Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


फॅमिली डॉक्टर
आईच्या प्रेमाच्या शक्तीचा बाळांना लाभ होतो. वाढत्या वयातही मुलांना आत्मविश्‍वास, समंजसपणा, शहाणपण मिळतं ते आईच्या प्रेमाच्या उबेतूनच. लहान वयातच नाही, तर मोठेपणीही मनाला शांत करण्याची शक्‍ती प्रेमभावनेत असते. मनाचा गोंधळ उडणे, नेमका निर्णय घेणे अवघड जाणे, असुरक्षितता, न्यूनगंड वगैरे त्रासाच्या पाठीमागे प्रेमाची ऊब न मिळणे हे कारण असू शकते. प्रेमभाव हा समोरच्याला आश्‍वस्त करतो.

Friday, February 17, 2012 AT 12:15 AM (IST)

माझे वय 70 आहे, माझ्या डाव्या कानात सतत आवाज येत असतो. त्यामुळे कान दुखतो व ऐकायलाही कमी येते. तरी कृपया उपाय सुचवावा.... - श्री. नारायण म्हात्रे. उत्तर - कमी ऐकू येणे व कानात आवाज येणे ही दोन्ही वात असंतुलनाची लक्षणे आहेत. वयानुसारही वातदोष वाढत असतो, त्यामुळे वात कमी करणाऱ्या औषधांची व उपचारांची आवश्‍यकता आहे. यासाठी अंगाला "संतुलन अभ्यंग तेल' लावणे, नाकात "नस्यसॅन घृता'चे थेंब टाकणे, कानात "संतुलन श्रुती तेला'चे तीन- चार थेंब टाकणे उत्तम.

Friday, February 17, 2012 AT 12:00 AM (IST)

श्‍वास व ऊब यांचा अगदी जवळचा व सरळ संबंध असतो. प्रेमभाव व श्‍वास यांचाही संबंध जवळचा असतो. प्रेमामुळे शारीरिक जवळीक ऊब देते याकडे जास्त लक्ष दिले नाही, तरी आपुलकीमुळे आश्‍वस्त व्हायला होते, जेणेकरून श्‍वासाची गती नैसर्गिक, शांत व संथ चालते. मनात सुरक्षितता वाढली की श्‍वासाची गती संथ राहते. त्याउलट असुरक्षितता वाढली, भीती वाटली की श्‍वासात बदल होतो, त्यामुळे रक्‍ताभिसरणावर परिणाम होऊन शरीर थंड पडू शकते.

Friday, February 17, 2012 AT 12:00 AM (IST)

आकाराने लहानमोठा होऊ शकणारा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणारा असा वाताचा गोळा हृदय ते नाभी या दरम्यान जाणवतो, त्याला गुल्म म्हणतात. त्रिदोष गुल्म असेल तर, तो असाध्य समजला जातो. गुल्म म्हणजे हृदय ते नाभी या दोहोंच्या मध्यात जाणवणारा वाताचा गोळा. हा गोळा आकाराने कमी जास्ती होऊ शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. वातज गुल्माची कारणे व लक्षणे यांची माहिती आपण पाहिली. आज आपण गुल्माचे इतर प्रकार पाहणार आहोत.

Friday, February 17, 2012 AT 12:00 AM (IST)

बालवयातले वाढीचे सर्व टप्पे वेळेत गाठणाऱ्यांना पुढील आयुष्यात अपंगत्वाचा धोका कमी असतो, असे लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. बसलेल्या स्थितीतून चटकन उभे राहणे आणि तोल सांभाळणे या दोन क्रिया उत्तमपणे करू शकणाऱ्या माता-पित्यांच्या मुलांना अपंगत्व येण्याची शक्‍यता कमी असते, असे यापूर्वीच्या अभ्यासातून दिसून आले होते.

Friday, February 17, 2012 AT 12:00 AM (IST)

कीटोऽपि सुमनः सादारोहति सतां शिरः । अश्‍माऽपि याति देवत्वं महद्भिः सुप्रतिष्ठितः ।। फुलाच्या संगतीने क्षुल्लक कीटकसुद्धा सज्जनांच्या डोक्‍यावर जाऊन बसतो. थोरामोठ्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या दगडालासुद्धा देवपण येते. श्रद्धा, भक्‍ती, प्रेम यांचा महिमा अगाध आहे. यामुळे एखाद्या दगडाला देवपण येते, तसेच जिवाला मनुष्यत्व येते. या गुणांमुळेच मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरला आहे. संकलन ः डॉ. सौ. वीणा तांबे

Friday, February 17, 2012 AT 12:00 AM (IST)

कानाचे दुखणे नेहमीच गंभीर नसते. परंतु कोणते दखलपात्र आहे याचे निदान वेळेवर होणे आवश्‍यक आहे. वरपांगी क्षुल्लक दुखण्याचे रूपांतर गंभीर धोकादायक आजारात होऊ शकते, हे लक्षात ठेवावे. कानाचे तीन भाग मानले जातात. बाहेरचा कान, मधला कान आणि आतला कान. सहसा कान दुखण्याचे कारण मधल्या व बाहेरच्या कानात असते. जिवाणू अगर विषाणुजन्य दाह कानात अडचण येणे अथवा मार लागून इजा होणे. ही कानात वेदना होण्यात नेहमी आढळणारी कारणे होत. कान गच्च झाला आहे.

Friday, February 17, 2012 AT 12:00 AM (IST)

हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या अथवा गंभीर स्वरूपाचा हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये अनेक वेळा मधुमेहाची लक्षणे दिसून येतात. मात्र, त्यावर उपचार केले जात नाहीत, असे काही अमेरिकी संशोधकांना आढळून आले आहे. अतिदक्षता विभागामधील 1199 रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांमध्ये मधुमेहाची लक्षणे स्पष्टपणे दिसून येत असूनही त्यांच्यापैकी 65 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांवर मधुमेहासंदर्भातील उपचार केले जात नसल्याचे या संशोधकांना आढळून आले.

Friday, February 17, 2012 AT 12:00 AM (IST)

सध्याच्या धावपळीच्या दिवसात अगदी दररोज शेकोटीच्या साह्याने ऊब मिळविणे जमले नाही, तरी हिवाळ्याच्या दिवसात कधीतरी शेकोटीच्या भोवती बसून गप्पा मारण्याची आणि त्या निमित्ताने थंडीमुळे वाढणाऱ्या वात-कफदोषाचे शमन करून आरोग्य टिकविण्याची संधी अवश्‍य साधावी. थंडीच्या दिवसांमध्ये स्वेदन घेण्याने सर्दी-खोकला होण्यास प्रतिबंध होतो. शिशिरामध्ये कफदोष शरीरात साठू दिला नाही की नंतर वसंतामध्ये तो वितळून होऊ शकणाऱ्या सर्दी, खोकल्यासही प्रतिबंध होतो.

Friday, February 10, 2012 AT 12:15 AM (IST)

सहलीला गेले असताना शेकोटी (कॅंप फायर) पेटवून तेथे खाण्यापिण्याचा आनंद घेतला, तरी शेकोटीमुळे अति उष्णतेचा त्रास होणार नाही, याकडे लक्ष ठेवावेच लागते. शेकोटी उबेसाठी आहे, भाजून घेण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवावेच लागते. आयुर्वेदात शेकोटीची उष्णता उपचार म्हणून वापरायला सांगितलेली आहे. याची तुलना सध्याच्या सौना बाथशी होऊ शकते. संपूर्ण अंगाला तेल लावून आयुर्वेदिक पद्धतीने शेक घेतला तर फायदा होतो. आमच्या आश्रमात खूप वृक्षवल्ली आहेत.

Friday, February 10, 2012 AT 12:00 AM (IST)

ऍक्‍युट कॉरोनरी सिन्ड्रोम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हृदयविकाराला मासे खाण्याने प्रतिबंध होऊ शकतो, असे ऍथेन्समधील होरोकोपिओ विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकारचा हृदयविकार असलेल्या 848 आणि त्यांच्यासारखीच जीवनपद्धती असलेल्या मात्र हृदयविकार नसलेल्या 1078 जणांची शारीरिक तपासणी केली. आहारात माशांचा समावेश असलेल्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारचे हृदयविकार होण्याची शक्‍यता 38 टक्‍क्‍यांनी कमी होते असे त्यांना लक्षात आले.

Friday, February 10, 2012 AT 12:00 AM (IST)

गुल्म म्हणजे वाताचा गाठीसारखा भासणारा गोळा. गाठ व गुल्म यांतील मुख्य फरक असा, की गाठीची जागा बदलत नाही, गुल्म मात्र वातदोषाच्या असंतुलनानुसार इकडून तिकडे जाऊ शकतो, आकारानेही बदलू शकतो. आनाह म्हणजे मलावरोधानंतर. आपण या वेळी गुल्म नावाच्या रोगाची माहिती घेणार आहोत. गुल्म म्हणजे वाताचा गोळा. हा गाठीसारखा भासतो. पण तो आकाराने कमी-जास्ती होऊ शकतो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीही जाऊ शकतो.

Friday, February 10, 2012 AT 12:00 AM (IST)

स्नेहक्‍लिनाः कोष्ठगा धातुगा वा स्रोतोलिना ये च शाखास्थिसंस्थाः । दोषाः स्वेदैस्ते द्रवीकृत्य कोष्ठं नीताः सम्यक्‌ शुद्धिभिर्निर्हियन्ते ।। ....

Friday, February 10, 2012 AT 12:00 AM (IST)

घसा दुखणे ही नेहमी आढळणारी तक्रार. पण घसा दुखण्यामागची कारणेही अनेक आहेत. त्यामुळेच निश्‍चित निदान करून घशावर योग्य उपचार वेळीच करायला हवेत. घसा दुखणे ही एक नेहमी आढळणारी तक्रार आहे. खाज सुटल्यासारखे खवखवणे आणि घशात खूप वेदना जाणवणे या दोन टोकांत कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. घशातून मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूच्या शिरा (नववी आणि दहावी क्रेनियल नर्व्ह) याच कानातूनही संवेदना मेंदूत नेतात.

Friday, February 10, 2012 AT 12:00 AM (IST)

मी 43 वर्षांची गृहिणी असून, मला रात्री झोप लागेपर्यंत दर अर्ध्या-एक मिनिटांनी सारख्या जांभया येत राहतात. फार काम केले नसले तरी जांभया येतात. हे कशाचे लक्षण आहे? दुसऱ्या बाळंतपणानंतर गर्भाशय खाली सरकले आहे, डॉक्‍टरांनी गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. कृपया मार्गदर्शन करावे..... - सौ. सुशीला खारे. उत्तर - सतत जांभया येणे हे वातअसंतुलनाचे आणि मेंदूला प्राणशक्‍तीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे लक्षण असते.

Friday, February 10, 2012 AT 12:00 AM (IST)

बटाटा व भात खाण्याने कुठलाही त्रास होत नाही. त्यात असलेली साखर मधुमेही व्यक्‍तींना नडते असे म्हणतात पण साखर नाही असा पदार्थ जगात नसतो आणि असला तरी तो कोणी खात नाही, खाल्ला तरी शरीर तो स्वीकारत नाही. पदार्थात असलेली शर्करा तो पदार्थ पचविण्यासाठी अग्नी म्हणून उपयोगाला येते. त्यामुळे बटाटा व भात खाल्ला तर साखर वाढेल, हे चुकीचे विधान केल्यासारखे होईल.

Friday, February 03, 2012 AT 12:30 AM (IST)

आरोग्याचे प्रश्‍न सतत विचारले जातात. प्रश्‍न विचारण्याबरोबरच प्रश्‍नाचे उत्तर नीट समजून घेतले पाहिजे व ते स्वीकारण्याची तयारी पाहिजे. तसेच उत्तरात जे मार्गदर्शन केले आहे त्याप्रमाणे आपल्या दिनचर्येत बदल करण्याची गरज आहे व उपचाराची दिशा ठरवली पाहिजे बाळंतपणामध्ये काळजी न घेतल्याने वजन वाढणे, पोट वाढणे, सर्व अंग दुखणे, अंग गरम होणे, केस गळणे असा सध्या तब्येतीचा खूप त्रास होत आहे.

Friday, February 03, 2012 AT 12:30 AM (IST)

सर्दी झाली, की नाक चोंदून श्‍वासोच्छ्वासाला होणारा त्रास अनुभवलेला असतो पण नाक केवळ सर्दीमुळेच चोंदत नाही त्याला इतरही कारणे असू शकतात. आपले नाक चोंदले आहे, याची जाणीव नाकातून वाहणाऱ्या हवेला अडथळा येऊ लागला की होते. असा अडथळा होण्याची अनेक कारणे असू शकतात.

Friday, February 03, 2012 AT 12:15 AM (IST)

उदावर्त, म्हणजे वायूच्या नेहमीच्या गतीत बदल झाल्याने होणाऱ्या त्रासांची माहिती आपण करून घेतो आहोत. मल, मूत्र, भूक, झोप, यांसारखे नैसर्गिक वेग अडवून ठेवल्यामुळे उदावर्त होतो. त्याचप्रमाणे वातदोषाला बिघडविणाऱ्या पदार्थांच्या सेवनानेसुद्धा उदावर्त रोग होऊ शकतो. वायुः कोष्ठानुगो रुक्षैः कषायकटुतिक्‍तकैः। भोजनैः कुपितः सद्य उदावर्तं करोति हि।।...

Friday, February 03, 2012 AT 12:15 AM (IST)

सल्ला ऐकला डोक्‍यातून येणारं रक्त थांबवत डॉक्‍टरांनी बंटाला विचारलं, ""डोक्‍याला जखम कशी झाली?'' बंटा उत्तरला, ""मी बुक्की मारून दगड फोडत होतो. कुणीतरी म्हणालं, की कधीतरी डोक्‍याचा वापर कर.'' अस्वस्थ क्षण डॉक्‍टर - बरं, आता मला सांगा, की तुम्हाला सगळ्यात जास्त अस्वस्थ कधी वाटतं? रुग्ण - हं... त्या वेळीच... जेव्हा आपल्या बिलाचे पैसे भरण्याची वेळ येते.

Friday, February 03, 2012 AT 12:00 AM (IST)

माझे वय 36 वर्षे असून माझे लग्न सात वर्षांपूर्वी झाले. बरेच उपचार घेऊनही मूल नाही. हार्मोन्सच्या तपासणीमध्ये बीजकोषाचे काम व्यवस्थित होत नसल्याचे समजले. आता मला टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला दिला आहे, पण याचा उपयोग होईल का? यावर आयुर्वेदिक उपचार असतात का?. ....सौ. सुनीता जयस्वाल उत्तर - यावर आयुर्वेदिक उपचार असतात.

Friday, February 03, 2012 AT 12:00 AM (IST)

भूय एव तपसा ब्रह्मचर्येणश्रद्धया संवत्सरं संवत्स्यथयथाकामं प्रश्‍नान्पृच्छतयदि विज्ञास्याम- सर्वं ह वो वक्ष्याम इति ।। ...प्रश्‍नोपनिषद पिप्पलाद ऋषींना विद्यार्थ्यांनी प्रश्‍न विचारला असता, त्यावर त्यांनी उत्तर दिले, ""आश्रमात माझ्याजवळ वर्षभर राहून पावित्र्य, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा वाढल्यानंतर प्रश्‍न विचारण्याचा अधिकार मिळतो.'' प्रश्‍नोपनिषदातील हा श्‍लोक आहे.

Thursday, February 02, 2012 AT 03:50 PM (IST)

आरोग्याविषयीचे प्रश्‍न सतत येत असतात. खरे तर एवढे प्रश्‍न आहेत का? मुळात एवढे त्रास आहेत का? कोणी तरी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर लक्षात ठेवलेले असल्यास, आपल्याला तशा तऱ्हेचा त्रास झाल्यावर औषध समजू शकेल किंवा तसा त्रास होऊ नये अशी काळजी घेता येईल. माझे वय 25 वर्षे आहे. तीन वर्षांपासून माझ्या मणक्‍याला थोडा वाक आलेला आहे, त्यामुळे पाठ सतत दुखते. एक-दोन तास बसल्यावर जास्ती त्रास होतो. सध्या व्यायाम व मसाज सुरू आहे. त्यामुळे थोडा आराम आहे.

Friday, January 20, 2012 AT 12:30 AM (IST)

आपली शास्त्रे, आपली परंपरा, आपल्यावर प्रेम करणारी वडीलधारी मंडळी, आपल्या देशातील विचारवंत यांनी सांगितलेल्या गोष्टी जुनाट व बुरसटलेल्या विचारांच्या आहेत असे समजून, त्यांना नावे ठेवणारे, त्यांच्याकडे काणाडोळा करणारे आणि जाहिरातींद्वारा दिलेला सल्ला उचलणारे अनेक दिसतात. त्यातून काही आजार झाला, की प्रत्येक वेळी पळापळ केली जाते. त्याविषयी एक मोठा प्रश्‍न उभा राहतो.

Friday, January 20, 2012 AT 12:15 AM (IST)

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्‍नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।। ...श्रीमद्‌भगवद्‌गीता 4-34 भगवंत म्हणतात, ''मर्म जाणणाऱ्या ज्ञानीजनांकडे जाऊन तू ते ज्ञान करून घे. त्यांना नम्रपणे नमस्कार करून व त्यांची सेवा करून त्यांना प्रश्‍न विचारल्यास ते ज्ञानी लोक तुला ज्ञानाचा उपदेश करतील.'' ज्ञान मिळविण्याचा योग्य मार्ग या श्‍लोकात सांगितला आहे.

Friday, January 20, 2012 AT 12:00 AM (IST)

डोके दुखण्याची कारणे बरीच आहेत. डोकेदुखीवर उपचार म्हणजे कारणावर उपचार. योग्य निदानाखेरीज केलेले उपचार अर्धवट परिणाम देतात. अनेक कारणांनी ताप येत असताना डोके दुखते. इन्फ्ल्यूएन्झा हे नाव सुपरिचित आहे. या आजाराची पुष्कळदा सुरवात कपाळ दुखण्याने होते. इन्फ्ल्यूएन्झाचा आजार येण्याची फारशी सूचना मिळत नाही. सहसा तीन ते पाच दिवस त्रास टिकतो.

Friday, January 20, 2012 AT 12:00 AM (IST)

तहान, भूक, झोप या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. ढेकर किंवा उलटी या क्रियाही काही कारणाने होतात. यापैकी कोणतीही प्रवृत्ती रोखून धरता कामा नये. या प्रवृत्ती रोखून धरल्याने त्रासच होतो. मूत्र वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवल्याने बिघडलेला वात कोणती लक्षणे तयार करतो, याची माहिती आपण घेतो आहोत. आज आपण ढेकर, उलटी, भूक वगैरे उर्वरित वेगांचा अवरोध करण्याने काय त्रास होतो, याची माहिती घेणार आहोत.

Friday, January 20, 2012 AT 12:00 AM (IST)

सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे.

Friday, January 13, 2012 AT 12:30 AM (IST)

माणसाला हवी असते ऊब आणि उबेमुळे मिळणारा आनंद व संपर्क. संपर्काची कल्पनाच ऊब देते. एखाद्या संध्याकाळी एखाद्या व्यक्‍तीला नुसते फोन करायचे ठरविले की बरे वाटायला लागते. साहजिकच समाधान ही ताणविरहित अवस्था व या आकर्षणालाच प्रेम म्हणायचे. म्हणून माणसाला प्रेम मिळणे हा ऊब मिळण्याचाच आनंद असतो व त्यामुळे तो सुखी होतो.

Friday, January 13, 2012 AT 12:15 AM (IST)

अपानवायू, मल (विष्ठा), मूत्र, जांभई, अश्रू, शिंक, ढेकर, उलटी, वीर्य, भूक, तहान, श्रमानंतर लागणारा दम आणि झोप असे तेरा वेग असतात. या वेगांना अडवून ठेवणे किंवा बळेच प्रवृत्त करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट समजले जाते. त्यातही वेग अडवून ठेवला तर जोवर त्याची प्रवृत्ती होत नाही, तोपर्यंत वाताच्या गतीत अडथळा येत असल्याने वातअसंतुलन अधिक प्रमाणात होते.

Friday, January 13, 2012 AT 12:15 AM (IST)

माझ्या भावाला एक वर्षापासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. गुडघ्याच्या खाली शिरा सुजलेल्या दिसतात. काही ठिकाणी गाठीही तयार झालेल्या दिसतात. तो स्टॉकिंग्ज वापरतो, पण त्याचे पाय प्रचंड दुखतात. 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभे राहता येत नाही. त्याचे रोजचे काम बैठ्या स्वरूपाचेच आहे. कृपया उपाय सुचवावा.... - विशाल सावंत, पलूस शिरांच्या भिंतींमधले स्थितिस्थापकत्व वाढावे आणि एकंदर रक्‍ताभिसरणाला मदत मिळावी यासाठी पायाला नियमित अभ्यंग करणे उत्तम होय.

Friday, January 13, 2012 AT 12:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: