|
|
|
|
|
|
माझ्या व्यग्र शेड्यूलबद्दल माझी मुलगी सायली हिची कधीही तक्रार नसते. ती कमालीची समजूतदार आहे. माझा आठवड्यातील एक दिवस मात्र केवळ तिच्यासाठीच असतो. मस्त भटकणे, तिला आवडेल ते खाणे ठरलेले असते. या भटकण्यातून तिच्यापेक्षा मलाच अधिक एनर्जी मिळते.... गायिका म्हणून माझी कारकीर्द बहरात असताना आम्हाला कन्यारत्न झाले आणि माझे आयुष्य पूर्ण बदलून गेले. सध्या माझी मुलगी सायली टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत शिकते.
Thursday, February 23, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
डोळ्यांवरून माणसाचं व्यक्तिमत्त्व कळतं, असं म्हणतात. माणसाच्या निरोगी असण्याचं लक्षण म्हणजे स्वच्छ आणि सतेज डोळे... मात्र प्रदूषणामुळे आणि वाढत्या ताणांमुळे त्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. दिवसभरात दहा ते बारा तास कॉम्प्युटरसमोर आणि घरी रिलॅक्सेशन म्हणून टीव्हीसमोर असा एकूणच डोळ्यांना ताण येणारा दिनक्रम. त्यामुळे तारुण्यातच डोळ्यांच्या व्याधींची देणगी मिळतीये.
Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
काही वेळा आपण मुलांना अकारण रागावतो. काही वेळाने मुलं सवर् काही विसरून आपल्याला बिलगतात. त्यांच्याशी शांतपणे संवाद साधत चूक सांगितली तर चुकांची पुनरावृत्ती नक्कीच टळेल. परवाच वाचनात एक गोष्ट आली. परदेशातील होती. आईचा वाढदिवस असतो. घरी खूप पाहुणे येणार असतात. त्यांच्या स्वागतासाठी गडबड चालू असते. काचेच्या वस्तूंनी टेबल सजविलेले असते.
Wednesday, February 22, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
इंग्लिशमधून लहान मुलांसाठी सुंदर सिनेमा, कार्टून्स, पुस्तकं करणारे खूप आहेत पण पहिलं नाव आठवतं ते वॉल्ट डिस्ने यांचंच... प्रत्येक जण मुलांना गोष्टी सांगताना आपल्या मनानं थोडाफार बदल करतो, भर घालतो. आपल्याला न आवडणारा भाग त्या गोष्टीतून काढून टाकतो. मुलांना जे खूप आवडेल त्याचे प्रमाण वाढवतो. जगभरातल्या मुलांसाठी हे काम कमालीच्या सुंदरतेने केले ते वॉल्ट डिस्ने यांनी.
Wednesday, February 22, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पीसी, मोबाईल वापरताना अनेक "ऍक्सेसरीज'ची गरज आपल्याला भासते. त्यामध्ये हॅंड्सफ्री, ब्लू टूथपासून एक्स्टर्नल हार्डडिस्क ड्राइव्ह, पेनड्राइव्हपर्यंत सगळ्या गोष्टी येतात. अशाच काही ऍक्सेसरीजची थोडक्यात माहिती देत आहोत. एनएफसी ब्लू टूथ स्टिरिओ हेडसेट "नोकिया'ने त्यांचा लूना एनएफसी एनेबल्ड ब्ल्यू टूथ स्टिरिओ हेडसेट लॉंच केला आहे. निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) टेक्नॉलॉजी असलेल्या सर्व स्मार्टफोन्सकरिता हा हेडसेट बेस्ट आहे.
Tuesday, February 21, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बारावीची बोर्डाची परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते "सीईटी'चे. योग्य प्रकारे नियोजन करून अभ्यास केल्यास "सीईटी'ची लढाई आत्मविश्वासाने जिंकता येते. या अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स... विद्यार्थी मित्रांनो, बारावीची अंतिम परीक्षा संपल्यावर तुम्हाला वेध लागतील ते "सीईटी'चे. ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा हेल्थ सायन्स, अभियांत्रिकी व फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते.
Tuesday, February 21, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रत्येक युवकाला "डोले शोले' बनवायचे असतात त्यासाठी तो पराकाष्ठाही करतो मात्र त्या एक्साइटमेंटमध्ये एक्स्ट्रा वेट उचलण्यासारखे अनेक गैरसमज दिसतात. ते काय असतात आणि त्यावर उपाय काय, पाहू यात... बॉडीगार्डमधल्या सलमानसारखी बॉडी कुणाला नको असते? पण त्यासाठी योग्य दिशेनं व्यायाम करणं गरजेचं आहे. झटपट बॉडी बनवता यावी म्हणून मुलं अनेक फंडे वापरतात. पण त्यामुळे भलतंच काहीतरी होऊ शकतं, त्यासाठी हे लक्षात ठेवायलाच हवं...
Monday, February 20, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भारताची ओळख म्हणजे खाण्यापासून कपडे घालण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत जपलेली संस्कृती. सण- समारंभांमधून ती फॉलो करणारे यंगस्टर्स बरेच आहेत. त्यामुळंच एरवी इंडोवेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणाऱ्यांचा कार्यक्रमांमध्ये मात्र "ट्रॅडिशन'कडेच कल दिसतो. आपली पर्सनॅलिटी झक्कास होण्यासाठी गरजेचा आहे "ड्रेसिंग सेन्स.' जर कार्यक्रमांमध्ये भाव खायचा असेल, तर "ट्रॅडिशनल ऍण्ड ट्रेंडी' हे यंगस्टर्सचं ब्रीदवाक्य असतं.
Monday, February 20, 2012 AT 02:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रतिकूल परिस्थितीतून अधिक कणखर होऊन बाहेर पडणं आणि आणखी प्रगती करणं आमच्या "डीएनए'मध्ये आहे, असं "भारत फोर्ज'चे कार्यकारी संचालक अमित बाबा कल्याणी म्हणतात. याच गुणसूत्रांमुळे "कल्याणी ग्रुप' जागतिक पातळीवर पोचला आहे. संकटाच्या काळात तसूभरही न ढळणारा आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याच्या गुणसूत्रांमुळंच "कल्याणी ग्रुप' दोन मोठे धक्के पचवूनही आज 12 हजार कोटी रुपयांची (2.5 अब्ज डॉलर) वार्षिक उलाढाल करतो आहे.
Sunday, February 19, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सहजीवनात नवरा-बायकोच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा पूरक असल्या तर जीवन स्वर्गसुख बनतं. पण आपल्या अपेक्षा स्वत:ला किंवा समोरच्याला कळल्याच नाहीत, तर अपेक्षांचं ओझं नात्यात कडवटपणा निर्माण करतं. लग्नाला चार वर्षं झालेलं एक दाम्पत्य माझ्याकडे आलं होतं. बायकोची तक्रार म्हणजे तो अबोल, निर्णयक्षमता नसणारा अगदी "सांगकाम्या' प्रमाणे वागणारा, अनरोमॅंटिक आहे. तर नवरा सांगत होता, ""मला सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागतं. ती खूप मुडी आहे.
Saturday, February 18, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रश्न : मी एका सरकारी खात्यात नोकरीला असून, लग्नाला 4 वर्षे झाली आहेत. सुरवातीपासूनच पत्नी माझ्या घरातील लोकाशी फटकळपणे वागते. लहानसहान कारणावरून सतत त्यांचा अपमान करणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष करणे, अशा प्रकारचे वर्तन नेहमीच असते. ती चार महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली आहे. "आपण वेगळे राहायचे असेल तरच मी नांदेन अन्यथा घटस्फोट घेईन, बघून घेईन' अशा प्रकारच्या धमक्या फोनवरून देते.
Saturday, February 18, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आज-काल नॉर्मल माणसाचेही उद्या काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे योग्य काळजी घेणेच फक्त आपल्या हातात असते. "आजचा दिवस आनंदात घालवला,' या समाधानात आम्ही रोज रात्री झोपेच्या अधीन होतो. मी व संदीप 1992 रोजी लग्नाच्या बेडीत अडकलो. लग्नानंतर 4-5 वर्षांत संदीपला मधुमेह झाला. त्याबरोबरच त्याचे भाऊबंद असलेले आजारसुद्धा न बोलावताच आले. मी स्वतः जोशी हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजी लॅबमध्ये असले, तरी या आजाररूपी पाहुण्यांनी माझी गाळण उडवली.
Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संतोष वाघला सैन्यात भरती व्हायचे होते, पण काही कारणाने राहून गेले. ज्ञानप्रबोधिनीच्या संपर्कात आल्याने त्याची समाजसेवेशी नाळ जुळली. संतोषने ज्या पालकांकडे मुलांना शिकवायला पैसा नाही, त्यांच्यासाठी "अस्तित्व' ही "बिनभिंतीची शाळा' सुरू करून एक प्रकारे देश आणि समाजसेवेचे स्वप्न पाहिले आहे. संतोष वाघची वीर (ता. पुरंदर) या गावाजवळ वडिलोपार्जित शेती आहे. त्याचे शिक्षण वीरच्या शाळेत झाले.
Friday, February 17, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शरीरविक्रय करणाऱ्या महिला व अल्पवयीन मुलींचा हक्काचा आधार आणि एचआयव्ही, एड्सग्रस्त असलेल्या सुमारे पाच हजार मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणारी हैदराबाद येथील संस्था म्हणजे "प्रज्वला'. या संस्थेची सर्वेसर्वा आहे सुनीता कृष्णन. बंगळूर येथे 1972 मध्ये जन्मलेल्या सुनीताने सेंट जोसेफ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यावर शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी "प्रज्वला' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.
Friday, February 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुलगी आणि तिच्या बाबाचं नात्यात एक इमोशनल बॉन्डिंग असतं. मुलीची आई लग्नानंतर तिचं घर सोडून आलेली असते मात्र बाबाला काही वर्षांनी आपली मुलगी दुसरीकडे जाणार असल्याची जाणीव आणि इनसिक्युरिटी असते. आईला आपलं घर सोडून आल्याचा अनुभव असतो, तो बाबाला कधीच नसतो. त्यामुळेच कदाचित, हे नातं इतकं हळुवार आणि घट्ट असतं...
Thursday, February 16, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|