|
|  |
 | राजन सुर्वेंचा शिवसेना प्रवेश निश्चित रत्नागिरी, ता. १६ - कॉंग्रेसकडून युवक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने नाराज
झालेले युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजन सुर्वे यांनी कार्यकर्त्यांसह
शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. |
वेंगुर्लेत पालिका कर्मचाऱ्यांना कोंडले वेंगुर्ले, ता. १६ - शहरातील गाडीअड्डा येथील दूधगंगा कॉम्प्लेक्समधील
सांडपाण्याची व्यवस्था योग्यप्रकारे न केल्याने नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाला
वेळोवेळी निवेदने देऊनही त्याची दखल न घेतल्याने संतप्त गाडीअड्डावासीयांनी आज
रात्री आठपर्यंत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवले. |
कारिवडेत ३५ लाखांचा बहुउद्देशीय प्रकल्प सावंतवाडी, ता. १६ - कारिवडे-भैरववाडी येथील श्री क्षेत्र इसवटी ब्राह्मण देव स्थळ
परिसर विकास समिती बहुउद्देशीय विकास समितीच्यावतीने लोकवर्गणी व लोकसहभागातून
कारिवडे येथे ३५ लाख रुपये खर्चून बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात येत आहे. |
पुष्पसेन सावंतांचे नारायण राणेंच्या विरोधात बंड कुडाळ, ता. १६ - जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर करताना विश्वासात न
घेतल्यामुळे आपण जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे
पाठविला आहे; मात्र पक्षाचा राजीनामा देत नसून पक्षात राहून पक्ष ताब्यात
घेणाऱ्यांविरोधात सातत्याने लढा देत राहू, असे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी आज
पत्रकार परिषदेत सांगितले. |
हत्ती हटाओ मोहीम आता अधिकच तीव्र बांदा, ता. १६ - हत्तींना तिलारी बुडीत क्षेत्राकडे हुसकाविण्यासाठी वन विभागाने
हत्ती हटाओ मोहीम तीव्र केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५० कर्मचारी या मोहिमेवर
नियुक्त केले आहेत. |
|
|  |
|