|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी थंडावल्यानंतर आता महापौरपदाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहेत. मुंबईत महापौर शिवसेनेचा होणार असल्याचे निश्चित असल्याने या पदासाठी पक्षातच तिरंगी लढत सुरु झाली आहे. खुल्या प्रवर्गातून महापौर निवडायचा असल्याने विद्यमान महापौर श्रद्धा जाधव या पुन्हा एकवार स्पर्धेत उतरल्या आहेत.
Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली असून, एकेक अजब प्रकार समोर येत आहेत. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी आज कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या बॅगा, पुस्तके आदी साहित्य वर्गाबाहेर न ठेवता थेट मैदानावर मातीत ठेवण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले होते. याच शाळेत एका वर्गात विद्यार्थ्यांना चपला वर्गाबाहेर काढून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उल्हासनगर  - उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या उल्हासनगर शहरातून महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या 78 सदस्यांपैकी 25 सदस्य हे व्यावसायिक आहेत. व्यापारीवर्गाने यानिमित्ताने आपले प्रतिनिधी सभागृहात पाठविले आहेत. त्यांच्या समस्या हे प्रतिनिधी सभागृहात मांडून कितपत न्याय देतात, हे येणारा काळच ठरविणार आहे. उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी हे अपक्ष नगरसेवकपदी निवडून आले आहे.
Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ठाणे  - अस्ताला जाणाऱ्या मराठी संगीत रंगभूमीला वैभव शिखरांच्या उंचीवर नेऊन ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रसाद सावकार यांना संगीताचार्य बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी तर बालरंगभूमीची रुजवात करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने झालेल्या सप्तरंग महोत्सवास मंगळवारी (ता.21) डॉ.
Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  राज्यातील जिल्हा परिषदांच्या बांधकाम विभागाच्या वाढलेल्या कामाचा व्याप लक्षात घेऊन तसेच कामाची गती वाढविण्यासाठी 35 नवीन उपविभाग आणि त्यासाठी 496 पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज (बुधवार) मान्यता दिली.
Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ठाणे  - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अक्षरशः घाम फोडणाऱ्या मनसेचा भ्रमाचा भोपळा अखेर ठाणे महापालिका निवडणुकीत फुटला. नियोजनाचा अभाव, अत्यंत ढिसाळ प्रचार यंत्रणा, नेत्यांमधील बेदिली, तिकीट वाटपानंतर उसळलेला आगडोंब आणि तुलनेने मोठे झालेले प्रभाग यामुळे मनसेच्या इंजिनाची गती पकडण्यात ठाण्यातील मनसैनिक कमी पडले. त्यामुळे इंजिन जरी सुसाट पुढे निघून गेले असले, तरी डबे मात्र मागे राहत एकामागोमाग गडगडले.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख अशा वादग्रस्त नेत्यांमध्ये कृपाशंकरसिंह यांचा समावेश होणे कॉंग्रेसच्या पराभव मालिकेत भर घालणारे असल्याची तिखट प्रतिक्रिया अंतर्गत विरोधक व्यक्त करीत आहेत. मुंबई पालिकेतील पराभवानंतर कृपाशंकरसिंह यांना न्यायालयाने फटकारताच कॉंग्रेसमधील विरोधक पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - 'एनसीटीई'ने (नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन) मान्यता दिल्यानंतरही राज्य सरकारने काही डी.एड्. महाविद्यालयांना संमती नाकारली आणि अन्य काही डी.एड्. महाविद्यालयांना संमती दिली. या भेदभावाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत या गंभीर प्रकरणी राज्य सरकारने उद्याच (ता. 23) निवेदन द्यावे, असा आदेश दिला. या संदर्भात नाशिक येथील अनमोल शिक्षण प्रसारक मंडळाने याचिका केली आहे. राज्य सरकारच्या या पक्षपाती धोरणाची चौकशी करावी लागेल.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  पाच वर्षांत पाच लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने या घरांच्या क्षेत्रफळामध्ये महत्त्वपूर्ण बदल सरकारला सुचविला आहे. या संदर्भात "एमएमआरडीए'ने राज्य सरकारला 160 चौरस फुटांऐवजी 320 चौरस फूट क्षेत्रफळाची घरे असावीत, अशी शिफारस केली आहे.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात करण्याच्या चार दशकांच्या परंपरेला यंदा अर्थसंकल्पी अधिवेशनात छेद देण्यात आला आहे. अर्थसंकल्पी अधिवेशन यावेळी गुरुवार 15 मार्च रोजी सुरू होणार आहे. होळी, रंगपंचमी, तिथीप्रमाणे शिवजयंती असल्यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरुवात सोमवार 12 मार्चऐवजी गुरुवार 15 मार्चपासून करण्याचा आग्रह बऱ्याच आमदारांनी धरला होता असे समजते.
Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई  - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर आता पालिका मुख्यालयातील कार्यालयावरून चढाओढ सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्या कार्यालयाची मागणी केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर संक्रांत आली आहे. येत्या काळात या "कार्यालय वादावरून' महापालिकेत रणकंदन होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार कार्यालय दिले जाते.
Thursday, February 23, 2012 AT 02:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  राज्यातील 27 जिल्हापरिषदांच्या निवडणुकांचा निकाल लागला असला तरी संबंधित जिल्हापरिषदांची मुदत 19 मार्च 2012 रोजी संपत आहे.
Thursday, February 23, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  रस्तेबांधणीच्या कामात गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या रस्ते व वाहतूक खात्यातील निवृत्त उपायुक्त (दक्षता) डी. डी. नाईक यांच्या निवृत्तिवेतनातून एक वर्ष दरमहा एक हजार रुपये कापण्याचा निर्णय आज (बुधवार) स्थायी समितीत घेण्यात आला. डी. डी.
Thursday, February 23, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील कॉंग्रेसच्या दारुण पराभवानंतरही राजीनामा न देणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंह यांना अखेर बुधवारी पद सोडावेच लागले. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या स्थावर मालमत्तेवर टांच आणण्याचा तसेच मालमत्तेच्या चौकशीचा आदेश दिल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेला राजीनामा लगेच स्वीकारण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये ही माहिती दिली.
Thursday, February 23, 2012 AT 12:43 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - महानगरपालिकेतल्या पराभवामुळे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर गच्छंतीची टांगती तलवार होती. आज बेनामी संपत्तीच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ही तलवार सैल झाली. परिणामी, कृपाशंकर यांनी पदाचा राजीनामा दिला असून, तो स्वीकारण्यात आला आहे. मात्र, आपण न्यायालयाच्या निर्णयामुळे राजीनामा दिलेला नसून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पराभवाची "नैतिक' जबाबदारी स्वीकारून दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Thursday, February 23, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई  - कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसाठी दिवसरात्र एक करीत आहेत. मुंबईतील राहुल गांधी यांचा मात्र महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. मुंबईतील राहुल गांधी यांचे अक्षरशः डिपॉझिट जप्त झाले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी गेले दीड-दोन महिने उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत. ही निवडणूक राहुल गांधी यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  महापालिका निवडणुकीच्या तिकीटवाटपात बिल्डरांचा हस्तक्षेप होतो, असे जाहीर वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी खळबळ उडवून दिली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 10 बिल्डर निवडून आले असून 40 पेक्षा अधिक नगरसेवकांनी आपले व्यवसाय जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या या नगरसेवकांचे "धंदे' कोणते, असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आहे. त्यांचे व्यवसाय उघड होण्यासाठी आता नव्याने प्रतिज्ञापत्र घेण्याची वेळ आली आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबई महापालिकेची मुदत 10 मार्च रोजी संपत असून 9 मार्च रोजी महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच महापौरपद खुले असल्याने शिवसेनेतल्या दिग्गज नगरसेवकांची पावले मातोश्रीकडे वळू लागली आहेत. 2007 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची मुदत 10 मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नव्या महापौरांची निवड होणे गरजेचे असल्याने 9 मार्च रोजी ही निवडणूक होणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
Wednesday, February 22, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मुस्लिम उमेदवारांचा टक्का घसरला आहे. मागील (2007) निवडणुकीत 26 मुस्लिम उमेदवार विजयी झाले होते त्यांची संख्या या वेळी तीनने घटून 23 झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील 2,233 उमेदवारांत 408 मुस्लिमांचा समावेश होता त्यापैकी 23 जणांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडली आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  सराफी पेढीचे छप्पर तोडून तब्बल 70 लाख रुपयांचे दागिने आणि शेजारच्या चष्म्याच्या दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना कांजूर मार्ग येथे घडली. या प्रकरणी अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांजूर मार्ग येथील मुख्य बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. तेथील वैभवलक्ष्मी ज्वेलर्स या पेढीचे छप्पर तोडून काल (ता.
Wednesday, February 22, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उल्हासनगर  - उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सिंधी अस्मिता पुन्हा जागृत झाल्याचे निवडून आलेल्या सिंधी उमेदवारांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. सिंधी समाजाने जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्याचे लक्ष्य समोर ठेवल्याने 78 पैकी 47 नगरसेवक हे सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करीत पालिकेत आले आहेत. कॅम्प नंबर एक, दोन आणि तीनमधील सिंधीबहुल वस्तीने सिंधी उमेदवारांना निवडून दिल्याने ही संख्या वाढली आहे. सिंधी सदस्यांच्या तुलनेत मराठी सदस्यांचा आकडा 31 आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर परळ-शिवडीतून मनसेचे उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरलेले असतानाच शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी आपल्या विभागात बाजी मारली आहे. गोरेगाव विधानसभेतील सहापैकी पाच जागांवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. एकमेकांच्या यश-अपयशाची चर्चा सुरू असल्याच्या वातावरणात बाळा नांदगावकर विधिमंडळाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  बारावीचे महत्त्वाचे वर्ष... पहिला पेपर... परीक्षेची धाकधूक, वेळेत पोचण्याची चिंता... डोंबिवलीहून दादरला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आज धनश्री दीपक गायकवाड लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढली मात्र महिलांच्या ढकलाढकलीत ती दादर स्थानकातील प्लॅटफॉर्मवर पडली. उतरणाऱ्या महिलांनी तिला पायदळी तुडवले. हाताला जबर मुका मार लागलेल्या आणि गाल सुजलेल्या स्थितीत ती बराच वेळ प्लॅटफॉर्मवरच बसून होती.
Wednesday, February 22, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  राज्य शिक्षण मंडळाच्या दोन्ही हेल्पलाईन बारावीच्या परीक्षेच्या मुहूर्तावर सतत घणघणत होत्या. परीक्षेच्या पहिल्या दिवशी सकाळपासून पेपर संपेपर्यंत हेल्पलाइनवर तब्बल 120 कॉल आले होते. दरम्यान, बारावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मुंबई विभागीय सचिव आर. आर. भिसे यांनी दिली.
Wednesday, February 22, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  थंडीच्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील तापमानाचा पारा मात्र वरवर चढू लागला आहे. मुंबईकरांना आज दुपारी उन्हाच्या अक्षरश: झळा बसल्या. तापमापकातील पारा थेट 36.5 अंशांवर गेला होता. समुद्राकडून येणारे वारे उशिरा येत असल्याने अशा गरम हवेच्या झळा बसत आहेत. मात्र उन्हाळा सुरू झालेला नाही अजून थंडी संपलेली नाही, असे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे. सध्या मुंबईच्या हवामानावर पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  गिरणी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार "संनियंत्रण समिती' स्थापन केली. या समितीचे काम तटस्थपणे आणि जलदगतीने चालावे यासाठी निवृत्त न्यायाधीशांची अध्यक्षपदी नेमणूक केली. गेल्या 10 वर्षांत या समितीच्या शंभरहून अधिक बैठका झाल्या मात्र एकाही बैठकीला राज्य सरकारचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने गिरण्यांच्या जमिनीचा, कामगारांच्या घरांचा तिढा सुटला नाही.
Wednesday, February 22, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ठाणे  - विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसला पुन्हा एकदा नामुष्की पत्करावी लागली. एकेकाळी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यात पक्षाची स्थिती सध्या एक खासदार, एक आमदार आणि एक जिल्हा परिषद सदस्य अशी झाली आहे. त्यातच आगामी निवडणुकीत पक्षाला तारू शकेल, असे नेतृत्व सध्या तरी दिसत नसल्याने पक्षाची स्थिती आणखी दारुण होण्याची भीती आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के जागा आरक्षित केल्याने महिला महापौरपदासाठीच्या बदललेल्या आरक्षणाची सोडत बुधवारी (22 फेब्रुवारी) नगरविकास खात्यामार्फत करणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले. यापूर्वी 23 महानगरपालिकांतील आरक्षणाची सोडत 33 टक्के महिला आरक्षणानुसार जाहीर करण्यात आली होती. मात्र पन्नास टक्के आरक्षण लागू केल्यानंतर यात बदल झाला आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  रेल्वेरूळ ओलांडून पाच-दहा मिनिटे वाचविणाऱ्या प्रवाशांमुळे अवघी उपनगरी लोकल सेवा वेठीला धरली जात आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजल्यामुळे लाखो मुंबईकरांची प्रवासात फरफट होत आहे. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांनी मध्य रेल्वेसमोर आव्हान उभे केले आहे. मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावर एका वर्षात सहा हजार प्रवाशांचा रूळ ओलांडताना बळी जात असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  दुसऱ्या पत्नीसोबत होणारे भांडण आणि मनस्तापाला कंटाळून तिला आणि सासऱ्याला मानसिक त्रास देण्यासाठी स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचणाऱ्या डीटीपी ऑपरेटरला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतःच्या मुलाला पळवून मालवणी येथे पहिल्या पत्नीच्या घरात तीन महिने ठेवल्याचेही तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, अपहृत मुलगा सापडत नाही म्हणून हा पिता गेले तीन महिने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तपासाबाबत चौकशी करत होता.
Wednesday, February 22, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेले महायुतीचे नगरसेवक उद्या (ता. 22) निवडणूक विभागाकडून नियुक्तीपत्र घेतील. त्यांच्याबरोबर अखिल भारतीय सेनेचे दोन नगरसेवक आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अन्य अपक्ष नगरसेवकांनाही नियुक्तीपत्र दिले जाईल. हे नवनिर्वाचित नगरसेवक 23 फेब्रुवारीला विभागीय आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करतील. त्यामुळे महायुतीला कोणत्या अपक्ष नगरसेवकांचे पाठबळ मिळणार, ते उद्याच स्पष्ट होईल.
Wednesday, February 22, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|