बंद घरातल्या मुलांवर काय होत असतील परिणाम, याविषयी मी अनेकांशी बोललो... काही-काही विपरीत बातम्याही ऐकल्या होत्या. कोणी तरी बंद घरातल्या पोरानं टीव्हीवरचं दृश्य पाहत स्वतःच किचनमधील सुरी हातात खुपसून घेतली होती... एका पोराला टीव्हीवरच्या स्क्रीनचं चुंबन घेण्याची सवय लागली होती... एकाला खूप मोठ्यानं बोलण्याची सवय लागली होती... ए कदा एका मित्राच्या घरी गेलो. तिसऱ्या मजल्यावरचा पाच नंबरचा फ्लॅट. समोर राहून बेल वाजवली. एकदा-दोनदा-तीनदा...
पारदर्शकता, योग्य नियोजन, लोकसहभाग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माहितीसंबंधातली साक्षरता या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. महानगरपालिकांचं बजेट कोट्यवधींचं आहे. विकासकामांसाठी प्रचंड निधी सरकारकडून दिला जातो. त्या निधीचा विनियोग करताना त्यात लोकसहभाग वाढायला हवा. बजेट शेअरिंग, त्यानंतर नियोजनात लोकांचा सहभाग व्हायला हवा. राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांनी काही प्रमाणात यशस्वी असा सोशल ऑडिटचा प्रयोग राबवलाय पण तो ग्रामीण भागातच.
जिल्हा परिषदांसाठी गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रचंड प्रमाणात निधी येऊ लागला आहे. त्याचे योग्य नियोजन झाले, तर विकासाच्या योजना अगदी तळागाळातील लोकांपर्यंत नेता येतात. भारतनिर्माण, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्वशिक्षा अभियान यातून मोठी कामे होऊ लागली आहेत. रस्ते विकासासाठी पंतप्रधान सडक योजनेतून पैसा येऊ लागला आहे.
बाळकृष्णने पुरविलेल्या माहितीनुसार त्याच्या घरात तो स्वतः सोडून चार माणसं होती. वडील, आई, मुलगा, मुलगी म्हणजे एकूण पाच जण. बाळकृष्णला धरून पैकी बाळकृष्णचे वडील आता, या वेळेला तरी घरीच होते. ठरल्याप्रमाणं मी त्यांचा दिनक्रम तपासायला सुरवात केली. त्यासाठी मी स्वतःला "सेट' केलं. त्या आधुनिक कर्त्या पुरुषावर "डोक्यातलं केंद्र' निश्चित केलं.
मुलगी, पत्नी, माता आणि आजीची चौथी भूमिका. कशी निभावता ही चौथी भूमिका? आपले अनुभव पाठवा, असे आवाहन झाले आणि राज्यभरातून पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. या अनुभवकथनातून अनेक मुद्द्यांना विविध ठिकाणच्या महिलांनी स्पर्श केला. आजीची भूमिका बजावणाऱ्या काही महिलांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत... कृतकृत्य झाले... स्मिता करंबेळकर, पुणे. एके दिवशी तीन वर्षांच्या नातवाशी खेळताना मन नकळत भूतकाळात गेले आणि बालपणीचा काळ आठवू लागले.
सर्व पर्यायांमधल्या त्रुटी शोधून, त्या कमी करून त्यांना अधिक कार्यक्षम करून किंवा आणखी वेगळेच पर्याय शोधून जास्तीत जास्त ऊर्जा तयार करणे, हे नॅनो तंत्रज्ञानाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. आज जरी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जानिर्मितीचे संशोधन प्राथमिक अवस्थेत आणि चाचणी स्तरावर असले, तरी पण येत्या एक-दोन शतकांत मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती करण्यात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ निश्चितपणे यशस्वी होतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अर्थकारणाचा विचार केला तर बरेच प्रश्न मनात उभे राहतात. या संस्थांमधील पैसा हा लोकांच्या करातून आलेला असल्याने तो लोकांसाठीच योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे. हा पैसा वापरताना कोणते निकष असायला हवेत आणि कोणत्या बाबींना अग्रक्रम मिळायला हवेत हे आत्ताच ठरवले पाहिजे ज गाचा इतिहास लक्षात घेतला, तर आधुनिक लोकशाही राष्ट्राच्या राज्य व्यवस्थेचा मुळारंभ युरोपमधील नगरराज्यांच्या व्यवस्थेतून सुरू होतो.
"का य केलंय तुम्ही तुमच्या काळात? तुमच्यासारख्या लोकांनी प्रेक्षकांची चव बिघडवली...'' एक नवोदित दिग्दर्शक एका जुन्या जाणत्या नटाला म्हणत होता. या दिग्दर्शकाचा एक सिनेमा नुकताच कुठल्याशा महोत्सवाला जाऊन आला होता... नट हसला. खोल डोहातल्या पाण्यावर तरंग उमटावेत तशा त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या उमटल्या... केसातली चांदी लखकन चमकली. ""आमचं राहू दे, तुम्ही मात्र चांगलं काहीतरी करा... आमच्या शुभेच्छा आहेत पाठीशी.'' तरुण दिग्दर्शक कुत्सितपणे हसला.
"नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करायची?' अशी एक म्हण मराठीत आहे, पण ही म्हण जगातील सगळ्याच स्त्रियांना लागू होते. अमेरिका हा समृद्ध देश. या देशातदेखील घरगुती हिंसाचार कायदा केलेला आहे. अलीकडे अमेरिकेत या कायद्याखाली अमेरिकेचे नागरिक नसलेल्या बिगर अमेरिकन स्त्रियांनादेखील संरक्षण देण्यात आले आहे. तसा तर हा कायदा 1994 मध्ये अमेरिकेत अस्तित्वात आला परंतु त्याचा लाभ अमेरिकेच्या नागरिक असलेल्या स्त्रियांनाच मिळत होता.
विसाव्या शतकातील अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे जगभरात नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. हेमिंग्वेला नोबेल व पुलित्सर हे दोन्ही साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकेतील लेखकांच्या ज्या पिढीला "दि लॉस्ट जनरेशन' संबोधण्यात आले, त्या पिढीचे नेतृत्व अर्नेस्ट हेमिंग्वेने केले. त्याचे जीवन धाडसी व रोमांचक प्रसंगांनी भरलेले आहे.
आझाद हिंद सेनेसमवेत ब्रह्मदेश ते जपान एअर कमोडर रमेश बेनेगल यांनी आझाद हिंद सेनेसमवेत काम केले आहे. 1941 ते 1945 या कालावधीतील थरारक युद्धकथा यामध्ये आहेत. आझाद हिंद फौजेतील सहभागानंतर त्यांना युद्धकैदीही व्हावे लागले. त्यानंतर त्यांना भारतात आणले. काही दिवसांनंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर भारतीय हवाई दलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला त्यांना त्रास झाला. तीन वर्षांनंतर त्यांना संधी मिळाली.
"रा. प. नेने कसे होते असा विचार करते तेव्हा मला वाटते, की नेने म्हणजे अशी एक जागा, एक स्पेस होती, जिथे कुणीही आपली तक्रार, आपला अभ्यास, आपलं लेखन, आपला वैचारिक गोंधळ घेऊन जाऊ शकत असे. त्या व्यक्तीला नेन्यांकडून मोकळेपणाने आणि सढळ हाताने मदत मिळाल्यामुळे त्याच्या मनात हे ठिकाण पुन:पुन्हा येण्यासाठी नक्की होत असे.
"हर' आणि "कार' या दोन फार्सी शब्दांपासून "हरकारा' हा शब्द तयार झाला. "हर' या फार्सी शब्दाचा उपयोग मराठीत व फार्सीत अनेक शब्दांत केल्याचं आढळतं. "हरएक' (फार्सी "हरयक'), हरघडी (फार्सी हर + मराठी घडी), हरकाम्या (फार्सी हर + मराठी काम) ही याची काही उदाहरणं. "हर' आणि "दर' हे दोन्ही फार्सीच शब्द आहेत, व दोन्ही शब्दांचा "प्रत्येक' हाच अर्थ आहे. पण "दर' हा मराठीत जितका लोकप्रिय आहे, तितका "हर' हा नाही.
रजनीशांनी सांगितलेली एक मौलिक गोष्ट... एकदा एक साधू पाठीवर जड सामान घेऊन टेकडी चढत असतो. चढताना त्याला प्रचंड दम लागतो. जरा विसावा घ्यावा म्हणून तो खाली बसतो तो त्याला एक छोटी मुलगी आपल्या छोट्या भावाला पाठीवर घेऊन जाताना दिसते. तो सहज विचारतो "इतकं जड ओझं तू घेऊन चाललीस, तुला दमायला नाही होत?' मुलगी उत्तरते, "ओझे तर तुम्ही घेऊन चालला आहात! माझ्या पाठीवर माझा भाऊ आहे.' लहान भाऊ आणि ओझे यात फरक करण्याचं त्या मुलीचं शहाणपण पाहून साधू अवाक् होतो.