Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


मराठवाडा
आष्टी - बाहेर सुरक्षा व्यवस्था ठेवून आत परीक्षा केंद्रांमध्ये अतिशय कडक पद्धतीने परीक्षा सुरू असल्याचा शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाकडून आव आणला जात आहे. तरीही आतून मात्र कॉपीचा सर्रास तमाशा सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत एकूण पंधरा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना रस्टिकेट करण्यात आले आहे. आष्टी तालुक्‍यात मंगळवारपासून (ता. 21) बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे.

Thursday, February 23, 2012 AT 01:15 AM (IST)

औरंगाबाद - नगर येथील अशोक लांडे खूनप्रकरणात साक्षीदारांना पैसे देऊन त्यांना साक्षीपासून वंचित ठेवल्याच्या गुन्ह्यात आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नियमित जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी सरकार पक्षाला या प्रकरणात तपास कधी पूर्ण करणार आहात तसेच दोषारोपपत्र कधी दाखल करणार आहात, याची विचारणा केली. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी (ता.23) ठेवण्यात आली आहे.

Thursday, February 23, 2012 AT 01:15 AM (IST)

लातूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक होऊन पाच दिवसही होत नाही तोच, भारतीय जनता पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या पक्षाने शहरात ठिकठिकाणी कॉंग्रेसवर टीका करणारे फलक शहरभर लावले आहेत. तर जिल्हाध्यक्ष रुपाताई पाटील-निलंगेकर यांनीही एक बैठक घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीला आमदार सुधाकर भालेराव, माजी खासदार डॉ.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

केज - कॉपीमुक्तीची मोहीम गतिमान करत, भरारी पथकाने केज तालुक्‍यातील 19 विद्यार्थ्यांना बुधवारी रस्टिकेट केले. कारवाई झालेल्यांमध्ये सारणीच्या विठ्ठल उच्च माध्यमिक विद्यालयातील 12, तर दहिफळच्या श्‍याम कनिष्ठ महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातून कॉपीला हद्दपार करण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. नक्कलबहाद्दर विद्यार्थ्यांसह जबाबदार पर्यवेक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

बीड - शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कर्मचारी, सुशिक्षत नागरिकांच्या एस. टी. कॉलनी, शिक्षक कॉलनी, छत्रपती कॉलनीमध्ये अवैध प्रवासी वाहतूक, तुंबलेल्या नाल्या, कचराकुंड्यांचा अभाव आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील बसस्थानकाच्या मागील भागात डी. पी.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

हिंगोली - परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखांमधून सर्व्हिस चार्जच्या नावाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून दोन वेळा प्रत्येकी शंभर रुपये कपात करण्यात आले आहेत. सदर कपात अनधिकृत असल्याचा आरोप सेवानिवृत्त शिक्षकांनी केला आहे. सदर रक्कम तातडीने परत देण्याची मागणीही बॅंकेकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत सेवानिवृत्ती वेतन दिले जाते.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

लातूर - तीनवेळा लिलाव घेऊनही तालुक्‍यातील अनेक वाळू घाटांची विक्री यंदा झाली नाही. याचा फायदा घेऊन वाळू माफियांनी घेण्यास सुरवात केली आहे. यामुळे प्रशासनाने आता वाळू माफियांना लक्ष्य केले असून दोन दिवसांत केलेल्या कारवाईत अकरा वाहनांकडून एक लाख तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यातील विविध नदीपात्रात असलेल्या वाळू घाटांच्या विक्रीतून यंदा 22 कोटी रुपयांचे महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

औरंगाबाद - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत बुधवारी हिंदी विषयाचा पेपर झाला. आज दुसऱ्या दिवशीही जोरदार कॉपीमुक्‍त अभियानाची मोहीम राबविण्यात आली. औरंगाबाद, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये 57 जणांविरुद्ध कॉपी प्रकरणात कारवाई करण्यात आली. मंगळवारपासून (ता. 21) बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाबरोबरच महसूल विभागाची स्वतंत्र यंत्रणा कॉपीमुक्‍ती अभियान राबवीत आहे.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

नांदेड - आठ महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत बुधवारी (ता. 22) मुंबईत जाहीर झाली. तीत नांदेड महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी जाहीर झाल्याचे समजताच नांदेड महापालिकेत अनेक पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबईत नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता मंत्रालयात आठ महापालिकांच्या महापौरपदांची आरक्षण सोडत जाहीर झाली. नांदेड महापालिकेची मुदत येत्या ऑक्‍टोबरमध्ये संपत आहे.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

बीड - इयत्ता दहावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी "सकाळ माध्यम समूह' आणि आयुर्वेद व्यासपीठ शाखा बीड यांच्या संयुक्त सहकार्याने बीडमधील सहा शाळांमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा म्हटले, की विद्यार्थी आणि पालकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होते. काही जण वर्षभर अभ्यास करूनही अनेक जण ऐन परीक्षेच्या काळात आजारी पडतात. काही जण परीक्षेच्या तणावाखाली येऊन घाबरतात.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

हिंगोली - कुपोषणमुक्त ग्राम मोहिमेच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार तातडीने थांबवावेत. कर्मचाऱ्याचे रखडलेले मानधन त्वरित द्यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील 1 लाख 90 हजार अंगणवाडी कर्मचारी मंगळवारी (ता.28) एकदिवसीय संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

लातूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संपल्या. याला पाचही दिवस उलटत नाहीत तोच महसूल अधिकाऱ्यांच्या मागे वसुलीसाठी शासनाचा ससेमिरा सुरू झाला आहे. आता वसुलीच्या कामाला लागा, अशा सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून उसंत घेत असलेल्या अधिकाऱ्यांना आता वसुलीसाठी फिरावे लागत आहे. गेला एक महिना निवडणुकीच्या कामात महसूल व इतर अधिकारी कार्यरत होते. त्यामुळे वसुलीच्या कामाकडे फारसे लक्ष देता आले नाही.

Thursday, February 23, 2012 AT 01:00 AM (IST)

नांदेड - गेल्या दहा दिवसांपासून नाईकनगर, टिळकनगर, पीरनगर आदी भागांत अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी (ता.22) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग्यनगर ते आनंदनगर रस्त्यावर सार्वजनिक "अंघोळी आंदोलन' केले. नांदेड शहरातील नाईकनगर, टिळकनगर, पीरनगर आदी भागांत गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

Thursday, February 23, 2012 AT 12:45 AM (IST)

उस्मानाबाद - कार्यालय कोणतेही असो, ते वीज कंपनीचा थकबाकीदार आहेच. यात ना गृह विभाग मागे आहे, ना रेल्वे. बहुतांश सरकारी कार्यालये वीज कंपनीचे थकबाकीदार आहेत. ही कार्यालये वसुली मोहिमेलाही थंडा प्रतिसाद देत असल्याने वीज कंपनीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच आता प्रसंगी वीजजोड तोडून "थकबाकीदारांचे नाक दाबण्याचा' प्रयोग वीज कंपनी करणार आहे.

Thursday, February 23, 2012 AT 12:00 AM (IST)

जवळा बाजार - कर्जात आकंठ बुडालेला बाराशिव सहकारी साखर कारखाना बुधवारी (ता.22) पूर्णा कारखान्याने विकत घेऊन एका नव्या पर्वाची सुरवात केली आहे. वसमतपाठोपाठ औंढा तालुक्‍यात आता पूर्णा सहकारी ब्रॅंड यानिमित्ताने उतरला आहे तसेच साखर कारखानदारीच्या राजकीय संघर्षाचा नवा टप्पा यानिमित्ताने समोर आला आहे. काय होता बाराशिव कारखाना राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा तत्कालीन सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी कारखान्याची उभारणी केली होती.

Thursday, February 23, 2012 AT 12:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: