Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


मुक्तपीठ
एटीएममधून पैसे काढले खरे पण पाकीट खिशात न जाता रस्त्यावरच पडल्याचे माझ्या लक्षातही आले नव्हते पण पैसे मला मिळायचेच होते. त्या मुलाने ते पाकीट घेतले आणि माझ्याशी संपर्क साधून ती रक्कम परत दिली. सत्कर्माचाच हा प्रभाव... चांगली वागणूक, सत्संग तसेच भक्ती म्हणजे काय, तर माझ्या मते आसक्तीपासून विरक्त होऊन शाश्‍वत सत्याबाबत संपूर्ण आस्था ठेवणे म्हणजेच भक्ती होय.

Wednesday, February 22, 2012 AT 11:18 AM (IST)

वाहनांनी भरलेला रस्ता आणि बाजूने पळणारा माझा चिमुकला... खरंच काही झालं असतं तर? ...त्या विचारानेसुद्धा माझ्या अंगावर काटा आला...पण त्या अनोळखी माणसाने माझ्या बाळाला सांभाळलं होतं, गाडीत सुरक्षित बसवलं होतं... त्या माणसाचं नाव मला माहिती नाही, म्हणून त्याचं ऋण शब्दांतून व्यक्त करते आहे... सरकारी नोकरी करणारी व दोन मुलं असलेली मी एक सर्वसामान्य स्त्री आहे. त्यात दोन्ही मुलं तशी लहानच, म्हणजे ईशा साडेसहा वर्षांची, तर शिवम अडीच वर्षांचा.

Tuesday, February 21, 2012 AT 08:36 AM (IST)

मोबाईलची रिंग वाजली, झोपेतच त्यानं मोबाईल उचलला... कानावर आवाज पडला, "आज आपण भेटायचं नक्की नं?' तिच्या किणकिणत्या प्रश्‍नानं त्याची झोप उडाली. "भेटायचं म्हणजे काय भेटायचंच! मी अगदी वेळेत पोचतो.' गेले सहा महिने आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज आयुष्यात येणार. वर्षभर ज्या आवाजावर आपण फिदा आहोत त्या आवाजाच्या गळ्यासोबत आपली पहिली भेट होणार. कशी असेल ती? कशी दिसेल ती? आवाजाप्रमाणेच गोड असेल का? किती प्रश्‍न.

Monday, February 20, 2012 AT 02:30 PM (IST)

श्री श्री रवीशंकर स्थानापन्न झाले आणि 1500 वादकांची तबल्यावर थाप पडली. आसमंत जणू दुमदुमून गेला. जीवनात ताल, सूर, लयीला किती महत्त्व आहे हे समजलं. ताल नसेल तर जीवन बेताल होईल. त्या क्षणाचा सहभागी साक्षीदार झालो हे माझं भाग्य... दादांचा फोन आला, ""अरे तुम्ही पाच-सहा जण तबलावादक आज सायंकाळी वर्गाला या.'' (दादा म्हणजे आमच्या तबला वर्गाचे सर, सामंत) आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे होणाऱ्या ताल निनाद या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे.

Monday, February 20, 2012 AT 08:19 AM (IST)

नाती क्षणोक्षणी साथ करत असतात... काही अल्पजीवी, तर काही चिरंतन... काही प्रेमाची तर काही अशीच... ही नाती सांभाळायची असतात... कुरकूर व्हायला लागली तर त्यांना स्नेहाचं वंगण घालावं लागतं... तुटेपर्यंत ताणायचं नाही आणि अगदी सैलही सोडायचं नाही.. हे जमलं की नात्यांचा सुगंध आपलाच... "प्रत्येक नात्याला एक वय असतं आणि प्रत्येक वयावर एक नातं असतं...

Wednesday, February 15, 2012 AT 05:53 PM (IST)

घरट्यातून आमच्या घरात आलेल्या त्या अश्राप पिलाला वाढताना पाहून आम्हाला समाधान वाटत होते. आमची भाषा जणू त्याला समजत होती पण एके दिवशी पंखांत बळ आलं आणि तो निघून गेला.... तो सुखात राहावा पण एकदा तरी त्याने आम्हाला भेटून जावं असं फार वाटतं... आम्ही वाट पाहतोय त्याची... इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला मी शिकत आहे. अशाच एक दिवशी आम्ही मैत्रिणी कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलो होतो.

Tuesday, February 14, 2012 AT 09:15 AM (IST)

सततच्या प्रवासामुळे मनाला येणारा शीण घालवण्यासाठी मी माणसांचं निरीक्षण करायला लागलो. त्यातून "व्यक्ती' आणि "वल्ली'ही दिसायला लागल्या. अनेक प्रसंग दिसले, पण कुवेत विमानतळावरचा तो बाप- मुलीच्या मायेचा प्रसंग विसरता येणार नाही... रडणारा अरब मी प्रथमच पाहत होतो... माझ्या आयुष्यातील बरीच म्हणजे तब्बल 17 वर्षे मी आखाती देशांशी (मिडल ईस्ट), तसेच आफ्रिकेतील देशांशी कामानिमित्ताने संबंधित राहिलो आहे आणि सतत खूप फिरलोही आहे.

Saturday, February 11, 2012 AT 10:38 AM (IST)

नजरचुकीने काढली गेलेली कमी किमतीची तिकिटे, त्यातून आलेली अस्वस्थता आणि समोर आलेला चेकर! पण अमेरिकन संस्कृतीचे दर्शन अनपेक्षितपणाने घडले अन्‌ मोठ्या दंडाबरोबरच प्रवास खंडित व्हायचा प्रसंगही टळला. आमचा प्रवास खरोखरच "हॅपी जर्नी' झाला... मा झा मुलगा आशुतोष एका कामासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी अमेरिकेत त्याच्या मित्राबरोबर गेला होता.

Friday, February 10, 2012 AT 03:02 PM (IST)

स्वयंपूर्ण झाल्याचे आपण समजतो पण नेत्रदानाच्या क्षेत्रात आपल्याकडे अंधारच आहे. आपली गरज थोडीबहुत भागवतो तो श्रीलंकेसारखा देश! आपल्याकडे आज सुमारे एक कोटी लोक दृष्टिहीन आहेत. नेत्रदान करून आपण त्यांच्या आयुष्यात प्रकाश नक्की आणू शकतो. शेवटी "दृष्टिविना सृष्टी व्यर्थ आहे...' माझ्याबाबतीतील घडलेली ही घटना. माझ्या घरातील वातावरण सामाजिक. माझी बहीण मीरा 2008 मध्ये अचानक वयाच्या 38 व्या वर्षी गेली.

Thursday, February 09, 2012 AT 12:05 PM (IST)

"व्हॅल्यू' म्हणजे फक्त किंमत नाही, तर मूल्य, मोल व संस्कार यांचे एक वेगळे मिश्रण असते. अर्थात, ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते. प्रत्येक व्यक्तीनुसार आणि पिढीनुसार ती बदलत जाते याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलाय... मध्यंतरी एका कॉलेजमध्ये "व्हॅल्यू इंजिनियरिंग' हा विषय शिकवण्याची संधी मिळाली. त्या वेळी झालेल्या चर्चेतून "व्हॅल्यू' या शब्दाचे विविध पैलू स्पष्ट करावे लागले.

Tuesday, February 07, 2012 AT 09:19 AM (IST)

ते सुंदर उद्यान, त्यात बागडणारे ते पक्षी... उद्यानात बसलेल्या आम्ही मैत्रिणी. इच्छा एकच होती, सुरेख पाऊस यावा अन्‌ त्याचा आनंद घेता यावा... जणू आमची इच्छा कळाल्याप्रमाणे मस्त सर आली आणि नंतर दिसले इंद्रधनुष्य... कसा व्यक्त करायचा तो आनंद शब्दांत? मी आणि माझ्या मैत्रिणी अशाच एके दिवशी पु. ल. देशपांडे उद्यानात गप्पा मारण्यासाठी, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी गेलो. तेव्हा पावसाळ्याचे दिवस चालू होते. दोन-तीन दिवस पावसाचा काही पत्ता नव्हता.

Monday, February 06, 2012 AT 07:52 AM (IST)

आपल्याजवळ भरपूर असताना दुसऱ्याला काही देण्यात विशेष काही नाही पण मुळात आपल्याजवळ थोडं असताना त्यातून दुसऱ्याला काही देण्याची इच्छा होणं हे फार मोठ्या मनाचं लक्षण. या गृहस्थानं आमच्यासाठी आणलेली भेट त्यामुळेच आम्ही स्वीकारली... माझे पती 2007 मध्ये निवृत्त झाले आणि आम्ही दोघं पुण्याला कायमचं राहण्यासाठी आलो. या पूर्वी आमचं कुटुंब नांदेडला राहत होते. माझे पती एका नामांकित कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करीत होते आणि ते विद्यापीठात डीन पण होते.

Thursday, February 02, 2012 AT 01:33 PM (IST)

आज साठी शांत होताना मन मात्र अशांत आहे. वाढती जीवघेणी स्पर्धा, अपघात, खून यांचे वाढत चाललेले प्रमाण आणि बोकाळलेला भ्रष्टाचार दिसला, की मन उद्विग्न होते. वाईट गोष्टींची आहुती दिली गेल्यावरच खरी शांतता लाभेल... वयाची साठ वर्षे पूर्ण होऊन त्या दिवशी मला 61 वे वर्ष लागले. सकाळीच मुलाने व सुनेने माझा आवडता "पाइनापल पेस्ट्री' समोर ठेवून मला कापायला लावले आणि माझे तोंड गोड केले. दिवसाची सुरवात छान गोड झाली.

Saturday, January 28, 2012 AT 04:43 PM (IST)

आज साठी शांत होताना मन मात्र अशांत आहे. वाढती जीवघेणी स्पर्धा, अपघात, खून यांचे वाढत चाललेले प्रमाण आणि बोकाळलेला भ्रष्टाचार दिसला, की मन उद्विग्न होते. वाईट गोष्टींची आहुती दिली गेल्यावरच खरी शांतता लाभेल... वयाची साठ वर्षे पूर्ण होऊन त्या दिवशी मला 61 वे वर्ष लागले. सकाळीच मुलाने व सुनेने माझा आवडता "पाइनापल पेस्ट्री' समोर ठेवून मला कापायला लावले आणि माझे तोंड गोड केले. दिवसाची सुरवात छान गोड झाली.

Saturday, January 28, 2012 AT 08:28 AM (IST)

कोणा विघ्नसंतोषी माणसानं तोडलेलं ते घरटं, त्यातली ती निरागस पिलं आणि त्यांचे केविलवाणे आई-बाबा. मी त्या पिलांना थोडं सांभाळलं आणि पुढचं कर्तव्य त्यांच्या आई-बाबांनी पार पाडलं. पंखांत बळ आल्यावर पिलं उडून गेली खरी पण जाताना मला निःस्वार्थीपणाची शिकवणही त्यांनी दिली... चैत्र महिन्याला नुकतीच सुरवात झाली होती. झाडांची पानगळपण चांगलीच होत होती. दुपारच्या वेळी ग्रंथालयात बसले असताना, अचानक खिडकीकडे लक्ष गेले.

Tuesday, January 24, 2012 AT 08:18 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: