|
|
|
|
|
|
नाशिक -  महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर गेल्या तीन वर्षांपासून भर देण्यात आला असून, यावर्षी 165 कोटी रुपये आधुनिकीकरणावर खर्च होणार आहेत. आधुनिक साधने, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी दहशतवादी शक्तींना हद्दपार करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले. अखिल भारतीय पातळीवरील 55 व्या पोलिस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन आज सायंकाळी पोलिस अकादमीत मुख्यमंत्र्यांनी केले.
Thursday, February 23, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भुसावळ -  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भीमगीत गावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीतर्फे येथील जिल्हाधिकारी, प्रांतकार्यालय आणि तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अकादमीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगेशकर यांनी भीमगीत गावे यासाठी आतापर्यंत अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला मात्र त्यांनी आजपर्यंत गाणे म्हटले नाही. त्याचा निषेध म्हणूनच हे आंदोलन करण्यात आले.
Thursday, February 23, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आज दुसऱ्या दिवशी हिंदी विषयाच्या पेपरवरही धडक मोहीम राबवीत जिल्ह्यातील पाच केंद्रांतील 19 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यासह परीक्षेच्या वातावरणास बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा परीक्षा केंद्र संचालक व आठ पर्यवेक्षकांना "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आज भाषेच्या दुसऱ्या हिंदी विषयाच्या पेपरलाही काही कॉपीबहाद्दरांनी धुमाकूळ घातला.
Thursday, February 23, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धुळे -  महापालिकेच्या भोंगळ कारभाराकडे अंगुलिनिर्देश करताना अनेक नगरसेवक देखील शहर विकासाबाबत काय दिवे लावतात, हे पाहणे नागरिकांच्या दृष्टीने गरजेचे झाले आहे. त्या नगरसेवकांचे प्रशासकीय कारभारावरील अतिक्रमण आता लपून राहिलेले नाही. निविदा जाहीर होण्याचा अवकाश. त्यापासून ते बिल मंजुरीपर्यंत सर्व कामे, प्रसंगी शिपायाचे कामही "ते' नगरसेवक करतात. प्रशासनाला बरेचसे कामही ते ठेवत नाहीत.
Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. जनतेचा कौल आम्ही मान्य केला असून, पराभवाचे विश्लेषण करून आवश्यक तेथे पक्षश्रेष्ठींकडून कारवाई केली जाईल,' अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली. पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या उद्घाटनासाठी श्री. चव्हाण आज नाशिकमध्ये आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. श्री.
Thursday, February 23, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  'वाघूर'चा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर जळगावकरांना रोज पाणी देऊ, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. त्याच आधारावर पाणीपट्टीही वाढविली होती. सद्यःस्थितीत रोज पाणीपुरवठा देऊच शकले नाहीत पण दिवसाआड पाणीपुरवठाही व्यवस्थित होत नाही. जळगावकरांची ही सरळसरळ फसवणूक आहे. सत्ताधाऱ्यांनी करवाढरहित अंदाजपत्रक सादर केल्याचा आव आणला आहे. प्रत्यक्षात पाणीपट्टीचे दर अगोदरच दुप्पट करण्यात आले आहेत.
Thursday, February 23, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त 26 आणि 27 फेब्रुवारीला येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. कुसुमाग्रज यांच्या साहित्य ई-बुकचे प्रकाशनही या वेळी करण्यात येईल, अशी माहिती जन्मशताब्दी वर्ष कार्यकारी समितीचे अध्यक्ष ऍड. विलास लोणारी यांनी आज येथे दिली. कुसुमाग्रज स्मारकामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ऍड. लोणारी बोलत होते.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धुळे -  रॉकेलचा काळाबाजार थांबविण्यासाठी गॅस सिलिंडर ग्राहकांकडून एक विशिष्ट अर्ज भरून घेतला जात आहे. त्यातील कमी मर्यादा आणि मर्यादित कामकाजामुळे ग्राहकांना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. आजही तशीच स्थिती कायम होती. यात प्रभावी उपाययोजना राबविल्या जाव्यात, अशी मागणी करत "मनसे'सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी लाखो ग्राहकांना वेठीस धरले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
येवला -  यंदा लाल रांगडा कांद्याचे मोठे उत्पादन झाल्याने कांदा आवकेने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती तुडुंब भरून जात आहे. आज बुधवारच्या लिलावासाठी मंगळवारीच सुमारे हजारावर ट्रॅक्टर बाजार समितीत दाखल झाल्याने जागेअभावी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करावे लागले. राज्य महामार्गावर दुतर्फा ट्रॅक्टरच्या रांगाच रांगा लागताना हे ट्रॅक्टर मनमाड रोडवरील संतोषीमाता मंदिराजवळील मैदानात उभे करावे लागले.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता मराठवाड्यात भगरीतून विषबाधा झाल्याचे प्रकार पुढे आल्याने अन्न प्रशासनाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील भगर उत्पादकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. परभणी, बुलडाणा, औरंगाबादच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने नाशिक, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातील 31 ठिकाणी दोन लाख 97 हजार 906 किलो माल जप्त केला आहे. या मालाची किंमत 62 लाख 31 हजार 124 रुपये असल्याची माहिती प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  गेल्या अनेक वर्षांपासूनचा रिक्षाला इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्याचा प्रश्न मार्चपासून मार्गी लागणार आहे. राज्यभरातील नवीन रिक्षांना एक मार्चपासून, तर जुन्या रिक्षांना एक एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे आदेश राज्य सरकारच्या परिवहन विभागातर्फे देण्यात आले आहेत. मीटर बसविणे चांगले किंवा वाईट यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्यानंतर महापौर पदासाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा वाढली आहे. सत्तास्थापनेचा दावा केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे तर अपक्षांनीही महापौर पदासाठी हट्ट धरल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यानंतर आज महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
येवला -  शहरातील विविध भागांमधील पथदीप बंद पडल्याने ठिकठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेच्या पथदीपांची सेवा देण्यासाठी दिमतीला असलेले "महावितरण'चे वायरमनच "महावितरण'ने देणे बंद केल्याने ही परिस्थिती ओढविल्याचा आरोप नगरपालिकेकडून केला जात आहे. 'महावितरण'कडून येवला शहरासाठी अनेक वर्षांपासून दोन वायरमनची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील विद्युत खांबांवरील सर्व सेवा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात होत्या.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  स्थानिक पातळीवर कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव असल्याने अनेक आदिवासी कुटुंबे उपजीविकेसाठी परराज्यांत किंवा परजिल्ह्यांत स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांच्यापुढे मुलांच्या संगोपनाचा तसेच त्यांच्या कुपोषणाचाही प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नी शासन दरबारी अनेक वेळा चर्चा झाल्या. मात्र, हे प्रश्न मिटतील असा ठोस निर्णय झाला नव्हता.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धुळे -  मोबदल्यासंबंधी प्रश्नातून बंद पाडण्यात आलेल्या आणि वेठीस धरला गेलेल्या नरडाणा "एमआयडीसी'तील शिरपूर पॉवर वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम आजपासून पूर्ववत सुरू झाल्याने औद्योगिक वर्तुळातही समाधान व्यक्त झाले. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांची कठोर भूमिका आणि वस्तुस्थिती समोर आल्याने काही जणांचे धाबे दणाणले. त्यांनी माघार घेतल्यानंतर दीडशे मजूर पुन्हा या प्रकल्पाच्या कामावर जुंपले आहेत.
Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|