पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण समितीला अद्याप राज्य सरकारने मान्यता दिली नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून प्राधिकरणाचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. पुढील आठवड्यात मंजुरी मिळाली नाही, तर सुमारे 500 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करणे अवघड होणार आहे. राज्य सरकारने एमआरटीपी 1966 कलम 113 (2) 2007 मध्ये पिंपरी प्राधिकरण कार्यकारी मंडळ आणि तांत्रिक सभेला मान्यता दिली होती.
पुणे - प्रचाराच्या रणधुमाळीत झालेली धावपळ... निवडणूक जिंकल्यानंतरचा हर्षोन्मेष, मग मिरवणुकांत झालेली दमणूक.... अशा धामधुमीतच गेले काही दिवस वावरणाऱ्या त्या... पण, हे श्रम आज काही क्षणात विरले, जेव्हा "सकाळ'मध्ये त्या एकमेकींना भेटल्या... पुढची पाच वर्षे महापालिकाच्या सभागृहात संख्येच्या हिशोबात "सर्वांत मोठा पक्ष' म्हणून वावरण्याची तयारी करणाऱ्या अनेकजणी आज पहिल्यांदाच एकमेकींना भेटत होत्या.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पवना नदीला सध्या गटारगंगेचे स्वरूप आले आहे. नदी सुधार योजना मार्गी लागण्यास उशीर होत आहे. त्यामुळे पवनेला प्रदूषणाचा विळखा कायम आहे. उद्योगांचे रासायनिक व घरगुती सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीपात्रात मिसळत असल्याने ही समस्या अधिकच उग्र बनत चालली आहे. शहरात प्रतिदिन 277 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. महापालिकेकडे 338 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.
पुणे - नैसर्गिक स्रोतांना ओरबाडून विकास साधला जात नाही. त्यामुळे अधोगती होते. विकासासाठी वेगळा मार्ग चोखाळण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रकाश गोळे यांनी व्यक्त केले. सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आरती किर्लोस्कर यांच्या हस्ते गोळे यांना "वसुंधरा जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांऐवजी कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला आहे. या संदर्भात गुरुवारी (ता. 23) सायंकाळी पाचला आकुर्डी येथील हॉटेल कुंदन पॅलेस येथे बैठक होणार आहे. या संदर्भात पक्षाचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
पुणे -  ""स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी "हिंदू राज्य' असा शब्द कधीच वापरला नव्हता. "राष्ट्राचे हिंदीकरण करा व हिंदीकरणाचे सैन्यीकरण करा' या विचारांचे सावरकर होते परंतु त्यांच्या या विचारांचा विकृत अर्थ घेतला जातो,'' असे मत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी बुधवारी व्यक्त केले. सहकारनगर येथे आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते. "सकाळ' या व्याख्यानमालेचा माध्यम प्रायोजक आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल.
पुणे - रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्याची छुपी तपासणी ग्राहक, स्वयंसेवी संस्था आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) अनेकदा घेण्यात आली होती. त्याची आकडेवारी वेळोवेळी राज्य शासनाकडे दिल्यानंतर विचारविनिमयाअंती इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पुणे - महापालिकेत भारतीय जनता पक्ष सक्षम विरोधकाची भूमिका बजावणार आहे. कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी अथवा पॅटर्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी बुधवारी व्यक्त केली. पुणे महापालिकेच्या 152 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी 77 नगरसेवकांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 51 जागा जिंकल्या असून, त्यांना कॉंग्रेसशीच आघाडी करावी लागेल.
पुणे - शहरात शंभर टक्के मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या धोरणात्मक प्रस्तावास बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी सहा लाख मीटर लागणार असून पहिल्या टप्प्यात तीन लाख मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च पाच हप्त्यांत मिळकतकराच्या बिलांतून वसूल केला जाणार आहे. समान पाणीपुरवठा करण्यासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पुणे - कोणी घरोघरी फिरून कपडे विकणारा...कोणी रिक्षाचालक.. तर कोणी कुल्फीचा व्यवसाय करणारा...हमाल, मेकॅनिक अन् बिगारी म्हणून रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली. मध्यरात्री लागलेल्या आगीने अनेक कुटुंबांना बेघर केले. घराच्या जळालेल्या अवशेषांमध्ये काही सापडेल का, या आशेने शोध घेणाऱ्या रहिवाशांकडून "जिंदगी रहेगी तो सब कुछ है' असा आत्मविश्वास पाहायला होता.
पुणे -  "आग लागली...आग लागली..' असे शब्द कानावर पडताचक्षणी भयभीत होऊन चिमुकल्यांना हृदयाशी कवटाळून मिळेल त्या रस्त्याने घराबाहेर धावणारे रहिवासी....त्यानंतर आरडाओरडा...गोंधळ अन् मोठमोठ्याने रडणारी लहान मुले व महिलांच्या आवाजाने भयभीत झालेले वातावरण... अंधारात आगीने धारण केलेले आक्राळविक्राळ रूप अन् धुराचे लोट...त्यातच एकामागून एक सिलिंडरचा होणारा स्फोट...
पुणे - "आग लागली पळा पळा', ही आरोळी ऐकून जागे झालो... समोर आगीचे तांडव दिसताच क्षणाचाही वेळ न घालवता मदतीसाठी आम्ही पळत सुटलो... असंख्य लोक आग लागलेल्या झोपड्यांकडे पळत होते... खरे तर अख्खी वस्ती मदतीसाठी धावून आली... घराची दारे तोडून, तर काहींच्या खिडक्या तोडून आगीत अडकलेल्यांना गल्लीबोळातून बाहेर काढले जात होते... जखमींना आधार देत तातडीने रुग्णालयाकडे नेले गेले... आग पसरू नये म्हणून वस्तीतील बहुतांश सिलिंडर रस्त्यावर आणले...
पुणे - मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा दुकाने-गोदामे व 15 घरे जळून खाक झाली. त्यांचे किमान 33 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या आगीची झळ सुमारे 35 झोपड्या, घरे व दुकानांना पोचली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. विजेच्या खांबावरून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. जुन्या बाजारात विमल कोपलिया यांचे रद्दी-कागदाचे गोदाम आहे.
पिंपरी - एटीएममधून काढण्यात आलेल्या पैशांमधील हजाराच्या एका नोटेवर नंबरच नसल्याची घटना बुधवारी (ता. 22) उघडकीस आली. शिवशंकर दत्तात्रेय शिंदे यांनी काळेवाडीतील पेट्रोल पंपावरील स्टेट बॅंकेच्या एटीएममधून 20 हजार रुपये काढले. त्यांना हजार रुपयांचा वीस नोटा मशिनमधून मिळाल्या. त्यामध्ये 3 डी ई 804665, 3 डी ई 804667 या क्रमांकामधील - 3 डी ई 804666 या क्रमांकाच्या नोटेवर नंबरच नव्हता. त्यामुळे श्री. शिंदे अचंबित झाले.
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांत जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, त्यानंतर पावसाची शक्यता आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा विचार करता येत्या मार्चपासून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात उन्हाळ्यातील पाणी नियोजनाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे पावसाळ्यात तुडुंब भरली.
पुणे - मौलाना अबुल कलाम आझाद यांचे व्यक्तिमत्त्व विद्वत्ता, कला, मानवता आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा असे सर्वगुणसंपन्न होते परंतु त्यांचे चरित्र उपेक्षित राहिले असल्याची खंत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी बुधवारी व्यक्त केली. "अक्षर मानव'तर्फे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी संपादित केलेल्या "आझाद कलाम' या पुस्तकाचे प्रकाशन वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
मोशी - श्री नागेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त महाराजांना अर्पण केलेल्या वस्तूंच्या लिलावामध्ये सोमवारी शेवटच्या मानाच्या विड्यासाठी 31 लाख रुपये बोली मिळाली. माजी नगरसेवक बबन बोराटे त्याचा मानकरी ठरले. मंदिराच्या सभामंडपामध्ये सकाळपासून लिलाव सुरू होता. गेल्या तीन पिढ्यांपासून या लिलावाची बोली करणारे रामभाऊ केदारी, नारायण केदारी व सागर केदारी आपल्या खड्या आणि खर्ज्यातल्या आवाजामध्ये लिलाव पुकारत होते.
पुणे -""कोणत्याही गोष्टीच्या उगमापर्यंत जाण्याची शक्ती केवळ मनुष्यातच असते. त्यामुळे प्रत्येकाने अंतर्मुख होऊन प्रत्येक गोष्टीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करावा,'' असे आवाहन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले. विश्व जागृती मिशनच्या पुणे शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनमालेत ते बोलत होते. ईश्वर, परमात्मा आदींबाबत सुधांशू महाराजांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""ज्याच्या नियमांमध्ये परिवर्तन होत नाही, तो ईश्वराचा अंश असतो.
पुणे - सजीव सृष्टीत निसर्गाची सर्वांत सुंदर निर्मिती म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पक्षिजीवनाचे अनेकविध कंगोरे उलगडणाऱ्या पक्षी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी निसर्गप्रेमी व पक्षिमित्रांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध वयोगटांतील पक्षिप्रेमी सहभागी झाले. नेचरवॉक, पुणे महापालिका व इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे - "न्यू इंडिया इन्शुरन्स' कंपनीकडून मोटारीच्या विम्याचा दावा मंजूर करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या संजीव वसंत देशपांडे या अधिकाऱ्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. देशपांडे यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जगदीश रामचंद्र वाडकर यांनी या बाबत "सीबीआय'कडे फिर्याद दिली. वाडकर यांच्या साडेचार लाखांच्या मोटारीच्या विम्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी देशपांडे यांनी दहा हजारांची लाच मागितली होती.
पुणे - वाहन परवाना (लायसन्स) व नोंदणी पुस्तक (आरसी बुक) प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) देण्यापेक्षा पोस्टामार्फत थेट घरी पोचविण्याच्या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. पत्ता नीट कळू न शकल्यामुळे दररोज शेकडो टपाल माघारी येत आहे. त्यामुळे सुमारे सात हजार लायसन्स व आरसी बुकचा ढीग साचला आहे. या प्रकाराला वैतागून ही योजना बंद करण्याचा, तसेच ती खासगी कुरिअर कंपनीकडे देण्याचा "आरटीओ'चा विचार आहे.
फुरसुंगी - पतीने केलेल्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून पत्नीने त्याच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले व स्वतः झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. 20) रात्री दोनच्या सुमारास फुरसुंगीच्या गुरुकृपा कॉलनीत घडली. या प्रकारात पती तीस टक्के भाजला असून, पत्नी बेशुद्धावस्थेत आढळून आली. दोघांनाही हडपसरच्या नोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे - जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यावर समितीने गुरुवारी (ता. 24) खास सभा बोलावली आहे. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात दीडशे कोटी रुपयांची वाढ होईल, तर जकातवाढीला समिती मान्यता देईल का, याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
पुणे - पोलिस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरुद्ध फरासखाना पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. रज्जाक मगदूम शेख (वय 23) व इरफान दाऊद शेख (वय 42, दोघेही रा. 928 कसबा पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गुलाम रसूल अन्वर (वय 20, रा. 916, कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर यांचे कागदीपुऱ्याजवळ "जनता हॉटेल' आहे.
पुणे - गवा या दुर्मिळ प्राण्याची शिंगजोडी बाळगल्याच्या आरोपावरून धायरी येथील गृहिणीला अटक करण्यात आली आहे. तिला 27 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तमिळनाडूत कोडईकॅनल या पर्यटनस्थळी साडेतीनशे रुपयांना विकत घेतलेली ही शिंगजोडी घरात "डेकोरेशन' म्हणून लावल्यानंतर संबंधित महिलेविरुद्ध अज्ञात व्यक्तीने वन खात्याकडे तक्रार केली होती. अनिता रामचंद्र रासकर (वय 55, रा.
पुणे - खून प्रकरणातील आरोपीचा पूर्ववैमनस्यातून खून केल्यानंतर त्याचे शिर कापून फिरणाऱ्या दोन आरोपींना दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना एक हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. सोहेल सुलेमान शेख (वय 30, रा. गुलटेकडी) याचा खून करणाऱ्या शब्बीर शमसुद्दीन शेख (वय 31) आणि जावेद रिझवान शेख (वय 22, दोघे, रा. कोंढवा) या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पुणे - मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवून चार मोटारी व सात मोटारसायकलींना उडविणाऱ्या ऋषभ भालचंद्र तळेकर याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे बुधवारी त्याला अटक झाली नाही. या घटनेत तीन जण जखमी झाले असून अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहेत. तळेकरने (वय 21, रा. संतोष श्रद्धानगर रहिवासी संघ, गोरेगाव, पूर्व मुंबई) मद्यधुंद अवस्थेत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लष्कर भागातून भरधाव मोटार चालविली होती.
पुणे - ""नगरपालिका, महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत देखील आम्ही क्रमांक एकवर आहोत. जिल्हा परिषदेत थोड्या जागा कमी पडल्या म्हणून काहीही फरक पडत नाही. यापुढे देखील कॉंग्रेस पक्ष क्रमांक एकवरच राहील,'' असा ठाम विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.
पुणे - तुमचे 2011-12 या आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत राहणार आहे का?, तुमच्या उत्पन्नात पगार आणि बॅंक बचत खात्यावरील व्याज या दोनच बाबी अंतर्भूत आहेत का?, तुमच्या बचत खात्यावरील वार्षिक व्याजाची रक्कम रु. 10 हजारांपर्यंत आहे का? जर वरील तीनही प्रश्नांची उत्तरे "हो' असतील आणि या उत्पन्नाव्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणतेही उत्पन्न नसेल, तर तुम्ही 2011-12 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकराचे विवरणपत्र (रिटर्न) सादर करण्याची गरज नाही.
पुणे - सुतारवाडी-पाषाण प्रभाग क्रमांक दहामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजयी उमेदवार रोहिणी चिमटे यांचा प्रचार केल्याबद्दल त्यांच्या समर्थकांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या आठ जणांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. के. देशपांडे यांनी मंगळवारी दिला. या गुन्ह्यात पाच महिलांसह 45 आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
पुणे - गुणवत्ता व नवनिर्मितीची क्षमता या दोन गोष्टींच्या माध्यमातून रोबोकॉन स्पर्धा महाराष्ट्रासह देशातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या एक ते तीन मार्चदरम्यान "एमआयटी'च्या महाराष्ट्र ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग व दूरदर्शनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील दहावी रोबोकॉन स्पर्धा होत आहे, अशी माहिती "एमआयटी'चे कार्यकारी संचालक व या स्पर्धेचे निमंत्रक डॉ. सुनील कराड यांनी दिली.