|
|
|
|
|
|
आमीर खानच्या बहूचर्चित 'सत्यमेव जयते' या खऱ्याखुऱ्या "रिऍलिटी शो'चे आज जोरदार स्वागत झाले. सवंग मनोरंजनाकडे न झुकता देशातील समस्यांवर प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम म्हणून सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. आजवरचे रिऍलिटी शो आणि 'सत्यमेव जयते' यातून आता भारतातील "रिऍलिटी शो' बदलत असल्याचे चित्र आहे. अशा शो च्या माध्यमातून समाजात खरोखरच काही बदल घडू शकतील?
Sunday, May 06, 2012 AT 04:26 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बोफोर्स प्रकरणाला पंचवीस वर्षे उलटून गेली. स्वित्झर्लंडचे माजी पोलिस स्टेन लिंडस्टॉर्म यांच्या ताज्या खुलाशामुळे आता पुन्हा नव्याने वादळ उठले आहे. राज्यसभेत विरोधकांनी या विषयावरून रान पेटवले. राजीव गांधी यांना बोफोर्स प्रकरणात प्रत्यक्ष दलाली मिळालेली नसली, तरी त्यांनी क्वात्रोची यांची पाठराखण चालवली होती असे लिंडस्टॉर्म यांनी उघड केले आहे.
Thursday, May 03, 2012 AT 01:34 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
फक्त १५ वर्षांपूर्वी ऑर्कुट, फेसबुकवर आपण एकमेकांना न बघता बोलू शकू असे म्हटले असते लोकांनी वेडयात काढले असते... पण आज तंत्रज्ञानाने ते शक्य केले आहे. मोबाईलच्या, नेटच्या माध्यमातून आपण जगात कोणालाही गाठू शकतो. भविष्यात मुलाचा वाढदिवस करायचा आहे...मग फेसबुकवरच निमंत्रण दिल्या जाईल, फेसबुकवरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केक कापायचा, टाळ्या वाजवायच्या...ऑनलाईन केक, जेवण ऑर्डर करून ते सर्वांच्या घरी पोहोचेल अशी व्यवस्था करायची...
Monday, April 30, 2012 AT 07:04 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
इमोशनली तुमच्या जवळ कोण? या प्रश्नाला महाराष्ट्रातल्या तरूणाईनं दिलेलं हे उत्तर होतं... आणि ताणतणावाच्या प्रसंगी, एखादी गोष्ट शेअर करावीशी वाटली की कुणाशी कऱता, या प्रश्नावर उत्तर आलं, मित्र, मैत्रिणी...ऑनलाईन फोरम... हा विरोधाभास वाटतो? की खरंच महाराष्ट्रातली तरूणाई स्वतःचा ताण घरापर्यंत पोहचू देत नाही? सध्याच्या युगात घरच्यांच स्थान नेमकं आहे तरी काय? ऑनलाइन चर्चेत सहभागी व्हा http://www.facebook.com/SakalNews या लिंकवर.
Monday, April 30, 2012 AT 02:16 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लाईफ बदललंय. इंटरनेट ही चैन नाही राहिलेली. माहितीपासून माहितीपर्यंतचा सारा प्रवास इंटरनेटवरच होतोय. याच प्रवासात 'फ्रेन्ड' भेटतात. 'अनफ्रेन्ड' होतात. टिकतात, ते व्हर्च्युअल जगातून खऱया जगातही साथ देतात. कोणी जॉबसाठी गाईड करतं तर कोणी कोर्सेससाठी...कोणी फसवूनही जाऊ शकतं... - इंटरनेटवर होणारी मैत्री किती टिकणारी? -- टिकणारी असेल, तर कारणं तरी कोणती? -- आणि नसेल टिकणारी, तर त्यालाही काहीतरी कारणं असतीलच! ऑनलाइन चर्चेत सहभागी व्हा http://www.
Monday, April 30, 2012 AT 09:31 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि आयुष्य समृद्ध करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग व्हायला हवा. परंतु, तंत्रज्ञानामुळे खासगी आयुष्यावर मर्यादा येत असतील तर त्यातून किंचित का होईना, सुटका करून घेतलेली बरी, असे प्रातिनिधिक मत "ईसकाळ' या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ब्लॉग पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून तरुणाईने व्यक्त केले आहे. तंत्रज्ञानात आलेले अद्भुत बदल...
Monday, April 30, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रोज उठून देवाचं दर्शन घ्यावं तसं 'फेसबुक' देवाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस कसा बरा जात नाही.  'फेसबुक'वर एकदा भेट दिली नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. फोटो अपलोड, फोटो शेअर, लाइक, कॉमेंट्स केल्या म्हणजे कसं जरा आयुष्यात चैतन्य आल्यासारखं वाटतं. आणि हो चॅट तर विसरलेच! चॅटसाठी अपॉइंटमेंट्स ही ठरलेल्या असतात. थोडक्यात काय, तर 'फेसबुक' हे आयुष्य झालंय. अनेकांचं...!  जुने मित्र-मैत्रिणी भेटतात आणि नवेही मिळतात...
Monday, April 30, 2012 AT 12:14 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मोबाईल गरज बनली आहे हे पूर्वी मोबाईलला विरोध करणारेही आता कबूल करू लागले आहेत. मोबाईल दिनक्रमाचा भाग बनला हेच कळत नाही. नंतर तो आपल्या पकडीतून सुटत नाही की आपण त्याचा, हा प्रश्न आजूबाजूला पाहिले की पडतो. तसे पाहिले तर मोबाईल संपर्काचे साधन! परंतु मोबाईलमुळे संवाद कमी झाला आहे, अशीही ओरड सुरू झाली आहे. खरच मोबाईलची गरज किती? बाजारात आलेला नवीन मोबाईल आपल्याकडे हवा असा अट्टाहास करताना अनेकजण दिसतात. काही मात्र मोबाईलचा गरजेपुरता वापर करतात.
Sunday, April 29, 2012 AT 01:56 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उर्वशी. वय वर्षे 18. पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजात शिकणारी तरुणी. दिवस उजाडल्याबरोबर तिला हाताशी मोबाईल लागायचा. दिवसाची सुरवात चार-दोन एसएमएसनी झाली नाही तर काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. मोबाईल म्हणजे तिचा जणू एक जिवलग सखाच होता. तसे तिला भरपूर मित्र-मैत्रिणी होते. खासगीत सांगायचं झालं तर बॉयफेन्डही होता. परंतु, मोबाईलचं तिच्या आयुष्यातलं स्थान जरा अतीमहत्त्वाचं होतं.
Saturday, April 28, 2012 AT 10:15 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भा रतीय संघ त्यावेळी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. 1989 चा तो काळ असेल. सचिन रमेश तेंडुलकरने कसोटीत पदार्पण केले होते. त्याने फार काही केले नव्हते. अर्थात तशी अपेक्षाही त्या काळी नव्हती. पण अब्दुल कादिरसारख्या बोलरला त्याने फोडले होते. त्याचवेळी गावसकर मागे पडला आणि सचिन हा नवा अवतार पुढे आला. लगेचच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने सेंच्युरी ठोकली आणि मग हा अवतार अधिकच आक्रमक होत गेला. कोणताही बोलर त्याच्या तावडीतून सुटला नाही.
Saturday, April 28, 2012 AT 03:35 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
"मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरला राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणेच चर्चासत्रं झडायला लागली. बहुतेकांचा सूर नकारात्मकच लागला. राज्यसभेचा खासदार होतोय म्हणजे खूप मोठी चूक आहे, राजकारणाच्या दलदलीत सचिनने पडू नये, त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती वगैरे प्रतिक्रिया तर अपेक्षितच होत्या. कारण, राजकारण हे क्षेत्र "स्वच्छ' माणसांसाठी नाही, हे आपलं आपणच ठरवून घेतलं आहे.
Friday, April 27, 2012 AT 03:33 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
एनसीटीसीसाठी ५ मे रोजी खास स्वतंत्र बैठकीचे आयोजन केल्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. देशातील सर्व दहशतवादविरोधी यंत्रणांमध्ये सुसूत्रता व समन्वय निर्माण करण्यासाठी केंद सरकारने राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंदाच्या (एनसीटीसी) स्थापनेची घोषणा केली. परंतु हा राज्यांच्या घटनात्मक अधिकारातील केंदाचा हस्तक्षेप ठरवत तेरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या स्थापनेला विरोध केला आहे. वस्तुस्थिती काय आहे? आपल्याला अशा यंत्रणेची गरज आहे की नाही?..
Wednesday, April 25, 2012 AT 06:24 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
देशाचा पुढील राष्ट्रपती हा राजकीय क्षेत्रातून नसावा, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आणि या सर्वोच्च पदासाठीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू झाली. अर्थातच, "ट्विटर' आणि "फेसबुक'सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर याची चांगली चर्चा रंगली आहे. "ट्विटर'च्या सध्याच्या "ट्रेंड्स'मध्ये अव्वल स्थानीही हाच विषय आहे.
Monday, April 23, 2012 AT 04:10 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गो. पु. देशपांडे यांनी लिहिलेलं नि अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेलं महात्मा जोतिबा फुले यांचं चरित्र सांगणारं ‘सत्यशोधक’ हे नाटक. सत्यशोधकी जलशाचं स्वरूप असलेलं. पुणे महानगरपालिकेच्या काही कामगारांनीही या नाटकात अभिनय केलाय. मुख्यत्त्वे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं चरित्र पावणेदोन तासात सोप्या पद्धतीने ह्या नाटकाच्या प्रयोगात समजून घेता येतं. नाटक आणि त्याच्या कलात्मक बाजूंबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये.
Monday, April 16, 2012 AT 03:31 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सेनादलाच्या सशस्त्र बंडाच्या वृत्तामुळे देशभरात खळबळ उडाली. दोन पथकांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करून लष्करप्रमुखांनी सशस्त्र बंडाचा घाटच रचला होता, अशी चर्चा सुरू झाली. लष्कर काय हालचाली करते आणि कुठे सरावासाठी निघते, याची माहिती सरकारला देणे बंधनकारक नसल्याचा खुलासा लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांसमोर केला आहे.
Wednesday, April 11, 2012 AT 06:58 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|