MPSC : माध्यमातून होणार मेगा भरती - दत्तात्रेय भरणे

आगामी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( एमपीएससी) च्या ३०० परीक्षांच्या माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSakal
Summary

आगामी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( एमपीएससी) च्या ३०० परीक्षांच्या माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार.

वालचंदनगर - आगामी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) (MPSC) च्या ३०० परीक्षांच्या (Exam) माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया (Mega Recruitment) राबवली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली आहे.

भरणेवाडी (ता.इंदापूर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून इंदापूर व बारामती तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडल्या होत्या. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन एमपीएसीची सदस्यांची नेमणूक करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पाठपुरावा केला. राज्यपालांची सहीसाठी मी स्वतः भेट घेवून सही घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३०० परीक्षांची जाहिरात दिली असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे. आगामी सहा महिन्यामध्ये राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ८ हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

सत्कारमुर्ती विद्यार्थी

प्रतीक्षा ज्ञानदेव वणवे (रा. लाकडी), चेतन ढावरे (रा. इंदापूर शहर), निलेश दिलीप ओमासे (रा.कळस), दिपाली धालपे (रा. घोलपवाडी), अशोक बाळासो नरुटे (रा. काझड), अनिकेत वाघ (रा. अकोले), शैलेश मोरे (रा. रणगाव) व बारामती तालुक्यातील प्राजक्ता श्रीनिवास देवकाते - घुले (रा. पिंपळी) यांचा सत्कार सत्कार करण्यात आला.

Dattatray Bharane
दहावी उत्तीर्ण अन् पदवीधरांना विविध पदांवर सरकारी नोकरीची संधी

विद्यार्थ्याचे स्वप्न होणार पूर्ण

ग्रामीण भागासह शहरातील मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न असते. सामान्य प्रशासन मंत्री झाल्यानंतर एमपीएसीची च्या संदर्भात मुले-मुली वारंवार भेटत होती. त्यांच्या अडचणी सांगत होते. त्यांची तळमळ पाहून तातडीने एमपीएसच्या परीक्षेचा प्रश्‍न मार्गाी लावला असून सहा महिन्यामध्ये ८ हजार पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

मुलाने स्पर्धा परीक्षा पास होवून अधिकारी होणे आई वडिलांचे स्वप्न असते. ही परीक्षा संयमाची व विद्यार्थ्याच्या वाढत्या वयाची परीक्षा असते. एमपीएससीच्या परीक्षासंदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेवून तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण केल्याने कुंटूबाचे व आमचे स्वप्न वेळेत पूर्ण करु शकलो असल्याचे नवनिर्वार्चित पोलीस उपनिरीक्षक निलेश ओमासे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळाला

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना ग्रामीण भागातील पालकांची तसेच मुलांची तळमळ माहीत असल्याने मामांनी पाठपुरावा करून रखडलेले भरती प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आमचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे निवड झालेल्या पोलिस उपनिरीक्षक प्राजक्ता घुले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com