मार्ग सर्जनशीलतेचे : ॲनिमेशन : उत्तम व हटके पर्याय

ॲनिमेशन हा शब्द मुळात ‘ॲनिमा’ या लॅटिन शब्दापासून आला आहे. लॅटिन भाषेत ॲनिमा म्हणजे आत्मा-जीव. Inanimate म्हणजे निर्जीव.
Animation
AnimationSakal
Summary

ॲनिमेशन हा शब्द मुळात ‘ॲनिमा’ या लॅटिन शब्दापासून आला आहे. लॅटिन भाषेत ॲनिमा म्हणजे आत्मा-जीव. Inanimate म्हणजे निर्जीव.

ॲनिमेशन हा शब्द मुळात ‘ॲनिमा’ या लॅटिन शब्दापासून आला आहे. लॅटिन भाषेत ॲनिमा म्हणजे आत्मा-जीव. Inanimate म्हणजे निर्जीव.

एखाद्या निर्जीव गोष्टीत प्राण अथवा जीव ओतणे म्हणजे ॲनिमेशन. ही एक प्रभावी कला आहे. खरंतर ६४ कलामध्ये या नवीन कला प्रकाराचा समावेश करावा लागेल. या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम निवडतांना चित्रकलेची आवड, रंगसंगतीचे ज्ञान, निरीक्षण क्षमता, कल्पनाशक्ती, भाषेवरील प्रभुत्व, संवाद कौशल्य तसेच तंत्रज्ञान व विविध सॉफ्टवेअर प्रणाली आत्मसाद करण्याची आवड हवी, तसेच नवनिर्मितीचा ध्यास व आस असणे आवश्यक आहे.

ॲनिमेशन क्षेत्रामध्ये करिअर करतांना आपण एखाद्या प्रकल्पावर काम करीत असताना सांघिक काम करण्याची क्षमता, संघ भावना, खिलाडूवृत्ती, प्रसंगी अपयश पाचवण्याची ताकद हेही गुण अंगी असणे आपेक्षित असते. या अनिमेशन क्षेत्रात नोकरीच्या व स्वतःचा व्यवसाय थाटण्याच्या नामी संधी आज उपलब्ध आहेत आणि भविष्यात देखील त्या वाढतच जाणार आहेत. ज्या गतीने मोबाईल फोनचा प्रसार, मोबाईल क्रांती झाली आहे, स्मार्ट मोबाईल फोनची दिवसेंदिवस वाढती मागणी या बाबी लक्षात घेता Gaming Application, Entertainment, Infotainment सारख्या प्रणाली, प्रकल्प विकसन करण्याच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध आहेत.

दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील व्यंगचित्र, विडंब चित्र, हास्य चित्रपट (Cartoon) मालिका.‌ उदा. छोटा भिम, पोकेमॉन, मिकी ॲण्ड माऊस,‌ जय गणेश, मोगली इत्यादी अश्या प्रकारच्या मालिका विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे. भविष्यात ती वाढतच जाणार आहे. पूर्वी अशा फिल्म तयार करतांना असंख्य चित्र हाताने काढावे लागत असत. ज्या गतीने दूरचित्रवाहिन्या निर्माण होत आहेत आणि कार्यरत आहेत, खरंतर या क्षेत्राला आवश्यक मनुष्यबळ निर्माण करणे हे देखील मोठे आव्हान आहे. विविध वाहिन्यांवरील कार्यक्रम, शीर्षक गीते, शीर्षके, दर्जेदार ग्राफिक्स, प्रभावी मांडणी, या सर्वांची योग्य जुळवाजुळव हे मोठे आकर्षण व कुतूहलाचा विषय होऊन बसले आहेत.

जाहिरात, सिने-नाट्य, चित्रपटसृष्टीला, प्रिंट मिडियाला देखील कुशल ॲनिमेटर, ग्राफिक्स डिझायनर, व्हिडिओ व साऊंड एडिटर/इंजिनिअरची मोठी गरज आहे. सध्याच्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे E-content, E-learning, Teaching Learning and Evaluation तसेच E-commerce व M-Commerce क्षेत्रात प्रणाली व टेक्निकल कन्टेन्ट विकसित करणे, प्रभावीपणे मांडणी करणे, समर्पक ध्वनी व प्रकाश योजना व या सर्व बाबींचा योग्य परिणाम घडवून आणणे यासाठी कल्पकतेला आणि नावीन्यपूर्ण गोष्टीना मोठा वाव आहे.

बारावी शास्त्र शाखेचे उत्तीर्ण विद्यार्थी हे बीएस्सी (ॲनिमेशन) या अभ्यासक्रमाची निवड करू शकतात, तर कला, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी हे बी. व्होक (ॲनीमेशन) या अभ्यासक्रमाचा पर्याय आहे. काही विद्यार्थी दहावीनंतर लगेचच या क्षेत्राची निवड करू इच्छित असल्यास ॲनिमेशन संबंधीचे प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये प्रामुख्याने फ्लॅश (Flash), 2D, 3D-Animation, Maya, VFX(Visual Effects), Gaming, Basics of Design, Graphics Design, Video/Audio Recording and Editing साठी लागणाऱ्या विविध प्रणाली शिकविल्या जातात जेणेकरून प्रवेशित विद्यार्थ्यांना नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.

ॲनिमेशन पर्याय निवडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या देखील मिळाल्या आहेत, तर अनेकांनी लहान वयात स्वतः च्या कंपनी सुरू केल्या आहेत व विद्यार्थी अनेक प्रकल्पावर काम करीत आहेत. त्यामुळे ॲनिमेशन या क्षेत्राचा करिअर म्हणून उत्तम व हटके पर्यायाचा विचार केला पाहिजे. आपली आवड, कला व कुवत लक्षात घेऊन करिअरचा पर्याय निवडला, तसेच निवडलेल्या करिअरच्या पर्यायाला जिद्द, चिकाटी व कष्टाची जोड दिली तर यश निश्चितच आपल्या पदरी पडेल.

(लेखक मॉडर्न महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com