Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


कोकण
सावंतवाडी -  योग व प्राणायामाचा अभ्यास करून शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक प्रगती कशी करावी, हे सांगणारी भारतीय संस्कृती ही सर्वांना संयमाने कसे वागावे हे शिकविते, असे उद्‌गार "पतंजली'च्या प्राणायाम-योगाभ्यासाच्या शिबिरात भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक तुपकर यांनी काढले. सर्वांना निरोगी जीवन जगता यावे, यासाठी येथे पतंजली योग समिती ठिकठिकाणी शिबिरे भरवून तसेच निशुल्क स्थायीवर्गाद्वारे प्रचार-प्रसार करीत आहे.

Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)

लांजा -  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनामत जप्त झालेल्या पराभूत उमेदवारांच्या माध्यमातून शासनाला 16 हजार 300 रुपयांचा महसूल तालुक्‍यातून प्राप्त झाला. तालुक्‍यातील जिल्हा परिषद गटातील नऊ पराभूत उमेदवारांची 6 हजार 500 रुपये, तर पंचायत समिती गणातील 20 पराभूत उमेदवारांची 9 हजार 800 अनामत रक्कम अशी मिळून 19 हजार 300 रुपयांचा महसूल शासनाकडे जमा केला.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

दापोली -  'येत्या चार वर्षांत एलपीजी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. त्यासाठीच स्वस्त आणि मस्त बायोगॅस प्रकल्प अत्यंत किफायतशीर ठरणार आहे. चार माणसांच्या कुटुंबाबरोबरच हॉटेलचालकांसाठीही हे संयंत्र किफायतशीर आहे. हा बायोगॅस घरातील टाकाऊ पदार्थांपासून तयार करता येत असल्याने ही बाब पर्यावरणपूरकच आहे'', असे प्रतिपादन शाश्‍वत ऊर्जा संस्थेचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ दीपक कान्हेरे यांनी केले. जागतिक पातळीवर लोकसंख्या वाढत आहे.

Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)

रत्नागिरी -  जिल्हा परिषद शाळांमधील खेळाडूंच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्यात वाढ करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने खेळाडूंसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. याचा जिल्हा परिषद शाळांमधील खो-खो व कबड्डीच्या खेळाडूंना उपयोग होणार आहे. या योजनेमुळे जिल्हा परिषद शाळेतील खेळाडूंना संघटनांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. कोकणातील हा पहिलाच प्रयोग आहे.

Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)

कणकवली -  एसटी महामंडळाकडील प्रवासीवर्ग खासगी वाहतुकीकडे वळत आहे. त्याचा फटका एसटीबरोबरच परवानाधारक कॅंटीन आणि स्टॉलधारकांना बसत आहे. त्यामुळे या परवानाधारकांना भाड्याच्या दरात सवलती मिळाव्यात, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रमेश ऊर्फ अप्पा रेडीज यांनी येथे केली. जिल्हा एसटी परवानाधारक कॅंटीन आणि स्टॉलधारक असोसिएशनची बैठक येथील एसटी कार्यशाळा गणेश मंदिरामध्ये झाली. यात असोसिएशनचे अध्यक्ष रेडीज यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला ऍड.

Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)

वेंगुर्ले -  तालुक्‍याच्या राजकारणात समाजाबरोबरच आडनावांचा प्रभावही दिसतो. या वेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत परब, गावडे, नाईक, चमणकर आडनावांनी जागा मिळविल्या आहेत पण गेली काही वर्षे निवडून येणाऱ्या ठाकूर आडनावाचा मात्र या वेळी प्रभाव राहिला नाही. बऱ्याच ठिकाणी मतदानावर समाजाचा प्रभाव पडत असतो. त्यानुसार उमेदवार दिला जातो. तालुक्‍यात समाजाबरोबरच आडनावाचा प्रभावही दिसतो.

Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)

चिपळूण -  येथील रॉकेलच्या मागणीपेक्षा निम्म्याहून कमी रॉकेलचा पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. चिपळूण तालुक्‍याला रॉकेलचा ठरलेला कोटा मिळावा, अशी मागणी होत आहे. चिपळूण तालुक्‍यात 67 हजार शिधापत्रिकाधारक ग्राहक आहेत. यातील एपीएल (शुभ्र कार्डधारक) ग्राहकांची संख्या फारच कमी असली, तरी बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांची संख्या त्यामानाने मोठी आहे.

Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)

कणकवली -  गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाने न्यायालयीन लढ्यात बाजी मारल्यामुळे गिरणी कामगारांचा घर आणि नोकरीसाठीचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे कामगारांनी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे यांनी येथे केली. गिरणी कामगारांची सभा येथील बालगोपाल हनुमान मंदिरात झाली. तीत श्री. मसगे यांनी मार्गदर्शन केले.

Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)

सावंतवाडी -  प्रत्येक गीताला मिळणारा रसिकांचा प्रतिसाद आणि त्याच तोडीने झालेले गायक कलाकारांसह वादकांचे सादरीकरण या जोरावर येथे आयोजित कपिल कांबळे प्रस्तूत "स्वरांजली-सप्तसुरांच्या वाटेवर' हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम बहारदार ठरला. निमित्त होते येथील जुनाबाजार येथे सोमवारी (ता. 20) महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाची सुरवात झाली ती सोनाली परब (कोलगाव) हिच्या "शंभो शंकरा करुणा करा' या भक्तिगीताने.

Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)

सिंधुदुर्गनगरी -  शासकीय-निमशासकीय सेवेत नियुक्त असलेल्या विकलांग कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमपणे काम करता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यातूनच या कर्मचाऱ्यांना सहायक साधने देण्यात येणार आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी केले.

Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)

दिवेआगार  - नवजात बालकांसाठी वरदान ठरणारी इनक्‍युबेटर ही उपचार यंत्रणा श्रीवर्धन तालुक्‍यात सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू नसल्याने या उपचाराची आवश्‍यकता असणाऱ्या बालकांच्या पालकांची धावपळ होते. तसेच मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. नयनरम्य निसर्ग सौंदर्यामुळे श्रीवर्धन पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरला आहे. तालुक्‍यातील दिवेआगार, हरिहरेश्‍वर, श्रीवर्धन आदी ठिकाणी काही वर्षांत पर्यटन व्यवसाय भरभराटीला आला आहे.

Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)

खोपोली  - खालापूर तालुक्‍यात आघाडी कागदावर न राहता या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मने जुळण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया निवडणूक निकालानंतर उमटत आहेत. केवळ तांत्रिक बाबींमुळे पंचायत समितीचे सभापती पद राष्ट्रवादीकडे येणार आहे, पण ते टिकविण्यासाठी राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भारिपच्या मदतीने पालिकेतील सत्ता काबीज केली.

Thursday, February 23, 2012 AT 02:15 AM (IST)

देवरूख -  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संगमेश्‍वर तालुक्‍यातील 48 उमेदवारांची अनामत जप्त झाली. यामध्ये जिल्हा परिषदेचे 17, तर पंचायत समितीच्या 31 उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये होणाऱ्या वैध मतदानाच्या एक अष्टमांश पेक्षाही कमी मते ज्या उमेदवाराला मिळतील त्याची अनामत जप्त करण्याची कारवाई करण्यात येते.

Thursday, February 23, 2012 AT 02:15 AM (IST)

गुहागर -  येथील खरे-ढेरे महाविद्यालयात आठ दिवसांचा मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रा. डॉ. सौ. आसावरी बापट यांनी खरे-ढेरे महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे प्रशिक्षण दिले. शासकीय विभागात असलेले जुने दस्तऐवज, वाङ्‌मयीन साहित्य, ऐतिहासिक नोंदी या सर्व ब्राह्मी खरोटी व देवनागरी शारदा मोडी या लिपीमध्ये लिहिल्या आहेत.

Thursday, February 23, 2012 AT 02:15 AM (IST)

रत्नागिरी -  महायुतीकडे बहुमत असतानाही जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने आता भाजपने जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आणि सभापतिपदासाठी आग्रही राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने यासाठी जिल्ह्याची समिती गठित केली असून पदांसाठी आता राष्ट्रवादीकडे सरकल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्‍यता आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 04:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: