दहावी पास आहात? SSCने काढली तब्बल ३,२६१ जागांसाठी भरती

दहावी पास आहात? SSCने काढली तब्बल ३,२६१ जागांसाठी भरती

नागपूर : सद्या कोणत्याही वर्गाच्या भरत्या बंद असल्याने अनेकजण घरीच बसून आहेत. नोकरी मिळत नसल्याने अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशातच वय वाढत असल्याने शासकीय नोकरीची आशा धूसर होत आहे. आता मात्र स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे तब्बल ३,२६१ जागांची भरती केली जाणार आहे. दहावी व बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज ९ भरतीअंतर्गत तब्बल ३२६१ पदांची भरती करण्यात येणार आहे. याअंतर्गत एमटीएस, चालक. वैज्ञानिक साहाय्यक, लेखापाल, मुख्य लिपिक, संवर्धन साहाय्यक तांत्रिक अशा एकूण ३,२६१ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार २८ ऑक्टोबरपर्यंत विहित अर्ज शुल्क ऑनलाइन भरू शकतील.

दहावी पास आहात? SSCने काढली तब्बल ३,२६१ जागांसाठी भरती
पर्यटन सुरू होण्यापूर्वी ताडोबा-अंधारी हाऊसफुल्ल

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) त्यांच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर सिलेक्शन पोस्ट फेज ९ अंतर्गत पदवीधर, बारावी पास आणि दहावी पासची भरती सुरू केली आहे. एसएससी निवड पोस्ट फेज ९ अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. जे उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांना प्रत्येक श्रेणीच्या पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल.

जानेवारी-फेब्रुवारी मध्ये ऑनलाइन परीक्षा

एमटीएस, चालक, वैज्ञानिक साहाय्यक, लेखापाल, मुख्य लिपिक, संवर्धन साहाय्यक तांत्रिक अशा एकूण ३,२६१ रिक्त जागांवर उमेदवारांची भरती केली जाईल. उमेदवार २८ ऑक्टोबरपर्यंत विहित अर्ज शुल्क ऑनलाइन भरू शकतील. तर चालानद्वारे शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख १ नोव्हेंबर २०२१ आहे. भरतीसाठी उमेदवारांना जानेवारी/फेब्रुवारी २०२२ मध्ये ऑनलाइन परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल.

दहावी पास आहात? SSCने काढली तब्बल ३,२६१ जागांसाठी भरती
रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

भराव लागेल शंभर रुपये शुल्क

दहावी पास ते पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. पोस्टनुसार निर्धारित पात्रतेचा तपशील तपासल्यानंतर उमेदवार अर्ज नोंदणी करू शकतील. अर्ज करण्यासाठी शंभर रुपये शुल्क देखील भरावे लागेल. ऑनलाइन परीक्षा आणि कौशल्य चाचणीमधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. कोणतीही अधिकृत माहिती फक्त अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com