नागपूर -  कोर्टाच्या विटनेस बॉक्समध्ये साक्षीदार उभा होताच त्याला नाव, गाव, पत्ता विचारला जातो. नंतर साक्षीदाराला सांगितले जाते, "म्हणा! ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतो की, जे बोलेन ते सत्य बोलेन.' साक्षीदार म्हणतो, "मी भारतीय राज्यघटनेला साक्षी ठेवून शपथ घेतो की, मी जे काही बोलेन ते सत्य बोलेन...' साक्षीदाराचे हे वाक्य अनेक जणांना अवाक् करणारे असते. सारेच जण साक्षीदाराकडे विशिष्ट नजरेने बघतात. काय होणार आता, असा अनेकांना पडलेला प्रश्न.
नागपूर -  राज्यात मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. नऊ विभागीय मंडळांअंतर्गत घेण्यात येणाऱ्या या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते. मात्र, राज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी सहा महत्त्वपूर्ण मंडळात अध्यक्षाचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा काळात संपूर्ण जबाबदारी मंडळाच्या सचिवांवर येऊन पडली आहे.
नागपूर -  मुस्लिम लीग, सुलेखा कुंभारेंचा भारतीय रिपब्लिकन एकता मंच यांना सोबत घेत भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा पाठ पुन्हा गिरवला. 75 नगरसेवकांची नगरविकास आघाडीची नोंदणी केली. "सर्व काही सुरळीतपणे पार पडल्यास, आघाडीचे संख्याबळ 96 पर्यंत जाईल' असा दावा भाजपने केला. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 72 नगरसेवकांची गरज होती. भाजपचे शहराध्यक्ष अनिल सोले यांच्या नेतृत्वात नगरविकास आघाडीची नोंदणी बुधवारी विभागीय आयुक्तालयात करण्यात आली.
वर्धा -  शेतातील गुप्तधन काढण्याच्या नावाखाली पहिल्यांदा 59 हजारांनी गंडविल्यानंतर पुन्हा तीन लाख 24 हजारांनी गंडविण्याच्या प्रयत्नात स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या टोळीतील नागपूरचा रामेश्वर मेश्राम (वय 40) याच्याकडून पोलिसांनी "सैतानी पुडी' जप्त केली आहे. पहिल्यांदा गुप्तधन काढण्यास नरबळी मागायचा आणि हे शक्य झाले नाही तर संबंधिताला मोठी पूजा करावी लागेल, असे सांगून पूजेच्या साहित्याच्या नावाने ही पुडी विकत घ्यायला लावायची.
नागपूर -  शिवसेनेशी कुठलीच चर्चा न करता, भाजपने 75 सदस्यांच्या नागपूर विकास आघाडीची नोंदणी केली. त्यामुळे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेने आपल्या सहा सदस्यांची वेगळी आघाडी नोंदणीकृत केली. "सगळ्यांना सोबत घेण्याचे ठरले आहे, कुणाला काय द्यायचे? हे ठरविण्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत' असे भाजपने म्हटले आहे. महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने युती करून लढली. त्यामुळे "पॉवर शेअरिंग' युतीतच होणे अपेक्षित आहे.
यवतमाळ -  मार्चपर्यंत थंडीचा कडाका राहण्याचा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज साफ खोटा ठरवत जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा वाढला आहे. बुधवारी (ता. 22) शहरात 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. यावर्षी पावसाने सरासरी गाठली तरी पावसात सातत्य नसल्यामुळे पिकांना त्याचा फायदा झाला नाही. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत थंडीचा पत्ताच नव्हता.
नागपूर -  निसर्ग संवर्धनाबद्दल शालेय विद्यार्थ्यांना धडे मिळावे, या उद्देशाने पेंच व्याघ्रप्रकल्पामध्ये प्रयोगिकतत्त्वावर "विद्यार्थी वन्यजीव दूत' उपक्रम राबविण्यात येत आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून, यासाठी शहरातील शाळांमधील 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन या विद्यार्थी वन्यजीव दुतांचे दोनदिवसीय निसर्ग जागृती शिबिर पेंच व्याघ्रप्रकल्पात नुकतेच झाले. वाढती लोकसंख्या व वेगाने होणारा विकास यामुळे वनांचे क्षेत्र कमी होत आहे.
नागपूर -  जिल्हपरिषदेतील सत्तेची दारे भाजप व कॉंग्रेस अशी दोन्ही पक्ष ठोठावत आहेत. बहुमताचा आकडा गोळा करताना सहकारी पक्षांचे समाधान करण्याची मोठी कसरतही त्यांना करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापन केल्यानंतर सभापतिपद देताना तालुकानिहाय पद देण्याची मोठी अडचण सर्वच पक्षांना राहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे, प्रथम सत्ता स्थापन करणार कोण, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोर्शी (जि. अमरावती) -  तालुक्यातील सालबर्डी शिवारात संत्र्याच्या शेतात वृद्ध रखवालदाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. बुधवारी (ता. 22) ही घटना उघडकीस आली. उपासराव परशुराम फुले (वय 70, रा. रोशनखेड, वरुड) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. रोशनखेडा येथील उपासराव फुले हे पाच दिवसांपासून सालबर्डी शिवारात नामदेव महल्ले यांच्या शेतात असलेल्या संत्राबागेची रखवालदारी करीत होते. श्री.
भारताच्या संविधानाची प्रास्ताविका वाचताना लोकशाही राष्ट्राची एकंदर आखीव रेखीव मांडणी डोळ्यासमोर उभी राहते. 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आलेल्या संविधानाच्या व्यापक दृष्टिकोनाचा अंदाज आपल्याला लावता येतो. स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले असले तरी खऱ्याखुऱ्या प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती ही राज्यघटनेच्या अमलात येण्यापासूनच म्हणावी लागेल. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.
निवडणूक रणधुमाळी थाबली तशी कोलावरीची रेकॉर्डही शांत झाली. अनेक उमेदवारांनी कोलावरीच्या चालीवर प्रचारगीतं बनवून घेतली होती. कित्येकदा कोणत्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे हेसुद्धा कळायला मार्ग राहत नव्हता. कारण, डोक्यात फक्त कोलावरीची चालच फिट होती. मूळ गाण्यात शब्दांना महत्त्व नव्हतंच आणि प्रचारगीतांमधले शब्द ऐकण्याची कोणाला गरज वाटली नव्हती. तरीसुद्धा कोलावरीने गेल्या काही दिवसांत यू-ट्यूब जनरेशनवर आपला प्रभाव सोडलाच आहे.
अमरावती -  महापालिका निवडणुकीदरम्यान पोलिसांनी एका गाडीतून जप्त केलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीप्रकरणी मंगळवारी (ता. 21) पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आमदार रावसाहेब शेखावत यांचे बयाण नोंदविले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून नियुक्त करण्यात आलेले वकीलसुद्धा उपस्थित होते.
नागपूर -  राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या बारावीचा परीक्षेचा पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर शांततेत पार पडला. नागपूरसह इतर जिल्ह्यात तुरळक कॉपीचे प्रकार आढळून आलेत. त्यात गोंदियात इंग्रजीच्या पेपरलाही सर्वाधिक म्हणजेच 40 कॉप्या सापडल्या. तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. उद्या बुधवारी (ता.22) हिंदीचा पेपर आहे. विभागात 383 परीक्षा केंद्रांवर एक लाख 76 हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
राजुरा (जि. चंद्रपूर) -  अध्यापक विद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया गेल्या वर्षीच्या तुलनेत आधीच बंद झाल्याने यंदा 21 हजार 618 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे अध्यापक विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडत असलेले शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्याचवेळेस चालू सत्रात अनेक डीएड महाविद्यालयांतील विद्यार्थिसंख्या कमी झाल्यामुळे तुकड्या बंद पडून शिक्षकांवर घरी बसण्याची भीती निर्माण झाली आहे.
गडचिरोली -  वैचारिक मतभेदामुळे जिल्हापरिषदतेत सत्ता स्थापनेसाठी आघाडीत बिघाड झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजप नेत्यांसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे आघाडीच्या काही नेत्यांनी बंडोपंत मल्लेलवार व अतुल गण्यारपवार यांना दूर ठेवले तरच एकत्र येऊ, अशी अट घातल्याने आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे.