Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


मधुरांगण
सोन्यात किंवा भिशीत गुंतवणूक करण्याचा विचार स्त्री नेहमी करते, पण रियल इस्टेट किंवा फ्लॅटमधली गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे. जाणून घ्या योग्य परताव्यासाठी अशा गुंतवणुकीचा कसा कराल विचार?.... रियल इस्टेट म्हटलं की डोळ्यांसमोर येतात भव्य, अवाढव्य बांधकाम प्रकल्प, सर्व सुख-सोयी असलेल्या मोठ्या सोसायट्या. रियल इस्टेटमध्ये फायदा किती प्रचंड आहे हे सांगायला कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही. जागेतील भाववाढीमुळे खूपजण सधन, श्रीमंत झाले.

Wednesday, February 22, 2012 AT 04:02 PM (IST)

स्तनाचा कॅन्सर असलेल्या स्त्रियांचं प्रमाण मुंबईत 33.1 टक्के, नागपुरात 29 तर पुण्यात 25 टक्के आहे. गेले काही दिवस हे प्रमाण वाढतच आहे. चाळिशीचा टप्पा पार करताना एखाद्या स्त्रीला कॅन्सर झाल्याचं कळलं की तिचं आयुष्य थांबतं. अशी अनेक आयुष्यं आनंदाने जगावीत यासाठी प्रयत्न करत आहे पुण्याची "आस्था' संस्था. यंदा या संस्थेला 10 वर्षं पूर्ण होत आहेत. फेब्रुवारी महिन्यातील कर्करोगदिनानिमित्त हे दिव्य पार केलेले अनुभव आणि "आस्था'च्या पाठिंब्याबद्दलही...

Wednesday, February 22, 2012 AT 03:48 PM (IST)

निरक्षरतेतून साक्षरतेकडे...अज्ञानातून ज्ञानाकडे...दुर्बलतेतून सबलतेकडे...जयाबाई घाटगे यांचा लढाऊ प्रवास आहे असा वेगवेगळ्या टप्प्यांवरचा. झोपडपट्टीच्या बकालपणाला भेदून जयाबाईंनी प्रगतीची रोपलावण जागोजागी केली, अख्ख्या वसाहतीला उजेडाकडे नेलं, त्याची ही कहाणी. सकाळ उगवली की रोज नवी तक्रार... आज काय, एकीला नवऱ्याने मारलं. उद्या काय, दुसरीवर बलात्कार झाला...परवा काय, तर कोणावर चोरीचा आळ आला....

Saturday, February 18, 2012 AT 06:07 PM (IST)

भरपूर मोठा मित्रपरिवार असणे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. सोशल नेटवर्किंग साइट्‌समुळे तर नवीन मित्र तयार करणे, टिकवणे हे सोप्पं झालं आहे. त्यामुळेच एखाद्याच्या ऑर्कुट, फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये पाचशे ते हजार मित्र-मैत्रिणींची यादी दिसली तरी आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. पण भरपूर मोठी फ्रेंड लिस्ट असणाऱ्यांनी टेंभा मिरवण्याची अजिबात गरज नाही, असं ऑक्‍स्फर्ड विद्यापीठातील संशोधकांचं म्हणणं आहे.

Saturday, February 18, 2012 AT 12:00 AM (IST)

पंजाबी ड्रेसचे पॅटर्न कोणत्याही वयात आणि कोणालाही शोभतात. अगदी ऑफिस मीटिंग असो किंवा एखादा समारंभ. सध्याचे पंजाबी ड्रेस प्रकारातले हे वेगवेगळे ट्रेंड... अंगरखा-केडिया पंजाबी ड्रेस- लग्नकार्यात किंवा तशाच एखाद्या समारंभात हा प्रकार नक्कीच उठून दिसतो. या प्रकारात सिल्कच्या ड्रेसवर जॅकेट शोभून दिसतं. जॉर्जेट किंवा नेटमधल्या कपड्यांचा वापर करून जॅकेट तयार केलेलं असतं. जॅकेटवरचं जामा वर्क, एम्ब्रायडरी त्याला रिच लुक आणतात.

Saturday, February 18, 2012 AT 06:04 PM (IST)

मंजीचं लग्न करून देताना आई-बापांनी लाडक्‍या लेकीला गावातल्या शेतीभातीत काम करायचा त्रास नको म्हणून ज्याला आई-बाप, भाऊ-बहिणी कोणी नाहीत असा बाजूच्या गावचा पण सध्याच्याला मुंबैला असलेला चाकरमान्या नवरा करून दिला पण तिथेच मंजीचं नशीब रुसलं. त्या लग्नाने मंजीचं आयुष्यच उल्टंपाल्टं झालं... रोजच्यासारखंच सगळी कामं आटोपल्यानंतर मंजी घराबाहेर येऊन रोज या वेळेला गावात येणाऱ्या टपाल्याची वाट बघायला लागली.

Wednesday, February 15, 2012 AT 03:19 PM (IST)

प्रत्येक स्त्रीकडे पाहण्याची पुरुषाची एक नजर असते. जन्मापासून स्त्रीची वेगवेगळी रूपं समोर येत असतात. कधी समोर येणाऱ्या स्त्रीवरून पुरुषी मन स्त्रीचं एक रूप मनात साठवतं. पुरुष म्हणून आयुष्यात कोणत्या टप्प्यावर स्त्रीचं कोणतं रूप भावलं किंवा स्त्री म्हणून मनात कोणती प्रतिमा तयार झाली?...मनातल्या स्त्री प्रतिमा शब्दांतून चितारल्या आहेत प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी.... एक औंधच्या राजाचं चित्र-शिल्प म्युझियम.

Tuesday, February 14, 2012 AT 03:56 PM (IST)

होळीपाठोपाठ येते ती रंगपंचमी. या रंगपंचमीच्या निमित्ताने तुम्हीही रंगात न्हाऊन निघत असाल. मग अशा रंगलेल्या चेहऱ्यांचे फोटो...कधी तरी फोटो चाळता चाळता त्या धमाल आठवणी...तुमच्याबाबतही असं होतच असेल. "तनिष्का'शी शेअर करा तुमच्या या आठवणी, तुमच्या रंगपंचमीच्या फोटोसह. तुमचा फोटो मिळू दे 15 फेब्रुवारीपर्यंत, त्यासोबतच्या आठवणीही...आम्ही प्रसिद्ध करू "तनिष्का'च्या मार्चच्या अंकामध्ये.

Tuesday, February 14, 2012 AT 03:50 PM (IST)

"व्हॅलेंटाइन डे' जवळ आला की धांदल सुरू होते ती प्रेम व्यक्त करण्याची. माणसांसारखंच काही वेळा असतं पक्ष्यांचं जग. रूक्ष वाटणाऱ्या माळरानात जोडीदार शोधण्यापासून ते पिलं मोठी होऊन उडून जाईपर्यंत काही पक्षी प्रजातींसाठी हंगामापुरता तर काही पक्ष्यांसाठी आयुष्यभर प्रत्येक दिवस "व्हॅलेंटाइन डे'च असतो. कधी एखादा पक्षी आपल्या "पार्टनर' साठी अन्न साठवून ठेवतो. तर कधी लव्ह बर्डस विरहाने झुरून मरतात. माणसांमधल्या सहजीवनाचे पैलू आपण ऐकतो, पाहतो.

Monday, February 13, 2012 AT 06:13 PM (IST)

आजचं प्रेम खूप "स्वस्त' झालंय का, असा प्रश्‍न अनेकदा समोर येतो. आजच्या पिढीला काय वाटतं प्रेमाबद्दल?... प्रेमाबद्दलचं युवा पिढीचं हे प्रातिनिधिक मत, खास "व्हॅलेंटाइन डे' च्या निमित्ताने... "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं..' पाडगावकरांची किमान ही ओळ तरी बहुतेकांनी कधी ना कधी ऐकली असेल, त्यातली मजा मनोमनी अनुभवलेली असेल.

Monday, February 13, 2012 AT 06:08 PM (IST)

अलीकडे अनेक रिऍलिटी शोजमधून प्रेमाचं नाटकीकरण दिसत असतं. जगात जेव्हा "ब्लॅकबेरी' आणि "ऍपल' नव्हते तेव्हापासून सहजसुंदर प्रेमाचे आपण साक्षीदार आहोत. आताही ते अगदी तशाच प्रकारचं असावं असं नक्कीच अपेक्षित नाही. पण त्याच्या देखाव्याशिवायही कधी तरी राहून बघावं. फेब्रुवारी महिन्यातील "व्हॅलेंटाइन डे'निमित्त जाणून घेऊ प्रेम नव्या नजरेतून...

Wednesday, February 08, 2012 AT 06:50 PM (IST)

प्रवासाला जाताना आपला उद्देश काय आहे हे आधी निश्‍चित करावं. आपण स्थलदर्शनासाठी जातोय का कुटुंबासमवेत आराम करायला जातोय हे ठरवावं आणि त्यानुसार जाण्याचं ठिकाण निवडावं. कपडे- कुठेही गेलात तरी कपडे हे सुटसुटीत असावेत ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणच्या हवामानानुसार कपड्यांची निवड करावी. थंड हवामानाच्या जागी अंग पूर्ण झाकणारे सुती कपडे न्यावेत. साड्या शक्‍यतो टाळा. पंजाबी सूट चालेल.

Wednesday, February 08, 2012 AT 05:56 PM (IST)

पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो आणि त्यासह सुरू होते ती दिवसाची प्रसन्नता. पक्ष्यांचं नातंच आपल्या उल्हासाशी जोडलं गेलं आहे. अनेकदा पक्ष्यांचे थवे न्याहाळतच राहावं असं वाटतं. कधी जंगलाच्या वाटेवर तर कधी एखाद्या ठिकाणी परदेशातला पाहुणा म्हणून वेगवेगळे पक्षी भेटतात. आपल्या दारातला आणि परदेशातला "पाहुणा' आपल्याला कधी आणि कुठे भेटतो हे भटकंतीच्या निमित्ताने आवर्जून जाणून घ्यायला हवं, आणि त्याला भेटायचं तर त्यासाठी तयारीही हवीच ना!...

Tuesday, February 07, 2012 AT 07:22 PM (IST)

फुलांचं सौंदर्य वादातीतच. गुलाबाचा ताटवा असो किंवा एखादं रानफूल, त्याचा मोह सगळ्यांनाच असतो. आपला देश अशाच सौंदर्याने नटलेला आहे. कुठे कुठे लपलं आहे हे सौंदर्य?... खास फुलांचं सौंदर्य नजरेत साठवायला तुम्ही काढू शकता यंदाच्या सुट्टीतली खास सहल. त्यासाठीच जाणून घ्या कुठे कुठे आहे हा निसर्गाचा नजराणा... नि सर्गाच्या रंगांची उधळण पाहायला मला आवडतं. आपण अनेकदा फिरायला जातो. काही विशिष्ट ठिकाणं पाहायला जातो, तसंच फुलं पाहायलाही जायला हवं.

Monday, February 06, 2012 AT 04:55 PM (IST)

मंदिरं म्हटली की सहसा फक्त मोठ्या देवस्थानांना देवदर्शनासाठी जाण्याचा विचार होतो. पण मंदिर हा आपल्याकडचा एक प्राचीन आणि सुंदर वास्तुप्रकार आहे. त्याचं सौंदर्य बघण्यासाठी म्हणूनही कधी तरी जावं. काहीशी अपरिचित, आडवाटांना असलेली बरीच प्राचीन मंदिरं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांमध्ये गिरिस्थानं, गड-कोट-किल्ले, लेणी यांचा जेवढा बोलबाला झाला आहे तेवढा प्राचीन मंदिरांचा झालेला नाही.

Monday, February 06, 2012 AT 04:49 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: