१०वी आणि ITI उत्तीर्णांची naval dockyardमध्ये भरती

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार dasapprenticembi.recttindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
merchant navy
merchant navygoogle

मुंबई : नौदलात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेव्हल डॉकयार्ड मुंबईने अप्रेंटिसच्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार dasapprenticembi.recttindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

merchant navy
एनडीएच्या पहिल्या महिला तुकडीत शानन ढाका सर्वोच्च स्थानी

या भरतीतून ३३८ पदे भरली जाणार आहेत. निवड झाल्यानंतर, उमेदवारांना स्टायपेंड तसेच डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२२ आहे.

अ‍ॅप्रेंटिसशिप दोन प्रकारची असेल म्हणजे एक अप्रेंटिसशिपमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण असेल आणि दुसरे दोन वर्षांचे प्रशिक्षण असेल. एक वर्षाच्या शिकाऊ उमेदवारीसाठी ३०३ पदांची भरती केली जाईल. यात इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रोप्लेटर, मरीन इंजिन फिटर, फाउंड्री मॅन, पॅटर्न मेकर, मेकॅनिक डिझेल, मशिनिस्ट, पाईप फिटर, मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर, टेलर, पेंटर इत्यादी पदांचा समावेश आहे. दुसरीकडे, दोन वर्षांच्या अप्रेंटिसशिपमध्ये ३५ जागा रिक्त आहेत ज्यात शिपराईट स्टील, रिगर आणि हीट ट्रीटर या पदांसाठी भरती केली जाईल.

वय मर्यादा

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचा जन्म १ ऑगस्ट २००२ ते ३१ ऑक्टोबर २००८ दरम्यान झालेला असावा.

शैक्षणिक पात्रता

अर्जदार उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच ज्या ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी ६५ टक्के गुण मिळाले आहेत, त्या ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. २२ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जातील ज्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील त्यांनाच मुलाखत चाचणी आणि कौशल्य चाचणीत बसण्याची संधी दिली जाईल.

स्टायपेंड

प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षात, ITI उत्तीर्णांना ७ हजार रुपये स्टायपेंड म्हणून, तर फ्रेशर्सना ६ हजार रुपये प्रति महिना मिळतील. यासोबतच दुसऱ्या वर्षी स्टायपेंडच्या रकमेत १० टक्के वाढ करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com