू - विधिमंडळाच्या सभागृहात अश्‍लील चित्रफीत बघणाऱ्या तिघा माजी मंत्र्यांसंबंधी चौकशी करण्यासाठी कर्नाटक विधानसभेने आज समिती नेमली. कॉंग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी सरकारचा निषेध करत सभागृहत्याग केला. सभागृहाध्यक्ष के. जी. बौपैया यांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या चार सदस्यांचा समावेश आहे. समितीत कॉंग्रेसचे दोन प्रतिनिधी आहेत, तर जनता दलाचा एक प्रतिनिधी आहे.

Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)

नवी दिल्ली - पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (पीएमईएसी) पुढील वर्षी विकास दर वाढण्याचे अनुमान व्यक्त केले आहे. हा विकास दर साडेसात ते आठ टक्के राहण्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले असून, जागतिक स्थिती अनुकूल झाल्यास अर्थव्यवस्थेला आणखीही गती मिळण्याची आशा आढावा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पीएमईएसीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी हा अहवाल सादर केला. आर्थिक आढाव्यातील ठळक मुद्दे- - पुढील वर्षी आर्थिक विकास दर 7.5 ते 8 टक्के राहणार.

Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: