Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


ई सकाळ विशेष
- भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांचा राष्ट्रवादीचे लक्ष्मण टिकमाने यांनी पराभव केला.

Friday, February 17, 2012 AT 02:17 PM (IST)

लखनौ - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 56 जागांसाठी आज सुमारे 56 टक्के मतदान झाले. माओवादी प्रभावित भाग असूनही कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सत्ताधारी बहुजन समाज पक्षापुढे कॉंग्रेससह भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षाने आव्हान उभे केले आहे. कौशंबी, अलाहाबाद, सुलतानपूर, छत्रपती शाहू महाराजनगर, चंडौली, मिर्झापूर, सोनभद्र, वाराणसी, जौनपूर, संत रविदासनगर या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले.

Wednesday, February 15, 2012 AT 11:36 PM (IST)

सिडनी - 'ड' जीवनसत्त्वाची उणिव असलेल्या गर्भवती महिलांच्या मुलांना बोलताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनादरम्यान 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव असणाऱ्या 740 महिलांचा अभ्यास करण्यात आला. अँड्रिव व्हाइटहाऊसशी संलग्न असलेल्या टेलिथॉन इन्स्टिट्यूट फॉर चाइल्ड हेल्थ रिसर्चच्या प्राध्यापकांनी हा अभ्यास केला.

Wednesday, February 15, 2012 AT 05:57 PM (IST)

लंडन - तुम्हाला शाळेत भरघोस यश संपादन करायचे आहे का? तर, मग तुमच्यामधील चुकीच्या समजुती काढून टाका. कारण, किशोरवयीन (टीनेजर) मुलांना सात तासांपेक्षा अधिक झोपेची गरज नाही, असे खुद्द वैज्ञानिकांचेच मत आहे. अमेरिकेतील उटाह येथील ब्रिघम यंग विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या एका पथकाने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. जी मुले नियमित सात तास झोप घेतात, ती मुले शालेय पातळीवर चांगले यश संपादन करतात, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

Tuesday, February 14, 2012 AT 06:02 PM (IST)

मुंबई वार्तापत्र देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी याबरोबरच आशिया खंडातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र अशी अनेक बिरुदे मिरवणारी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी एकीकडे प्रचार शिगेला पोचला आहे आणि त्याच वेळी राजकीय व्यूहरचनाही तेजीत आली आहे. गोवा, केरळसारख्या लहान राज्यांना पोसू शकेल, एवढे अवाढव्य म्हणजे 21 हजार कोटींचे बिग बजेट असलेली ही पालिका राजकीय पक्षांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी.

Tuesday, February 14, 2012 AT 12:00 AM (IST)

शरद पवारांचा युतीवर हल्लाबोल - मनसेचे राजकारण महाराष्ट्राला मागे नेणारे पुणे - महाराष्ट्राचे काहीही होवो, पण सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजेच मुंबई आपल्याच मुठीत राहावी, असे शिवसेनेचे राजकारण आहे तर खोटेनाटे आरोप करून मते मागण्याचा धंदा भाजपचा आहे. या दोघांचेही राजकारण महापालिका निवडणुकीत पूर्णपणे संपणारे नसले तरी ते संपण्याच्या मार्गावर आहे.

Monday, February 13, 2012 AT 04:15 AM (IST)

वाशीम - वाशीम-बडनेरा या नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण प्रस्तावाला 2007 च्या रेल्वे बजेटमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यामुळे या भागातील मार्ग नव्या रेल्वेलाईनला जोडल्या जाणार अशा वाशीमवासींच्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यानंतर या प्रस्तावावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. तद्वतच अपेक्षित निधीही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या महत्त्वपूर्ण मार्गावरील सर्वेक्षणाचे काम अद्याप थंडबस्त्यातच पडून आहे.

Monday, February 13, 2012 AT 03:00 AM (IST)

वर्धा - एमबीबीएस डॉक्‍टरांच्या नोंदणी नूतनीकरणाकरिता पहिल्यांदाच इंडियन मेडिकल असोसिएशनला अधिकार दिले असून, डॉक्‍टरांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा सचिव डॉ. सचिन पावडे यांनी केले आहे. नोंदणी नूतनीकरणाचे अधिकार इंडियन मेडिकल असोसिएशनला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. एमबीबीएस डॉक्‍टरांना त्यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करावी लागते. त्याचे नूतनीकरण दर पाच वर्षांनी होते.

Monday, February 13, 2012 AT 03:00 AM (IST)

गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत कधी स्वबळावर, तर कधी अपक्षांच्या कुबड्या घेऊन सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपला सत्ता शाबूत राखण्याचे आव्हान आहे पण भाजप-शिवसेनेने घेतलेला काडीमोड मतविभागणी तर करणारच. शिवाय आघाडीला पोषक वातावरण निर्माण करणारा मुद्दा ठरला आहे. नाशिक महापालिकेची पाचवी पंचवार्षिक निवडणूक आहे. गेलेली पाच वर्षे युतीच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरली. जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माण योजनेमुळे महापालिकेची अर्थव्यवस्था कोलमडली.

Monday, February 13, 2012 AT 03:15 AM (IST)

यवतमाळ - बनावट दारू तयार केल्यानंतर ती कंपनीच्या बाटल्यांमध्ये व्यवस्थित पॅक करण्यासाठी साहित्य पुरविणाऱ्यांचा शोध आता उत्पादन शुल्क कार्यालयाचे कर्मचारी घेत आहेत. यासंदर्भात माहिती मिळविण्याकरिता अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची एक्‍साइज कोठडी सुनावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. 9) सायंकाळी पुसद येथील वसंतनगर परिसरात सुरू असलेल्या बनावट दारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा घातला.

Monday, February 13, 2012 AT 03:00 AM (IST)

नागपूर - ""कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली. राज्य रसातळाला गेले. आता निवडणुकांमध्ये सर्रास धनशक्तीचा वापर करून त्यांनी लोकशाहीची विटंबना चालविली आहे. लक्ष्मीदर्शनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. "सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता' हे त्यांचे सूत्र. आघाडीची ही मग्रुरी आता जनताच उतरविणार'' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

Monday, February 13, 2012 AT 03:15 AM (IST)

आर्वी (जि. वर्धा) - सतत 20 वर्षे चौकीदाराची नोकरी करून मालकाच्या साहित्याची रखवाली करणाऱ्या नोकराला अपघात होताच त्याला जखमी अवस्थेत त्याच मालकाने नोकरांच्या मदतीने रस्त्यावर बेवारस टाकून दिले. काहींना हे पाहवले नाही, त्यांनी सामाजिक कर्तव्य पार पाडीत या जखमी वृद्धाला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावरील उपचाराची व्यवस्था केली. रामदास बाबूलाल देऊळकर (वय 70) हे आर्वीच्या रामदेवबाबा वॉर्डातील रहिवासी.

Monday, February 13, 2012 AT 03:15 AM (IST)

वर्धा - भरधाव इंडिगो कारने ऍक्‍टिव्हा स्कूटी गाडीला आज सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान आरती चित्रपटगृह चौकात धडक दिल्याने मयूरी सुधीर ठाणे (वय 21) ही विद्यार्थिनी जखमी झाली. ती सोलापूर येथील रहिवासी असून वर्ध्यात शिक्षण घेत आहे. तिला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमएच 13 एई 4732 क्रमांकाच्या ऍक्‍टिव्हा दुचाकीने मयूरी ठाणे नागपूर मार्गाने दादाजी धुनिवाले मठाकडे जात होती.

Monday, February 13, 2012 AT 03:15 AM (IST)

अमरावती महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत आघाड्या तसेच नव्या पक्षांची संख्या वाढल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. 87 जागांसाठी 725 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस, माजी आमदार सुलभा खोडके व संजय खोडके यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, खासदार आनंदराव अडसूळ, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. प्रदीप शिंगोरे व माजी आमदार अनिल गोंडाणे यांच्या शिवसेना-भाजप-रिपाइं युतीने या निवडणुकीत उडी घेतली आहे.

Monday, February 13, 2012 AT 03:00 AM (IST)

यवतमाळ - देशातील एकूण 26 राज्यांमध्ये तुती रेशीम उत्पादन घेतले जाते. यातील पाच राज्ये पारंपरिक रेशीम उत्पादन करतात. तर, उर्वरित 21 राज्यात अपारंपरिक रेशीम उत्पादन घेतले जाते. यामध्ये 2010-2011 मध्ये चार हजार 291 हेक्‍टरवर सर्वाधिक 212 मेट्रिक टन रेशीम उत्पादन घेऊन महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना जोडधंदा व्हावा म्हणून तुती रेशीम उत्पादनासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.

Monday, February 13, 2012 AT 03:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: