|
|  |
 | बॅंकॉकऐवजी मुळे यांचा कोपरगावला परतीचा प्रवास कोपरगाव, ता. १६ - औरंगाबाद विमानतळावर दीड तास वीजपुरवठा नसल्याचा फटका येथील
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. डी. एस. मुळे यांना बसला. जागतिक मधुमेह परिषदेला
जाण्यापासून डॉ. मुळे यांना यामुळे वंचित राहावे लागले. |
शाळांमध्ये पाणी, शौचालये अनिवार्य ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये यंदा डिसेंबरअखेर पिण्याचे पाणी आणि शौचालयांची
व्यवस्था करणे अनिवार्य ठरणार असून, सर्व राज्यांनी याबाबत वचनबद्धता व्यक्त केली
आहे. पण, ही वचनबद्धता केवळ कागदापुरतीच मर्यादित असले का? आपली मते लिहा सकाळ ब्लॉगवर |
नूतनीकरणासाठी ४० कोटी उपलब्ध - कोल्हे राहाता, ता. १६ - गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी पाटबंधारेमंत्री अजित पवार
यांच्या पुढाकारातून ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या महिनाभरात
प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे. |
दर्जेदार आंब्याअभावी कोट्यवधीचे नुकसान रत्नागिरी, ता. १६ - विचित्र हवामानाचा मोठा फटका बसल्यामुळे या वर्षी बाजारपेठेत
दर्जेदार आंबा पोहोचलेला नाही. दर्जेदार आणि प्रमाणित आंबा नसल्याने निर्यातही
पूर्णपणे थंडावली आहे. |
पत्रकारांना अमर्याद मोफत प्रवास मुंबई, ता. १६ - राज्यातील अधिस्वीकृती पत्रकारांना एसटी महामंडळाच्या साध्या आणि
निमआराम बसगाड्यांतून महामंडळाच्या ओळखपत्राच्या (स्मार्ट कार्ड) आधारे अमर्याद
विनामूल्य प्रवासाची सवलत देण्याचा आदेश राज्य सरकारने आज काढला. |
ठेकेदारांना दंडाच्या नोटिसा श्रीरामपूर, ता. १६ - गोदावरी नदीपात्रातून वाळूचा बेकायदेशीर उपसा केल्याप्रकरणी
तहसीलदार सेगा मावची यांनी ठेकेदार चंद्रकांत दहिहंडे व साहेबराव औताडे यांना
अनुक्रमे २२ लाख २२ हजार ७२५ रुपये व १० लाख सात हजार ५२५ रुपये दंडाची नोटीस
बजावली आहे. |
इमारतीचा सामूहिक पुनर्विकास? मुंबई, ता. १६ - म्हाडाच्या अधिनियम ३३ (९) मधील दुरुस्तीच्या आधारावर
रहिवाशांच्या हितासाठी नुकताच म्हाडाने एक प्रस्ताव संमत केला आहे. |
|
|  |
|