Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


महाराष्ट्र
मुंबई -  मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले कृपाशंकर सिंह सुमारे 40 वर्षांपूर्वी मुंबईत आले, तेव्हा ते कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय करायचे. मात्र राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांचे दिवस पालटले कोट्यवधींची स्थावर-जंगम मालमत्ता त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर जमा होऊ लागली. विमान खर्चापासून फ्लॅटच्या भाड्यापर्यंत अनेक व्यवहारांची कागदपत्रे दाखल न करण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.

Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई -  देश लवकरच पोलिओमुक्त होईल, असा विश्‍वास राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज व्यक्त केला. आदित्य बिर्ला समूह, रोटरी इंटरनॅशनल आणि मुंबई महापालिका यांच्यातर्फे राजभवन येथे आयोजित पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. भारतात गेल्या वर्षभरात कुठेही पोलिओचा रुग्ण आढळला नाही. पोलिओ निर्मूलनासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि स्वयंसेवी संस्था एकत्रित प्रयत्न करत असल्यामुळे हे शक्‍य झाले आहे, असे राज्यपाल म्हणाले.

Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई -  उच्च शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण खूपच नगण्य आहे. त्यामुळे मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने राज्यभरात 10 ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचा तत्त्वतः निर्णय राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले.

Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)

विविध महापालिकांत आणि विशेषत: नाशिकमध्ये मनसेचे नगरसेवक काय कामगिरी करून दाखवितात, यावर त्या पक्षाचे आव्हान किती व कसे वाढणार, हे अवलंबून आहे. राज ठाकरे यांचा पक्ष कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मराठी मते खेचतो आहे, हे या पक्षांनी लक्षात ठेवायला हवे. महापालिका निवडणुकांच्या निकालांतून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वच मोठ्या शहरांत आपले हातपाय पसरायला सुरवात केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Thursday, February 23, 2012 AT 02:00 AM (IST)

आंबेगाव तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मतदारांना दहशत केली. आमिष दाखविले. त्यामुळे तेथे शिवसेनेच्या विरोधात निकाल गेल्याचा आरोप खासादार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेची पीछेहाट झाली नसल्याचाही त्यांचा दावा आहे. प्रश्‍न - आंबेगाव तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालाविषयी आपण समाधानी आहात काय? उत्तर - नक्कीच नाही. खरं तर अधिक चांगल्या निकालाची अपेक्षा होती.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - पश्‍चिम भारतावर चक्रावात विरोधी स्थिती निर्माण झाल्याने सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढली आहे, तसेच निरभ्र आकाशामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पारा चढला असून, अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा पाच अंशांनी वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. चक्रावात विरोधी स्थितीमुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण घटले आहे.

Thursday, February 23, 2012 AT 12:00 AM (IST)

बीड - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस मंगळवारी (ता.28) एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर द्यावयाचा लाभ तसेच एप्रिल 2011पासून जाहीर केलेली मानधन वाढ ही बऱ्याच ठिकाणी मिळालेली नाही. अन्य मागण्यांसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे.

Thursday, February 23, 2012 AT 12:00 AM (IST)

माळेगाव - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले. त्यासाठी स्थानिक नेत्यांबरोबरच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्‍याने निवडून आणले. त्यामुळे माळेगावच्या राजकारणात उदयास आलेल्या शिवराज जाधवराव, रणजित तावरे, स्वरूप वाघमोडे, जयदीप तावरे या नवीन चेहऱ्यांची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

Thursday, February 23, 2012 AT 12:00 AM (IST)

बारामती -येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रास "महिंद्रा समृद्धी ऍग्री ऍवॉर्ड 2012'अंतर्गत दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील "कृषी सहयोग सन्मान' मंगळवारी (ता. 21) नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केंद्राच्या प्रमुख डॉ. सौ. टी. ए. कादरभाई व विषय विशेषज्ञ संतोष गोडसे यांनी हा सन्मान स्वीकारला.

Thursday, February 23, 2012 AT 12:00 AM (IST)

बीड - केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. विमल मुंदडा अद्याप "आयसीयू'मध्येच आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. मुंदडा गेल्या चार वर्षांपासून आजारी आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत इन्फेक्‍शन झाल्याने त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या हिंदुजा रुग्णालयाच्या "आयसीयू' कक्षात त्यांच्यावर डॉ. डावर उपचार करीत आहेत.

Wednesday, February 22, 2012 AT 11:15 PM (IST)

मुंबई- दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आठ महानगरपालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत आज (बुधवार) जाहीर झाली. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, मीरा भाईंदर, भिवंडी, धुळे आणि नांदेड महापालिकांचा समावेश आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज दुपारी दोन वाजता मंत्रालयात सोडतीद्वारे ही आरक्षण जाहीर केली. नाशिक, नवी मुंबईत महापौरपद खुल्या गटासाठी तर कल्याण-डोंबिवली ओबीसी महिलांसाठी तर ठाणे ओबीसीसाठी राखीव आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 02:39 PM (IST)

मुंबई -  'जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने आघाडी करून निवडणूक लढविलेल्या ठिकाणी सत्तेवर येताना पदवाटपाचा फॉर्म्युला कॉंग्रेस पक्षाने तयार केला आहे. तो लवकरच जाहीर करू,'' असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 04:00 AM (IST)

मुंबई -  उत्तर भारतीयांविरुद्ध 2008 मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत संमतीच दिली नसल्याचे आज उच्च न्यायालयात उघड झाले. त्यामुळे या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी 2008 मध्ये नोंदवलेले गुन्हे उच्च न्यायालयाने आज रद्द केले. राज ठाकरे यांनी एका अर्जद्वारे तशी मागणी केली होती. न्या. विद्यासागर कानडे आणि न्या.

Wednesday, February 22, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई -  जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांत राष्ट्रवादीची "प्रगती एक्‍स्प्रेस' राज्यभरात धावली नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिलेले "सर्वाधिकार' हेच पक्षाच्या कूर्मगतीला जबाबदार असल्याचे उघड झाले असून, पक्षांतर्गत लोकशाहीचा फेरविचार करण्याचा मानस राष्ट्रवादीत व्यक्‍त होत आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्ली येथे सोमवार (ता.

Wednesday, February 22, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई -  तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रिक्षाच्या इलेक्‍ट्रॉनिक मीटरचे घोडे अखेर गंगेत न्हाले असून, राज्यभरातील नवीन रिक्षांना एक मार्चपासून, तर जुन्या रिक्षांना एक एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने इलेक्‍ट्रॉनिक मीटर बसवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याबाबतची अधिसूचना मंगळवारी राज्य सरकारने जारी केली आहे. टॅक्‍सीप्रमाणे ऑटो रिक्षालाही इलेक्‍ट्रॉनिक मीटर बसवण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 03:30 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: