"बिहार ग्लोबल समिट'मध्ये भाषण करण्याऐवजी महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना लिहिलेले पत्रच वाचून दाखविले. वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील या पत्रात समाज, राजकारण आणि राजकारण्यांबद्दल भाष्य केलेले असून, सध्याच्या राजकारण्यांना "मॅनेजर' संबोधत, राजकारणातील व्यंगावरही त्यांनी बोट ठेवले. भाषणाला फाटा देऊन गांधी यांनी केलेल्या पत्रवाचनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
"देशातील प्रगतिपथावर अग्रेसर असणारे राज्य' म्हणून आज महाराष्ट्राला ओळखले जाते. औद्योगिक, आर्थिक, तसेच शैक्षणिक आघाडीवर महाराष्ट्राने एक आदर्श उदाहरण निर्माण केले परंतु वैभवशाली ऐतिहासिक वारशाचे सामर्थ्य लाभूनही त्याची जगाला ओळख करून देण्यात महाराष्ट्र मागेच राहिला.
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी सर्वच शहरांतील वाहतुकीच्या प्रश्नांचा समग्र विचार केला नाही तर मात्र ही वरवरची मलमपट्टीच ठरेल. मुळात केवळ पुणे, मुंबई, ठाणे या पट्ट्यातच सध्या मीटरप्रमाणे भाडे आकारले जाते. अन्यत्र, बहुतेक शहरांत रिक्षांचे मीटर शोभेपुरतेच आहेत. प्रवाशांची खरोखरच काळजी असेल तर सरकारने त्यांच्या प्रश्नांनाही हात घातला पाहिजे.
निवडणुकीनंतर सुरू झालेल्या हाणामाऱ्यांमुळे राडेबाजांचे राज्य असा नवा किताब धारण करण्याचा विडा कार्यकर्त्यांनी उचलल्याचे दिसते. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच्या चार दिवसांत राज्यात पडलेले खून आणि हाणामाऱ्या बघता, या निवडणुकांत राजकीय कार्यकर्ते उतरले होते की दंगलखोरांच्या टोळ्या, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
सपाट जग प्रसारमाध्यमांकडील माहिती हीच मालमत्ता, असे नवे समीकरण रुजू पाहत आहे. फेसबुक कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीतून भांडवलउभारणीचा निर्णय घेतल्याने फेसबुकच्या 'अंतरंगा'ची चर्चा सुरू झाली आहे... 'आम्ही पैसे मिळविण्यासाठी सेवा देत नाही, तर अधिक चांगली सेवा देण्यासाठी पैसे उभे करतो.
कानोसा- गुजरात गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू परिमल त्रिवेदी यांच्याविरुद्ध गेल्या 11 तारखेला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. भ्रष्टाचार व पैशांची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे गुजरातमधील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात भर म्हणजे त्रिवेदींना कुलगुरुपदावर दुसऱ्यांदा संधी देऊन मोदी सरकारने त्यांना उपकृत केले, असे प्रसिद्ध झाल्याने राज्य सरकारबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.
'सपाट जग' सदरातील "कर्तबगारी गाजवा, मराठी आपोआप बहरेल' या डॉ. सदानंद मोरे यांच्या लेखावरील निवडक प्रतिक्रिया. डॉ. सदानंद मोरे यांनी अतिशय समर्पक शब्दांत मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी उपाययोजना सुचविली आहे. शेवटी "साहसे श्री प्रतिवसति' हेच खरे आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची, पराक्रमाची मोहोर उमटविणारे मराठीचा किती वापर कतात, ती समृद्ध होण्यासाठी किती प्रयत्न करतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
स्वच्छ आणि कार्यक्षम कारभारासाठी गोव्यातील सत्तेचे हलते देखावे बंद व्हावेत, ही सर्वांचीच इच्छा आहे. पण हे घडणार काय, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि महापालिका यांच्या निवडणुकांचे सूप वाजले असले, तरी देशातील काही राज्यांत रणधुमाळी सुरूच आहे.
प्रगतशील महाराष्ट्र प्रश्न नेमकेपणाने मांडणे, त्याबरोबरच उत्तराच्या दिशाही शोधण्याचा प्रयत्न करणे, अशी या सदरामागची भूमिका आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारा लेख ता. 14 रोजी प्रसिद्ध झाला. त्यावरील उपायांची चर्चा करणारे हे लेख. गर्भलिंग निदानाच्या विषयाकडे मी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरेक्यांचा स्त्रियांवरील हल्ला आहे, अशा भूमिकेतून पाहते आणि अनुभवते आहे. मुलगी नको ही मानसिकता या देशाची हजारो वर्षांपासूनची आहे.
कानोसाः जम्मू-काश्मीर काश्मीरमधील हिवाळा हा हवामानविषयक प्रश्न घेऊन येतो, तसाच तो नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेचे मोठे नुकसान करणारा ठरतो. प्रचंड हिमवृष्टीमुळे राज्यातील जनजीवन गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे विस्कळित झाले असून, नागरिकांना मोठ्या गैरसोईंचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत राज्यात आग लागून मोठी हानी होण्याच्या 85 पेक्षा अधिक घटना घडल्या. तीत सुमारे 30 कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
समाजात मुलगी इतकी "नकोशी' होते, की अनेक ठिकाणी तिचे नावच नकोशी ठेवले जाते. ती सासरी गेल्यानंतर अधिक नकोशी होते आणि जेव्हा तिच्या पोटात कुणी चिमुकली येते, तेव्हा तर ती अधिक पटींनी नकोशी होते आणि तिला नाहीशीच केली जाते. मग हे दुष्टचक्र पुढे असेच चालू राहते. असे होऊ नये म्हणून विविध उपाय केले पाहिजेत. "नकोशी' नावाच्या मुलीला शासनाच्या अनेक योजनांची माहिती देऊन अनुदान/ सवलती मिळवून द्याव्यात.
घरातून येणारा भावनिक ताण आणि शाळेतून येणारा बौद्धिक ताण यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासावरच परिणाम होतो. मुलांना त्यांच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांसह घडविणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट होय. चेन्नईमधील एका शाळेतील पंधरा वर्षांच्या नववीतील विद्यार्थ्याने, आपल्याला नेहमी रागविणाऱ्या बाईंचा काटा काढण्यासाठी भर वर्गात त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना ठार मारले. काही वर्षांपूर्वी अशीच एक वाशीमधील बातमी होती.
निवडणुका म्हटल्या, की मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष मनात येतील त्या आश्वासनांची खैरात करीत सुटतात. कॉंग्रेसनेही मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक नेत्यांच्या तोंडून बेताल वक्तव्ये केली. हे करताना निवडणूक आयोगालाही लक्ष्य करीत त्यांनी असंस्कृतपणाचे दर्शन घडविले. राजकारणात एखादी कृती किंवा वक्तव्य हे केवळ सकृतदर्शनी घेता येत नाही.
दहशतवादाच्या प्रश्नावर तरी परस्परसामंजस्य हवे. त्याऐवजी हद्दीचा वाद उपस्थित करण्यामागे संघराज्याच्या काळजीपेक्षा राजकारणच अधिक आहे. केंद्रातील सत्तेत थोडी जरी दुर्बलतेची लक्षणे दिसू लागली, की प्रांतोप्रांतीचे सुभेदार शिरजोर बनतात. भारताच्या इतिहासात असे प्रसंग पुन्हापुन्हा घडलेले आहेत परंतु कुठल्याच इतिहासातून काहीच शिकायचे नाही, असा चंगच जणू आपण बांधलेला असल्याने आपल्याकडे जुन्याच चुकांच्या नव्या वेष्टनातील आवृत्त्या निघताना दिसतात.
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत (एनआरएचएम) उच्चपदस्थ राजकारणी आणि नोकरशाही यांच्या संगनमतातून झालेल्या 5700 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाची गुंतागुंत आणि व्याप्ती आणखी एका कर्मचाऱ्याचा खून झाल्याने वाढत चालली आहे. ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठीच्या या योजनेवर बड्या धेंडांनी बिनदिक्कतपणे डल्ला मारला आहे.