नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात दुफळी माजल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच खेळाडूदेखील वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत, त्यामुळे या चर्चांना खतपाणीच मिळत आहे. महत्त्वाची मालिका चालू असताना संघातील हे मतभेद मिटविण्यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच (बीसीसीआय) पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली - ऑलिंपिकसाठी यापूर्वीच पात्र ठरलेल्या दक्षिण आफ्रिका महिला संघाने बुधवारी भारतावर 5-2 असा दणदणीत विजय मिळविला. या विजयाने त्यांनी महिला विभागात शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. त्याच वेळी इटलीने महत्त्वाच्या सामन्यात युक्रेनवर 2-1 असा विजय मिळवून आपले आव्हान राखले. भारतीय महिला आता तिसऱ्या स्थानावर आल्या आहेत. त्यामुळे महिला संघाचा ऑलिंपिकमधील सहभाग संकंटात आला आहे.
नवी दिल्ली - पेनल्टी विशेष तज्ज्ञ संदीप सिंगच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने आज अतिशय रोमांचक ठरलेल्या लढतीत कॅनडाचा 3-2 असा पराभव करून पुरुषांच्या ऑलिंपिक हॉकी पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, भारताच्या महिला संघाला मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे अंतिम फेरीत पोचण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया पराभवाच्या खाईत गटांगळ्या खात असली तरी, संघात कोणतेही वाद किंवा मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आज मुंबईत दिली. भारतीय संघात वाद हे वृत्त केवळ प्रसारमाध्यमांमध्येच चर्चिला जात असल्याचीही टीका त्यांनी केली. आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीसाठी श्रीनिवासन आज मुंबईत आले होते.
मुंबई - केदार जाधवचे नाबाद शतक आणि निखिल पराडकरच्या नाबाद अर्धशतकाबरोबरच दोघांनी केलेल्या 199 धावांच्या भागीदारीने महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. मुंबईत बांद्रा-कुर्ला संकुलात बुधवारी झालेल्या सामन्यात त्यांनी गुजरातचा 43 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राने 50 षटकांत 4 बाद 330 धावांची भक्कम मजल मारली.
पणजी - भारताचा अव्वल बुद्धिबळपटू के. शशिकिरण (एलो 2700) याच्यासह सुमारे 15 ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली 32वी राष्ट्रीय सांघिक आणि दहावी महिलांची राष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ स्पर्धा 27 फेब्रुवारीपासून गोव्यात रंगणार आहे. एकूण नऊ फेऱ्यांची ही स्पर्धा मिरामार येथील क्लब गास्पार डायस सभागृहात खेळली जाईल. स्पर्धा चार मार्चपर्यंत चालेल, अशी माहिती गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आशिष केणी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ऑकलंड - दक्षिण आफ्रिकेने निर्णायक तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर केवळ तीन धावांनी मात केली आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने 166 धावांचे आव्हान दिले होते. किवींनी 3 बाद 142 अशी दमदार मजल मारली होती. त्यांना चेंडूमागे एकापेक्षा कमी धाव अशी सोपी धावगती आवश्यक होती. त्यानंतरही किवींचा पराभव झाला. जेसी रायडर स्वैर फटका मारून बाद झाला. अर्धशतकानंतर जम बसल्यानंतरही त्याने योहान बोथाला स्वैर फटका मारला.
चार वर्षांपूर्वी ब्रिस्बेनमध्येच संभाव्य विजेत्या आणि यजमान ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने तिरंगी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. तीन लढतींच्या अंतिम फेरीतील पहिले दोन सामने जिंकून भारताने वर्चस्व राखले होते. त्यामुळे तिसरा सामना घेण्याची गरजच भासली नव्हती. दुर्दैवाने 2012 मध्ये ब्रिस्बेनचे मैदान भारतासाठी सुदैवी ठरलेले नाही. येथील दोन्ही सामने भारताने मोठ्या फरकाने गमावले. या वेळी धोनीच्या गैरहजेरीत संघ दुबळा झाला होता.
मुंबई- भारतीय क्रिकेट संघात कोणत्याही प्रकारची दरी नाही, असा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी व वीरेंद्र सेहवाग यांच्यातील मतभेद पुढे आले आहेत. क्षेत्ररक्षणात सुस्त असल्यामुळे रोटेशन पद्धत अवलंबिली जात असल्याचे आपल्याला माहिती नाही, असे सेहवागने म्हटले होते.
वॉशिंग्टन- भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागची युवराजसिंगने ट्विटरवर प्रतिक्रिया देऊन पाठराखण केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या सेहवागची सध्या कामगिरी खालावली आहे. त्यामुळे सेहवागला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याला संघातून काढून टाकण्याचीही मागणी होत आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गंभीर, सेहवाग व सचिनला आळशी खेळाडू म्हटले होते. युवराजसिंगला कॅन्सर झाला असून, त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत.
दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (बुधवार) जाहीर केलेल्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या स्थानासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांमध्ये जोरदार चुरस आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारत आणि दक्षिण आफ्रिका ११६ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंका ११३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपल्या एकदिवसीय कारकिर्दीविषयी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. सचिनने वनडेमध्ये कामगिरी चांगली होत असेल तरच खेळावे, अन्यथा निवृत्तीचा निर्णय घ्यावा, असे गांगुलीने म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाला, ''एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपण चांगली कामगिरी करत आहोत कि नाही, हे सचिनने स्वतःलाच विचारणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली - पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट संदीप सिंगने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक केल्यामुळे भारताने ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळविला. भारतीयांनी आज धडाकेबाज खेळ केला. कोणीही आपल्याला आव्हान देऊ शकत नाही, हे दाखवून देताना फ्रान्सचे आव्हान 6-2 असे लीलया परतवले. फ्रान्स भारतास कडवी लढत देईल अशी अपेक्षा होती, पण भारतीयांनी सुरवातीपासून आक्रमक खेळ करीत फ्रान्स बचावपटूंची चांगलीच दमछाक केली.
ब्रिस्बेन -  टीम इंडियाची ऍडलेडमधील चांगल्या खेळाची नशा ब्रिस्बेनच्या दोन सामन्यांत खाडकन उतरली. तीन दिवसांत दोन पराभवांना सामोरे जावे लागल्याने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारतीय संघाची अवस्था अचानक बिकट झाली आहे. ऍडलेडच्या विजयानंतर गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ सर्वांत शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला.
बिस्ब्रेन -  तिरंगी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाकडून अवलंबण्यात येणाऱ्या "रोटेशन' पद्धतीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू असली, तरी मंगळवारी वीरेंद्र सेहवाग याने काय चाललेय तेच मला कळत नाही, असे सांगून संघात दुफळी माजल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या क्षेत्ररक्षण क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.