|
|  |
 | ठाण्यात अबू आझमींच्या गाडीवर दगडफेक ठाणे, ता. १६ - शहरातील वागळे इस्टेट विभागातील इंद्रानगर येथे प्रचार करीत असताना
समाजवादी पार्टीचे खासदार अबू आझमी आणि त्यांच्या पक्षातील ठाणे लोकसभा
पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार चंद्रशेखर शुक्ला यांच्या गाड्यांवर जोरदार
दगडफेक करण्यात आली. |
आवाज कुणाचा... कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची
गुरुवारी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली व ठाणे लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना-
भाजपचे उमेदवार आनंद परांजपे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. |
कल्याण--डोंबिवलीत आज प्रचाराचा धुरळा डोंबिवली, ता. १६ - आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी राज्याचे
अर्थमंत्री जयंत पाटील यांची प्रचारसभा बाजीप्रभू चौकात उद्या (ता.१७) संध्याकाळी
सहा वाजता आयोजित केली आहे. |
सातपाटी-मुरबे खाडीत माशांचा मृत्यू बोईसर, ता. १६ - तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाण्याच्या
प्रदूषणामुळे सातपाटी-मुरबे खाडीतील मासे तडफडून मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे
किनाऱ्यावर; तसेच भरतीच्या पाण्यावर मृत माशांचा सडा पडला आहे. |
मुंबईत ७८ उपकरप्राप्त इमारती धोकादायक मुंबई, ता. १६ - दर वर्षीप्रमाणे "म्हाडा'तर्फे करण्यात येणारे उपकरप्राप्त
इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. यात मुंबईतील ७८
उपकरप्राप्त इमारतींना धोकादायक ठरविण्यात आले आहे. |
नवी मुंबई पोलिस उपायुक्तपदी एन. डी. चव्हाण मुंबई, ता. १६ - राज्य पोलिस दलातील अधीक्षक व उपायुक्तपदाच्या चार; तर उपअधीक्षक
व सहायक पोलिस आयुक्तपदाच्या सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज सायंकाळी
गृहखात्याने केल्या. |
जामसांडेकर खूनप्रकरणी आणखी एकाला अटक मुंबई, ता. १६ - साकीनाका येथील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या
हत्येची सुपारी देण्यासाठी दगडी चाळीत बैठक घेण्याची महत्त्वाची जबाबदारी पार
पाडलेला आरोपी व अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता संदीप गांगण ऊर्फ सॅंडी याला
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. |
द्वितीय कला शाखेचा पेपर पुन्हा होणार - डॉ. हरीचंदन मुंबई, ता. १६ - मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागामार्फत घेतल्या
गेलेल्या द्वितीय वर्ष कला विभागाच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत काल
झालेल्या गोंधळानंतर हा पेपर २२ मे रोजी घेण्याचा निर्णय आजच्या तातडीच्या बैठकीत
घेण्यात आला. |
एअर इंडियाचे विमान आपटले मुंबई, ता. १६ - दुबईला उड्डाण करण्यापूर्वी सुरू असलेल्या अखेरच्या तपासणीत एअर
इंडियाच्या विमानात बिघाड असल्याचे लक्षात आले. |
मुंब्रयात अकरा बांगलादेशींना अटक ठाणे, ता. १६ - देशात घुसखोरी करून मुंब्रयात आपले बस्तान बसविणाऱ्या अकरा
बांगलादेशींना मुंब्रा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. यात पाच पुरुष आणि सहा
महिलांचा समावेश आहे. |
नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या राजद प्रवक्त्याला अटक मुंबई, ता. १६ - मध्य मुंबईतील बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून
सर्वसामान्य नागरिकांकडून सहा लाख रुपये उकळणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या
प्रवक्त्याला माटुंगा पोलिसांनी मिरा रोड येथून अटक केली आहे. मनोज सिंग असे या
आरोपीचे नाव आहे. |
वर्षभराचे कंत्राट असूनही नालेसफाई एप्रिलपासून ंमुंबई, ता. १६ - पावसाळा जवळ येऊ लागल्यावर नालेसफाईबाबत जोरदार चर्चा सुरू होते.
नालेसफाईसाठी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. वर्षभराचे कंत्राट दिले
असताना कंत्राटदारांनी एप्रिल महिन्यापासूनच नालेसफाईला सुरुवात झाली आहे. |
आघाडीचे स्थिर सरकार हीच नाईक यांच्या विजयाची पावती कल्याण, ता. १६ - केंद्र आणि राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे स्थिर सरकार हीच आघाडीचे
उमेदवार संजीव नाईक यांच्या विजयाची पावती आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश
सरचिटणीस गुरुनाथ कुलकर्णी व डॉ. गजानन देसाई यांनी काल (ता.१५) येथे पत्रकार
परिषदेत सांगितले. |
हिंदी भाषकांना शिवसेनेने कधीही विरोध केला नाही - मनोहर जोशी उल्हासनगर, ता. १६ - शिवसेनेने यापूर्वी हिंदी भाषकांना कधीही विरोध केलेला
नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे
यांनी घेतल्याने शिवसेनेला जनाधार मिळत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व माजी
लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांनी येथे केले. |
|
|  |
|