अम्मन - सीरियातील होम्स शहरात बुधवारी दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जण राहत असलेल्या घरावर रॉकेट हल्ला करण्यात आला. यापैकी एकाचे नाव मारी कोल्वीन असे असून, तो मूळचा अमेरिकेचा आहे. तो ब्रिटनमधील "संडे टाईम्स' या वृत्तपत्रात काम करीत होता, तर दुसऱ्याचे नाव रेमी ओचलिक असे असून, तो फ्रान्सचा नागरिक आहे. हे दोघे जण मध्य-पूर्वेत चालणाऱ्या युद्धांचे वार्तांकन करीत होते.
काबूल - अमेरिकेच्या सैनिकी तळावर कुराणची प्रत जाळण्यात आल्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या आंदोलनामध्ये आज पाच अफगाणी नागरिकांना प्राण गमवावे लागले. पोलिस व आंदोलकांमध्ये झालेल्या गोंधळात पाच अफगाणींना गोळीबारात प्राण गमवावे लागले, तर सुमारे बारा जण जखमी झाले. अमेरिकेचे अफगाणिस्तानातील कमांडर जनरल जॉन ऍलेन व अमेरिकेच्या संरक्षण मंत्री लिऑन पॅनेटा यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे.
वॉशिंग्टन- अब्राहम लिंकन यांच्या संपूर्ण माहितीचा खजिना 'सेंटर फॉर एज्युकेशन ऍन्ड लीडरशीप'तर्फे एका 34 फूट उंचीच्या टॉवरमध्ये संग्रहित करण्यात आला आहे. या पुस्तकांमध्ये लिंकन यांच्या भाषणांची, त्यांच्या विचारांची महती गाणारी, पर्यटनविषयक, उपरोधात्मक, विश्लेषणात्मक आणि इतिहासाशी संबंधित सहा हजार आठशे पुस्तकांचा समावेश आहे.
लंडन - एखाद्याशी आपलं खूप जुने नाते असते तसेच लंडनच्या नॉटिंगहॅममधील एका 33 वर्षीय महिलेचे पिझ्झाशी गेले 31 वर्षांचे नाते आहे. क्लेअर सिमॉन्स असे त्या महिलेचे नाव असून, गेल्या 31 वर्षांपासून ती फक्त पिझ्झ्यावरच जगते आहे. क्लेअर दोन वर्षे वयाची असल्यापासून पिझ्झा खाते. त्या व्यतिरिक्त तिने आजपर्यंत दुसरे काहीही खाल्लेले नाही. तिच्या जेवणात फक्त टोमॅटो चीझ पिझ्झा असतो. क्लेअर "सिलेक्टिव ईटिंग डिसऑर्डर'ची रुग्ण आहे.
वॉशिंग्टन - ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्याशी झालेल्या वादानंतर परराष्ट्र मंत्री केविन रूड यांनी आज (बुधवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची भेट घेण्यासाठी आलेल्या रूड यांनी भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जून 2010 मध्ये गिलार्ड यांनी रूड यांच्याकडून पंतप्रधान पदाची सूत्रे घेतली आणि तेव्हापासून दोघांमध्ये तणाव आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग असल्याचे आरोप माजी लष्कराधिकारी परवेझ मुशर्रफ यांनी आज फेटाळले. बेनझीरना कोणी मारले याची माहिती त्यांचे पती व पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांना असल्याचाही दावा लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहत असलेल्या मुशर्रफनी दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना केला.
इस्लामाबाद - न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) 28 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचा कथित सहभाग असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा न्यायालयाने दिलेला आदेश दुर्लक्षित केल्याच्या आरोपावरून गिलानींवर खटला सुरू आहे.
तेहरान - वादग्रस्त अणुकार्यक्रमासंबंधी चर्चा करण्यासाठी इराणमध्ये गेलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) प्रतिनिधींनी ही चर्चा फिस्कटल्याचे आज (बुधवार) सांगितले. एका सैनिकी स्थळाला भेट देण्यास इराणने परवानगी नाकारल्याचेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (आयएईए) प्रतिनिधीमंडळ गेले दोन दिवस इराणमध्ये होते.
अम्मन - सिरीयातील होम्स शहरात आज (बुधवार) पश्चिम देशांतील दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेजण राहत असलेल्या घरावर हल्ला करण्यात आला. यापैकी एकाचे नाव मारी कोल्वीन असे असून, तो मुळचा अमेरिकेचा आहे. तो ब्रिटनमधील संडे टाईम्स वृत्तपत्रात काम करीत होता. तर दुसऱ्याचे नाव रेमी ओचलिक असे असून, तो फ्रान्सचा नागरिक आहे. बंडखोरांनी हे दोघे राहत असलेले घर रॉकेटच्या साहाय्याने उडविले.
ऑकलंड - इंटरनेट पायरसी आणि काळ्या पैशांशी संबंधित आरोपावरून अटकेत असलेले 'मेगा अपलोड' या प्रसिद्ध वेबसाइटचे संस्थापक किम डॉटकॉम यांना न्यूझीलंडमधील न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या 'एफबीआय'च्या विनंतीवरून न्यूझीलंड पोलिसांनी किम डॉटकॉम यांना २० जानेवारीला अटक केली होती. 'मेगा अपलोड' ही फाइल शेअरिंगसाठी सर्रास वापरली जाणारी वेबसाइट आहे. या वेबासाईटवर कॉपीराईट होल्डर्सला ५०० मिलियन डॉलरचे नुकसान पोचविल्याचा आरोप आहे.
व्हॅनकोवर - जगात सध्या अस्तित्त्वात असलेल्या सुमारे सात हजार भाषांपैकी अर्ध्या भाषा चालू शतकाच्या अखेरीस नष्ट होणार असल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीचा दोष जागतिकीकरणावर टाकला जातो, पण याच "आधुनिक' जगातील तंत्रज्ञान भाषा वाचविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या मदतीला येत असल्याचे दिसून येते.
तेहरान - इराणच्या दौऱ्यावर आलेले संयुक्त राष्ट्रसंघाचे (युनो) निरीक्षक मंडळ देशातील अणुकेंद्रांची तपासणी करण्यासाठी आलेले नाहीत तर केवळ अधिकारी पातळीवर चर्चा करण्यासाठी आले आहेत, असे इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रमीन मेहमानपरास्त यांनी आज सांगितले.
इस्लामाबाद - पाकिस्तानी प्रतिनिधिगृहाच्या सभापती पेहमिदा मिर्झा यांच्या निमंत्रणावरून सहा भारतीय संसद सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळासह लोकसभाध्यक्ष मीरा कुमार यांचे आज येथे आगमन झाले. अध्यक्ष असिफ अली झरदारी, पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यासह विविध नेत्यांची भेट मीरा कुमार घेणार आहेत. विविध कार्यक्रम व बैठकींमधील सहभागाबरोबरच तक्षशिला या बौद्ध वारसा लाभलेल्या स्थळालाही प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहे.
सना (येमेन) - अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांची 33 वर्षांची सत्ता संपुष्टात आल्यावर येमेनच्या मतदारांनी मंगळवारी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केले. येमेनमध्ये मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. अर्थात, देशातील दोन मुख्य विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे सालेह यांचे उपाध्यक्ष अब्द्राबुह मन्सूर हदी हेच निवडणुकीच्या रिंगणातील एकमेव प्रबळ उमेदवार आहेत.
इस्लामाबाद - पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात भारत यशस्वी ठरत असला तरी शेजारी देश पाकिस्तानात पोलिओची गंभीर परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानात सर्वाधिक 189 पोलिओ रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याविषयी चिंता व्यक्त केली आहे. संघटनेच्या एका टीमने नुकतीच पाकिस्तानला भेट दिली. त्या वेळी देशात औषधांचा पुरेसा साठा असून केवळ एका योग्य मोहिमेची गरज असल्याचे संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.