पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील विविध विभागांची प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रीया सुरू झाली आहे.
Pune University
Pune Universityesakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील विविध विभागांची प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रीया सुरू झाली आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील विविध विभागांची प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रीया सुरू झाली आहे. या प्रवेश परीक्षांच्या तारखाही आता विद्यापीठाने जाहीर केल्या असून, २१ ते २४ जुलै दरम्यान या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या किंवा शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातील विविध विभागांची प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बहुपर्यायी पद्धतीतील ही परीक्षा १०० गुणांची असून, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडेल. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे. दोन तासाची ही परीक्षा १०० गुणांची असेल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेश परीक्षेसंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा -

- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - १२ जुलै

- विलंब शुल्कासहीत - १७ जुलै

- परीक्षेचा कालावधी - २१ ते २४ जुलै

संकेतस्थळ - https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com