Mumbai Metro Job : इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, लवकर करा अर्ज

इंजिनिअर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे
Metro Mumbai jobs
Metro Mumbai jobs

MMRCL Recruitment 2022: इंजिनिअर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRCL) सहाय्यक महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उप व्यवस्थापक यासह विविध पदांच्या भरतीसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना येथे नोकरी करण्याची इच्छा आहे ते MMRCL च्या वेबसाईट mmrcl.com यावर जाऊन अर्ज करू शकतात.

Metro Mumbai jobs
Pune Metro Job: इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, २१ मार्चपर्यंत करा अर्ज

अशा आहेत जागा (MMRCL Recruitment 2022)

सहाय्यक महाव्यवस्थापक- ५

सहाय्यक व्यवस्थापक - २

उप व्यवस्थापक- २

ज्युनियर सुपरवायझर- १

ज्यूनियर इंजिनिअर्स- १६

असिस्टंट (IT)- १

Metro Mumbai jobs
ऑफिसचा मेल करताना Emoji वापरता का? Research काय सांगतो वाचा!

या तारखेपर्यंत करा अर्ज - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) ने प्रसिद्ध केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. MMRCL ने भरतीसाठी १५ एप्रिलपपर्यंत अर्ज करण्यासाठी सांगितले आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत.

मुलाखतीद्वारे होईल निवड - जे उमेदवार नोकरीसाठी अर्ज करतील त्यांना आधी शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर उमेदरवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यासाठी संबधित उमेदवाराची पात्रता आणि याआधीचा अनुभव विचारात घेतला जाणार आहे.

Metro Mumbai jobs
ऑफिस मिटींगला जाण्यापूर्वी फॉलो करा 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी

याप्रकारे पाठवा अर्ज

mmrcl.com या वेबसाईटवर जा.

होमपेजवर Careers हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा आणि Recruitment पेजवर जा

आता संबंधित नोकरीच्या लिक वर जाऊन Apply Online वर क्लिक करा.

आता सर्व आवश्यक माहिती देऊन पूर्ण अर्ज भरा.

अर्ज डाऊनलोड करा आणि गरजेसाठी त्याची प्रिंट आऊटही काढा.

सरकारी विभागात काम करणार्‍या उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात एमएमआरसीएल उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे, (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर पाठवावेत.

Metro Mumbai jobs
Post Office : १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीसह आकर्षक पगाराची संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com