|
|  |
| अपेक्षा...आखाडे... आणि स्वप्नपूर्ती (योगिता बाराथे)
आम्हाला बांधकाम करायचं व एवढे आमचं बजेट या दोन वाक्यांव्यतिरिक्त आम्हाला बाकी
काही माहिती नव्हतं. एक बंगला बने न्यारा अशीच आमची इच्छा होती. ....... |
आयटी, बीटी आणि टाऊनशिप (ओंकार भिडे)
नॅसकॉमच्या एका ताज्या सर्वेक्षणात पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या
कर्मचाऱ्यांची संख्या २३ टक्क्यांच्या पुढे आहेत. हा आकडा थोडाथोडका नाही. कारण
या आकड्याच्या आसपास असे एकही क्षेत्र नाही. याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम
विविध गोष्टींवर होते. त्यात घरांची वाढती मागणी, हाही एक महत्त्वाचा मुद्दा
आहे... ...... |
स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी... (हेमंत माहेश्वरी)
'3D Visualization of Interior Design' हा एक नवा ट्रेंड आपल्या देशात रुजू पाहतो
आहे. स्वप्नातील घर, त्याचे फर्निचर व त्याला सजवण्यात आणि तयार करण्यात याची आणखी
मदतच होईल. ...... |
तुमच्या मुलांची खोली (मनोज अणावकर)
जागांचे भाव कमी न करता क्षेत्रफळ थोडंसं लहान करून जागा विकायची एक नवी टूम
अस्तित्वात आली आणि घरांच्या जाहिरातींमधून वन अँड हाफ किंवा टू अँड हाफ बीएचके
आकाराचे फ्लॅट्सही उपलब्ध असल्याच्या जाहिराती आपल्या वाचनात यायला लागल्या.
....... |
परताव्याच्या आशेने प्रॉपर्टीत गुंतविताना... (किरण सुंदर)
"हाय रिस्क हाय गेन्स, नो रिस्क नो गेन्स' या उक्तीचा प्रत्यय प्रॉपर्टीमध्ये
गुंतवणूक करताना आपल्याला पुरेपूर येतो. मागील काही वर्षांमध्ये प्रॉपर्टीमधील
गुंतवणुकीने भरभरून परतावा दिला आहे. शेअर, सोने वा बॉण्ड्समधून मिळणाऱ्या
परताव्याची प्रॉपर्टीच्या बरोबर तुलना केली, तर प्रॉपर्टीमधून मिळणारा परतावा
निश्चितच खूप जास्त आहे. पण मिळकत जास्त आहे म्हणून डोळे झाकून गुंतवणूक करावी,
असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. ....... |
मनमोहक पडदे (वरदा देवधर)
हौसेला मोल नसते. तुम्हाला हव्या त्या कापडाचे आणि पद्धतीचे पडदे तुमच्या घरात
लावून घेता येतात. पडद्यांना पर्याय नसतोच. मग ते तुमच्या घराची शोभा वाढवतील अशा
प्रकारचे बसवून घेणे नक्कीच चांगले. त्यामुळे सोयही होते आणि सौंदर्यातही भर पडते.
आधुनिक पद्धतींमुळे कापड जास्त लागते; पण ते तितकेच आकर्षक दिसतात. ........ |
मोलाची ऑईल पेंटिंग्ज जपा! (संजीव भगत)
नियमितपणे मऊ ब्रशच्या साह्याने पेंटिंगवरील धूळ अलगदपणे साफ करावी. ब्रश
पक्ष्यांच्या पिसाचा किंवा मेंढीच्या केसांचा नसावा, कारण ते मऊ असले, तरी धूळ
काढण्याऐवजी ते धूळ पकडून राहतात. त्यामुळे पेंटिंग साफ करताना उलट पेंटिंगवर परत
धूळ सोडली जाते. ...... |
काळजी पेंटिंग्जची (संजीव भगत)
क्रमशः
छोटे घर असेल तर उठावासाठी एखादी भिंत वेगळ्या शेडमध्ये न रंगविता एखादे मोठ्या
आकारातील पेंटिंग त्या भिंतीवर लावल्यास खोलीला चांगलाच उठाव येईल, मात्र घर मोठे
असेल, तर मुख्य भिंतीचा रंग बदलल्याने बराच मोठा फरक पडतो. ....... |
शुभ्रता जी आकर्षित करेल... (अजय कुलकर्णी)
अंतर्गत सजावटी पाहताना आपल्या दैनंदिन जीवनातलेच उदाहरण पाहिल्यास आपल्याला असे
आढळते, की मागच्या दशकातील आर्थिक धोरणांच्या बदलानंतर अनेक परदेशी कंपन्या
त्यांची दालने थाटत आहेत. सर्वसाधारणतः आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दालनांच्या
सजावटीत अधिकाधिक पांढऱ्या रंगाचा वापर (क्वचितच काळा) झालेला दिसतो. त्यामुळे
आधुनिक सजावटीची परिभाषा म्हणजे पांढऱ्या अथवा काळ्या रंगांचा वापर करून केलेली
निर्मिती, अशी काहीशी होऊ शकते. त्यांचेच अनुकरण करून बऱ्याच भारतीय कंपन्याही
तशाच दिसायला लागल्या आहेत. ....... |
टिप्स टॅक्सगुरूच्या! (उमेश शेळके)
घर आणि जमिनीत गुंतवणूक करावयाची म्हटली, की तिथे हवा व्यवहारातील चौकसपणा... आणि
दृष्टी पुढचा काळ जाणणारी. १ ते ४ मे दरम्यान उत्साहात पार पडलेल्या "सकाळ
प्रॉपर्टी शोकेस'मध्ये टॅक्सगुरू सुभाष लखोटिया यांनी घर आणि जमिनीच्या
गुंतवणुकीसंदर्भात दिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत... ....... |
इन माय होम - फिरस्त्याचं घर (सचिन जकातदार)
ज्यांना नोकरी वा व्यवसायानिमित्त सतत फिरतीवर जावं लागतं, अशांना घरात फर्निचर
करून घेताना आणि त्या दृष्टीने स्पेस मॅनेजमेंट करताना काही महत्त्वाच्या
गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांचं घर हे
अशांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. अनेकांना पर्यटन घडवताना स्वत-ही एक पर्यटक असलेले
सचिन जकातदार सांगत आहेत आपल्या घराविषयी.... .... |
जगण्याचा २४ कॅरेट आनंद अनुभवा (नरेंद्र जोशी)
आज शहर आणि परिसरातील बांधकामासाठी जागा शोधूनही मिळणार नाही. मात्र अगदी शहरातच;
पण शहरापासून दूर असा निवांतपणासह जगण्याचा २४ कॅरेट आनंद आपण घेऊ शकतो तो "गोल्डन
पिटल्स'मध्ये. हा नवीन प्रकल्प दोन महिन्यांपूर्वी गुढीपाडव्याला सुरू झाला असून,
तो येत्या दोन वर्षांमध्ये पूर्णत्वास जाणार आहे. ....... |
सुफलाम् कोपरा (दुर्गा मोघे)
फुलांपेक्षा फळांनी भरलेली झाडे अजूनच वेगळी आणि सुरेख वाटतात. घराला एकदम
सुजलाम् सुफलाम्, वैभवसंपन्न करून टाकतात, घराला एक वेगळाच फील देतात नि शिवाय
ती टिकतातही जास्त. पण त्यासाठी अर्थातच थोडी जास्तीची मेहनत घ्यावी लागते.
वनस्पतींना आटोपशीर ठेवून त्यांना फुलायला व फळायला लावणे, ही एक अभ्यासपूर्ण कला
आहे. ....... |
सुरक्षित माझे घर विकसनात मालकाचा हेतूदेखील महत्त्वाचा (ऍड. नितीन कांबळे)
प्रश्न - आमचा पुणे शहराच्या मध्यवस्तीत जुना वाडा आहे. सदरील वाडा विक्री अथवा
विकसन करण्याचा विचार आहे, तरी यांपैकी कोणती गोष्ट फायदेशीर ठरू शकेल; तसेच
बिल्डरबरोबर समजुतीचा करार नोंदवून घ्यावा लागतो का? बिल्डरने करारनाम्याच्या
अटींचे पालन केले नाही, तर ताबा वसुली अथवा रक्कम वसुलीसाठी कायदेशीर कार्यवाही
करता येते का? मूळ जागेत मालकास राहण्यासाठी सदनिका घेणे चांगले का रक्कम घेणे
फायदेशीर ठरेल. ......
- एक वाडामालक, पुणे. |
फ्रेश बाथरूम! (वरदा देवधर)
सध्या सारं बदललंय. आधुनिक घरात दोन-तीन बाथरूम असतात. त्या नुसत्या चकाचक असून
चालत नाहीत, तर तिथे सर्व सुखसोयीची व्यवस्थाही करावी लागते. ..... |
साठेखत - निश्चिंती व्यवहाराची (ऍड. दक्षा मोकाशी)
स्वप्नात दिलेले वचनसुद्धा राजा हरिश्चंद्राने पाळले, ही गोष्ट आपण पौराणिक
कथांमध्ये वाचतो. दिलेला शब्द, दिलेले वचन पाळणे हे खरे भारतीय तत्त्वज्ञान
सांगते. परंतु गोष्टीत सांगितलेले व्यवहारात उतरवता येतेच असे नाही.
सर्वसामान्यपणे व्यवहारात असे घडत नाहीच, म्हणून तर कायद्याच्या बंधनाची आवश्यकता
असते. भारतीय कराराच्या कायद्यामध्ये (Indian contract Acb) कराराच्या
व्यवहारासंबंधित सर्व तरतुदी नमूद केलेल्या आढळतात. ...... |
चौकोनेतर आकाराच्या खोल्या (मनोज अणावकर)
सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून हातात ताटं घेऊन जेवायला आवडत नाही, म्हणून त्यांना
डायनिंग टेबलची गरज होती; परंतु स्वयंपाकघर तुलनेनं लहान असल्यामुळे तिथं डायनिंग
टेबलची व्यवस्था होणं शक्य नव्हतं. याबरोबरच मुलासाठी स्वतंत्र खोली आणि त्यात
त्याच्या अभ्यासाचं टेबल आणि त्याच्या वह्या-पुस्तकांसाठी आणि कपड्यांसाठीही
कपाटाची सोय हवी होती. जेव्हा अशा विचित्र आकाराच्या खोल्या घरात असतात, तेव्हा
त्याच आकारांचा आपल्याला अनेकदा उपयोग करून घेता येतो... ...... |
सुरक्षित माझे घर - ऍड. नितीन कांबळे विचारविनिमयाने योग्य निर्णय घ्यावा
प्रश्न - एका बिल्डरच्या स्कीममध्ये मी रो-हाउस घेतले आहे. सदर स्कीममध्ये तीन
बिल्डिंग व आठ रो-हाउस असा प्रकल्प आहे. बिल्डरने करार करण्याच्या वेळी अपार्टमेंट
करणार आहे, असे सांगितले आहे व ....... |
|
|  |
|