सोलापूर - हॉटेलमधील सफाई कामगार आणि महापालिकेतील चावीवाला म्हणून काम करणारा कर्मचारी नगरसेवक झाले आहेत. जीवनाच्या वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या शिदोरीवर प्रभागातील मतदारांना पर्यायाने नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. प्रभाग चार अ मधून कॉंग्रेसतर्फे निवडून आलेले अविनाश बनसोडे आणि प्रभाग पन्नास अ मधून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हारून सय्यद अशी त्यांची नावे आहेत. श्री.
सांगली - येथील वसंतदादा मार्केट यार्डात बेदाण्याचे दर पाडल्याने सुमारे एक हजार शेतकऱ्यांचा आज उद्रेक झाला. सौदे बंद पाडतानाच परप्रांतीय व्यापाऱ्यांची अक्षरश: धुलाई झाली. महागाई गगनाला भिडली असताना काही व्यापाऱ्यांनी बेदाणा चक्क प्रति किलो 25 रुपयाने मागत शेतकऱ्यांची थट्टा मांडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत चोप दिला.
कोल्हापूर - माहेरून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी नवविवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. विरुपाक्ष गीरमल्लाप्पा कवटगी (वय 32, रा. इंगळेनगर, कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सासू, सासरा आणि पतीचा मामा यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. देसाई यांनी ही शिक्षा सुनावली.
सातारा - गेल्या वर्षी सोन्यापेक्षा जास्त भाव मिळालेल्या हळदीला यंदा मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. युरोपसह इतर देशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी असूनही भाव कोसळल्याने त्यामागे व्यापाऱ्यांचाही गोलमाल असावा, असा संशय शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागला आहे. याशिवाय सरकारी धोरणही शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याने संताप व्यक्त होत आहे.
कऱ्हाड - त्यांना जंगल वाचनाचा छंदच होता. कोणत्या प्राण्यांची कोठे वसाहत आहे. त्यांच्या सवयी काय आहेत. कोयनेच्या जंगलात औषधी वनस्पती कोणत्या आहेत. त्यांचा उपयोग काय, पक्ष्यांच्या जाती किती आहे. एका नजरेत पक्ष्याची जात सांगणारा वन खाते व जंगल यांच्यांतील दुवा नुकताच निखळला. बापू गुरव (वय 57, रा. आंबेगाव, ता. पाटण) असे त्यांचे नाव.
सोलापूर - महापालिकेचे महापौरपद हे इतर मागासवर्गीय प्रवर्ग महिलांसाठी (ओबीसी) राखीव आहे. कॉंग्रेसने सर्वाधिक 45 जागा जिंकून महापालिकेत पुन्हा एकदा वर्चस्व कायम राहिले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी कधी होते त्यावर पुढील घडामोडी होणार आहेत. ज्याच्या जागा जास्त, त्यांना महापौर असा "फार्म्युला' असण्याची शक्यता असल्याने महापौर कॉंग्रेसचाच होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर - शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणायचे आणि त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या इयत्तेत बसवायचे. मग ते विद्यार्थी इतरांशी कसे जुळवून घेणार ? त्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शोधले. त्यामुळे आता राज्यातील सुमारे 65 हजार शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे.
कऱ्हाड - जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असतानाच कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघामधील सर्व जागा राष्ट्रवादीने जिंकून मतदारसंघातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या कामगिरीमुळे, तसेच 45 वर्षांपासून कऱ्हाड तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष न मिळाल्याने या वेळी कऱ्हाड उत्तरमध्ये ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इतर दोन पक्षांशी युती करून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविली खरी. परंतु "माकप'च्या पदरात पुन्हा तीनच जागा पडल्या. "माकप'ला मिळालेल्या यशात यावेळी वाढ झाली नसून या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कायम राहिली आहे. गेल्या पाच वर्षांत दूषित पाणीपुरवठा, महागाई, इंधन दरवाढ, विडी कामगारांच्या समस्या तसेच सोलापूर शहरातील अनेक नागरी समस्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार आंदोलने उभारली.
कोल्हापूर - उसाची तोड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला 14 दिवसांत बिल देणे बंधनकारक आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस दिवसांनंतरही बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांवर आणि संबंधित कारखान्यांच्या संचालकांवर विशेष लेखा परीक्षकांच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने साखर आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली.
फलटण - जनसामान्यांच्या विचाराला सातत्याने "सकाळ'ने प्राधान्य दिले असून, वैचारिकदृष्ट्या जनमानसांत या वृत्तपत्राने आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे मत सकाळच्या फलटण विभागीय कार्यालयाच्या चौथ्या वर्धापनदिन कार्यक्रमात अनेक वाचकांनी व्यक्त करून सकाळच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सदिच्छा दिल्या.
कोल्हापूर - दोन वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषदेची वेबसाईट उद्यापासून नव्या रूपात, नव्या ढंगात कार्यान्वित होणार आहे. पदाधिकारी वगळता इतर अद्ययावत माहितीसह सर्व विभाग, त्यांचे कामकाज, त्यांच्या प्रमुखांची नावे असलेल्या वेबसाईटला केंद्र शासनानेही मंजुरी दिल्याने शासनाच्या संकेतस्थळावरही जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटची नोंद राहणार आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांनी जिल्हा परिषदेची वेबसाईट तयार केली.
कोल्हापूर - निवडणुका झाल्या, आचारसंहिता संपली आता मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी टोल रद्द करण्याबाबतचा निर्णय ताबडतोब घ्यावा, असे पत्रक कोल्हापूर जनशक्तीचे सुभाष वोरा यांनी दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूरच्या माथी मारलेल्या वादग्रस्त 220 कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आकारण्यात येणाऱ्या टोलच्या विरोधात व्यापक जनआंदोलन सुरू आहे. यात विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचेही लोकप्रतिनिधी व मंत्री प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी झाले आहेत.
कातरखटाव -खटाव तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे कातरखटाव परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजल पातळी कमालीची घटली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. निसर्गाच्या या अवकृपेने खरीपसह रब्बी हंगाम वाया गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे "आ' वासून उभा राहिला आहे. सातारा जिल्ह्याच्या नकाशावर खटाव तालुक्याची दुष्काळी तालुका अशी ओळख आहे.
इचलकरंजी - कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेने नगरपालिकेच्या जागेचा काढलेला लिलाव आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी थांबविला असला, तरी लिलावाची प्रक्रिया सायंकाळी पूर्ण झाली. सुमारे दोन कोटी रुपयांची जागा लिलावात 36 लाखांना विकली. गौरव यंत्रमाग औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष विजय लायकर यांची ही जागा आहे. नंतर ती इचलकरंजी पालिकेने विकत घेतली होती. जिल्हा बॅंकेचे संस्थेवर 1 लाख 89 हजारांचे कर्ज होते.