आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

Income Tax Department
Income Tax Departmentesakal
Summary

आयकर विभागानं गुणवंतांकडून मल्टी टास्किंग स्टाफसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

आयकर विभागानं (Income Tax Department) गुणवंतांकडून मल्टी टास्किंग स्टाफसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना आयकर विभागात काम करायचं आहे, त्यांनी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर incometaxindia.gov.in जावून आपला अर्ज करावा.

रिक्त जागा तपशील

आयकर विभागाच्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार 18 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे आयकर निरीक्षक पदासाठी 1 जागा, कर सहाय्यक पदासाठी 5 रिक्त जागा आणि मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदासाठी 18 रिक्त जागा आहेत. एकूण 24 पदं रिक्त आहेत.

Income Tax Department
भाजपला मतदान करणं पडलं महागात; मुस्लिम महिलेला घराबाहेर हाकललं

शैक्षणिक पात्रता

आयकर निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर पदवी घेतलेली असावी.

कर सहाय्यक : प्रति तास 8000 की डिप्रेशनच्या डेटा एंट्री गतीसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावं.

मल्टी-टास्किंग स्टाफ : एमटीएस पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : आयकर निरीक्षक पदासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे एवढं असावं. तर कर सहाय्यक पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे दरम्यान असावी. दुसरीकडं 18 वर्षे ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदासाठी अर्ज करू शकतात. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Income Tax Department
Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!

7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

आयकर निरीक्षक : 9300 ते 34800 रुपये (ग्रेड पे रु. 4600)

कर सहाय्यक : 5200 ते 20200 रुपये (ग्रेड पे रु. 2400)

मल्टी-टास्किंग स्टाफ : 5200-20200 रुपये (ग्रेड पे रु. 1800)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com