Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


मनोरंजन
मुंबई - जर तुम्ही सलमान खानला बॉलिवूडचा दबंग समजत असाल, तर तुमचा हा गैरसमज काढून टाका. कारण जर सलमान शेर असेल, तर शाहरूखला सव्वा शेर म्हणावे लागेल. माझा चेहरा रोमॅंटिक असला तरी घाबरण माझ्या स्वभावात नसल्याचे त्याने सांगितले आहे. हे केवळ त्याचे म्हणणे नाही. तर, एका पुरस्कार वितरण सोहळ्यात शाहरूखला चक्क फिअरलेस मेल ऑफ ऑल टाइम या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले आहे. अचानक हा पुरस्कार दिला गेल्याने सर्वांनाच आश्‍चर्य वाटले आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 07:02 PM (IST)

मुंबई - चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी चित्रपट आले आणि गेलेही. काही वेगळ्या विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर, काही चित्रपट साफ आपटले. सध्या तर, सर्वच चित्रपट तिकीट बारीवर कोसळत आहेत. या परिस्थितीतच राजकुमार गुप्ता एक डार्क कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अर्थात डर्टी पिक्‍चरमधून धीरगंभीर भूमिका करणारी विद्या बालन या चित्रपटात प्रेक्षकांना घनचक्‍कर करणार आहे. त्यात तिला साथ देणार आहे इमरान हाश्‍मी.

Wednesday, February 22, 2012 AT 07:05 PM (IST)

मुंबई - इल्यूमिनाटी फिल्मस् चा एजंट विनोद हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होत असताना अभिनेता दिग्दर्शक सैफ अली खान या चित्रपटाच्या प्रचारासाठी एकही संधी गमावू इच्छित नाही. चित्रपटाच्या प्रचार तसेच विपणनाचा भाग म्हणून जगातील सर्वात मोठी फास्टफूड कंपनी मॅकडॉनल्डसोबत हात मिळवणी करुन "एजंट विनोद" या कॉमिक्सचे निर्माण करण्यात आले. आणि आता हे कमी नव्हते म्हणून सैफचा प्लेस्टेशन-३साठी "एजंट विनोद" हा नवीन खेळ सुध्दा प्रदर्शित करण्याचा मानस आहे.

Wednesday, February 22, 2012 AT 07:23 PM (IST)

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील कलाकारांचं एकमेकांशी सूत जुळलं असल्याच्या बातम्यांना ऊत येतो. मात्र, एकदा का चित्रपट प्रदर्शित झाला तर या बातम्यांचा मागमूसही लागत नाही. "रॉकस्टार' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी रणबीर कपूर आणि नरगिस फक्री यांच्या प्रेमसंबंधांबाबत बऱ्याच बातम्या आल्या होत्या. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नरगिस चित्रपटसृष्टीतून गायब झाली होती पण आता मात्र आपण अजूनही रणबीरच्या प्रेमात असल्याचा खुलासा तिनं केलाय.

Tuesday, February 21, 2012 AT 12:00 AM (IST)

"नो वन किल्ड जेसिका', "द डर्टी पिक्‍चर' हे गेल्या वर्षी यशस्वी ठरलेल्या चित्रपटांमुळेच तसेच आता येणाऱ्या "कहानी'मुळे विद्याची गाडी अगदी भन्नाट वेगाने सुटलेली आहे. तिच्याकडे ढीगभर चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत पण सततचं शूट आणि धावपळ आदींमुळे विद्याला मात्र सध्या ब्रेक हवाय. "कहानी' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आपण काहीसा ब्रेक घेऊ, असं विद्यानं सांगून टाकलंय.

Tuesday, February 21, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई- महाशिवरात्रीनिमित्त बॉलिवूड अभिनेता सलमान खानने कुटुंबासह कर्जत येथील फार्म हाऊसवर जाऊन आज (सोमवार) शंकराच्या मंदिरात पूजा व आरती केली. सलमानची भूमिका असलेला 'एक था टायगर' या चित्रपटाचे क्‍यूबा या देशात चित्रीकरण सुरू आहे. महाशिवरात्रीसाठी तो रविवारी (ता. 19) तो मुंबईत आला आहे. सलमान महाशिवरात्रीबरोबरच, गणेशोत्सव व ईद हे सण तो उत्साहात साजरे करतो.

Monday, February 20, 2012 AT 06:03 PM (IST)

मुंबई - "द डर्टी पिक्‍चर' या चित्रपटामुळे विद्या बालनचे नशीब चांगलेच फळफळले आहे. आतापर्यंत झालेल्या प्रमुख पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिने बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे चार पुरस्कार पटकावून तिने चौकार लगावला तर "रॉकस्टार' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे तीन पुरस्कार मिळवून रणबीर कपूरने "हॅटट्रिक' साधली. महत्त्वाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवल्यामुळे या दोघांचे हिंदी चित्रपटसृष्टीत कौतुक केले जात आहे.

Sunday, February 19, 2012 AT 12:30 AM (IST)

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांतील "मालमसाला' हिंदी चित्रपटसृष्टीला चांगलाच भावलेला आहे. कित्येक दाक्षिणात्य चित्रपट "डब' किंवा "रिमेक' होऊन हिंदीत आले आहेत. हिंदी चित्रपटांनीही "दक्षिणवारी' केलेली आहे. मराठी चित्रपटातही असा प्रकार काही अंशी झाला असला, तरी आता अस्सल "दक्षिणी मालमसाला' असलेला "संभा : आजचा छावा' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. देवेंद्र चौगुले या तरुणाने हे धाडस केले आहे.

Sunday, February 19, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. "मी सर्वांची माफी मागतो. माझ्या प्रकृतीत काही नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत मी तुम्हाला आताच काही सांगू शकत नाही,'' असे त्यांनीच काल (ता. 15) ट्विटरवरून चाहत्यांना कळवले आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात अमिताभ बच्चन यांना गेल्या शुक्रवारी (ता. 10) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पोटावर शनिवारी (ता. 11) दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

Thursday, February 16, 2012 AT 05:33 PM (IST)

मुंबई - "कलयुग', "ट्रॅफिक सिग्नल', "सुपरस्टार' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोज्वळ आणि काहीशी सालस भूमिका साकारणाऱ्या कुणाल खेमूने आता आपली इमेज बदलायला सुरुवात केली आहे. महेश भट यांच्या आगामी "ब्लड मनी' या चित्रपटात तो वेगळी भूमिका साकारणार आहे. आजवर इम्रान हाश्‍मीला "सीरियल किसर' असे म्हटले जात होते. पण आता कुणाल खेमूची सीरियल किसर अशी इमेज निर्माण होणार आहे.

Thursday, February 16, 2012 AT 01:00 AM (IST)

थरारक ऍक्‍शनपटांचा 'हिरो' जेम्स बॉंड ज्या लेखकाच्या कल्पनेतून अवतरला, त्या इयान फ्लेमिंगनं लहान मुलांसाठी एक कादंबरी लिहिली. आणि बॉंडपटांच्या निर्मात्यानं त्यावर एक तेवढीच ऍक्‍शन पॅक्‍ड फिल्म बनवली, ती म्हणजेच "चिटी चिटी बॅंग बॅंग!' "चिटी चिटी बॅंग बॅंग' या सिनेमाची पटकथा लिहिणारा माणूसही साधासुधा नव्हता. तो होता प्रसिद्ध लेखक रोआल डाल. या सिनेमात काय नाही? मुलांना आणि मोठ्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यात ठासून भरल्या आहेत.

Wednesday, February 15, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - रेखा म्हणजे सळसळता उत्साह... तिच्या आरसपानी सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने कित्येक घायाळ झाले आहेत. आजही तिचे चाहते तितकेच आहेत. तिच्याबद्दल जाणून घ्यायला आणि वाचायला त्यांना तितकीच उत्सुकता असते. त्यामुळे आपल्या या चाहत्यांसाठी सौंदर्याची मल्लिका रेखाने चक्क एक नाही तर तीन गाणी गायलेली आहेत. त्यापैकी उ...ला...

Tuesday, February 14, 2012 AT 01:15 AM (IST)

कॅलिफोर्निया -  जगविख्यात पॉप गायिका आणि अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन (वय 48) हिचा आज येथे संशयास्पद मृत्यू झाला. बेव्हर्ली हिल्स येथील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह आढळला. व्हिटनीच्या अशा अचानक जाण्याने संगीतजगतातून हळहळ व्यक्त झाली. व्हिटनीचा मृत्यू ही बातमी दुर्दैवाने खरी बातमी असून तिच्या मृत्यूच्या कारणाविषयी आताच काही बोलता येणार नाही, असे तिच्या प्रवक्‍त्या जिली फ्रीटझो यांनी सांगितले.

Monday, February 13, 2012 AT 01:00 AM (IST)

"तिस मार खॉं'मधील शीला आणि आता "अग्निपथ'मधल्या चमेलीनं सगळ्यांनाच वेड लावलं आहे. "कॅट'ची अर्थात कतरिना कैफची मेंटेन्ड फिगर हे त्यामागचं महत्त्वाचं कारण. हे फिजिक मिळवण्यासाठी तिनं व्यायाम आणि योगाला जवळ केलं. आठवड्यातून तीन दिवस एक तास ती व्यायामाला देते. "हेल्दी माईंड आणि हेल्दी डाएट इज की ऑफ फिटनेस,' हे तिचं मत. आयसो प्लॅंक्‍स, जिमिंग, स्विमिंग, जॉगिंग आणि योगा करून ती मन आणि शरीर फिट ठेवते.

Monday, February 13, 2012 AT 12:45 AM (IST)

मुंबई - अभिनेत्री ईशा देओलचा भारत तखतानी यांच्याबरोबर आज (रविवार) मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. या कार्यक्रमाला तिचे वडील आणि अभिनेते धमेंद्र आणि आई हेमा मालिनी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक मोठी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या वेळी देओल कुटुंबीयांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ईशाच्या जुहू येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला.

Sunday, February 12, 2012 AT 07:13 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: